The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Latest Post
Showing posts with label अपरिचित इतिहास. Show all posts
Showing posts with label अपरिचित इतिहास. Show all posts

मराठी भाषेचे वय

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 26 February 2014 | 10:58


मराठी भाषेचे वय हे साधारण पणे १५००शे वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत राहिली असे मानले जाते. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.
आद्यकाल  
हा काल इ.स. १२०० पूर्व, म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या लिखाणाच्याही पूर्वीचा काल होय. या काळात विवेकसिंधु या साहित्या व्यतिरिक्त नाव घेण्यासारखी कोणतीही साहित्यकृती पाहण्यास शिल्लक राहु शकली नाही. या काळातील मराठी शब्दांचे तसेच काही वाक्यांचे उल्लेख ताम्रपटात तसेच शिलालेखात आढळतात.
यादवकाल 
हा काल इ.स. १२५० ते इ.स. १३५० असा आहे. देवगीरीच्या यादवांचे महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळातावारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्य रचनेस सुरुवात केली. नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तीपर रचना केल्या व मराठी साहित्याचे दालन भाषिक वैविध्यानी समृद्ध केले. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली.चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङमयात महत्त्वाची भर घातली. सांकेतिक लिपी ची सुरुवातही याच काळात झाली असावी असे मानले जाते.
बहामनी काल 
हा काल इ.स. १३५० ते इ.स. १६०० असा आहे. यादवांचे स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांचा काळ सुरू झाला. त्यांना स्थानिक लोक व भाषेचे काही कर्तव्य नव्हते. सरकारी भाषा फारसीझाल्याने मराठी भाषेत अनेक फारसी शब्दांचे आगमन झाले, जसे तारिख. अशा धामधूमीच्या काळातही साहित्याची भर मराठी भाषेत पडली. नृसिंहसरस्वती, एकनाथ, दासोपंत, जनार्दन स्वामी, रंगनाथ, विष्णूदास नामा, चोंभा यांनी भक्तीपर काव्याची भर घातली.
शिवकाल
हा काल इ.स. १६०० ते इ.स. १७०० असा आहे. या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांचे आक्रमण थंडावले. असे मानले जाते की शिवाजी महाराजांनीरघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले. याच काळात राज मान्यते सोबत संत तुकाराम रामदास यांच्यामुळे लोकमान्यताही मिळू लागली. तसेच मुक्तेश्वर, वामन पंडित यांनी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी या कवींनीही भाषेत भर घातली.
पेशवे काल
हा काल इ.स. १७०० ते इ.स. १८१८ असा आहे. याकाळात मोरोपंतांनी ग्रंथरचना केल्या. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडवप्रताप या काव्या द्वारे खेड्यापाड्यात आपल्या कविता पोहोचवल्या. याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. या साठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वांङ्मय प्रकार मराठीत विकसित झाले. याच काळात वाङ्मय हा रंजनाचा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. या काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, वामन पंडित, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत.
आंग्ल काल
हा काल इ.स. १७१८ ते आजतागायत असा आहे. याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच काळात रोवली गेली. नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याचा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली. छपाई ची सुरुवात झाल्यानंतर मराठी भाषेता उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी या आंग्ल अधिकार्‍याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी चिन्हांने बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले.

Information about Gandhi Topi - गांधी टोपीचा महीमा

Written By Nikhil Salaskar on Saturday, 21 December 2013 | 03:29

गांधी टोपीचा महीमा
गांधी टोपी हि शुभ्र पांढरया रंगाच्या खादी च्या कापडा पासून बनवलेली असायची. अशा टोपीसोबत महात्मा गांधींचे नाव जोडून हिला गांधी टोपी म्हणतात परंतु या टोपीच्या निर्मितीचा आणि गांधीजींचा काही हि संबंध नाही. मुळात हि टोपी उत्तर प्रदेश, गुजरात, बंगाल, कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र या ठिकाणी खूप पूर्वी म्हणजे गांधीजींच्या जन्माच्या खूप आधी पासून वापरत असत. गांधीजींनी ह्या टोपीचा जास्त प्रसार केला. जेंव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत वकिली करत होते तेंव्हा इंग्रजान्द्वारे केल्या जाणारया अत्त्याचाराने दुःखी होऊन त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला.त्या वेळी इंग्रजांचा एक नियम होता हाताचे ठसे घेण्याचा त्याला गांधीजींनी विरोध केला त्यामुळे त्यांना अटक झाली , जेल मध्ये भारतीय कैद्यांसाठी एक विशिष्ठ टोपी होती ती घालणे हा नियम होता. गांधीजींनी बाहेर आल्यावर ह्या अत्त्याचाराची सत्याग्रहींना जाणीव व्हावी म्हणून ह्या टोपीचा प्रचार केला. गांधीजींनी कधीही हि टोपी घातली नाही हे हि सत्य आहेच. परंतु भारतीय नेत्यांनी आणि सत्याग्रहींनी या टोपीला स्वीकारले. आणि काँग्रेस पार्टी ने या टोपी सोबत गांधीजींचे नाव जोडले.
भारतीय नेते वेग वेगळ्या प्रकारच्या रंगाच्या टोप्या वापरू लागले जसे सुभाषचंद्र बोस खाकी रंगाची तर हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक काळ्या रंगाची आणि समाजवादी पार्टी वाले लाल रंगाची टोपी वापरत.
लेखन -- अमोल तावरे

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations