हेमाद्री वा हेमाडपंत हे देवगिरीकर यादवांच्या काळात ( १३ वे शतक) एक वरिष्ट अधिकारी होते .हेमाद्री पंडिताच्या नावावर अनेक धार्मिक ग्रंथ आहेत. एका विशिष्ट घाटाच्या मंदिरांना हेमाडपंती म्हणावयाची पद्धत आहे. यात बांधणीकरिता चुन्याचा वापर केला जात नाही.ठराविक पद्धतीने दगडावर दगड ठेवून किंवा दगडांना खाचा घेवून हे बांधकाम केले जाते. या पद्धतीत पायाची आखणी ज्या आकाराची असेल, नेमकी त्याच आकाराची लहान आकृती शिखरावरील आमलकाची बैठक असते. पायाची आखणी अनेक कोनबद्ध असते. शिखराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर पद्धतीने बसवल्यामुळॆ लहान लहान शिखरे रचून मोठे शिखर तयार केले असे वाटते.ही शिखरे जागच्या जागी रहावीत म्हणून उपयोगात आणलेल्या दगडांवर नक्षीकाम करून उठाव आणतात.शिखरांमध्ये अनेक प्रकार असून अश्वथर, गजथर इत्यादी प्रकार प्रामुख्याने वापरतात. ही शिल्पपद्धती हेमाडपंताच्या नावाने प्रसिद्ध असली तरी अशा प्रकारची देवळे त्याच्या काळाच्या आधीपासून आढळतात. निलंगे व नारायणपूर येथी या प्रकारची देवळे आहेत.
Post a Comment