The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Latest Post
Showing posts with label दुर्गसंपत्ती. Show all posts
Showing posts with label दुर्गसंपत्ती. Show all posts

भूषणगड

Written By Nikhil Salaskar on Friday, 24 May 2013 | 07:19

 
 

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची : 2970
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडचा एकमेव डोंगर आपले दुरुनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाइ देवी, या मुलुखात प्रसिध्द आहे. गावकर्‍यांनी गडाला पायर्‍या बांधल्या आहेत व गडावर वृक्षारोपण करुन गड हिरवागार केलेला आहे. यात पिवळ्याजर्द फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गडाला वेगळीच शोभा आली आहे. तसेच अनेक छोटे पक्षी व फुलपाखर यांनी गड गजबजून गेला आहे.
 इतिहास :
देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दूसरा (१२१०-१२४७) याने हा किल्ला बांधला. इ.स. १६७६ मध्ये शिवाजीराजांनी आदिलशहाकडून भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ला जिंकून त्याचे नाव ‘‘इस्लामतारा’’ ठेवले. पेशवेकाळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. इ.स १८४८ मध्ये इंग्रजांनी सातार्‍याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला.
पहाण्याची ठिकाणे :
भूषणगडवाडीतून पायर्‍यांची वाट गडावर जाते. पायर्‍यांच्या सुरुवातीला सिमेंटमध्ये बांधलेली आधुनिक कमान आहे. पायर्‍यांची रचना अशी केलेली आहे की, गड चढतांना गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस रहातात. या रचनेमुळे शत्रू कायम गडावरुन मार्‍याच्या टप्प्यात रहातो.. गडाची प्रवेशद्वाराची कमान आज शाबूत नाही. पण त्याच्या बाजूचे बुरुज सुस्थितीत आहेत. हे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून त्याची बांधणी ‘‘गोमुखी’’पध्दतीची आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. प्रवेशद्वारासमोरील वाट तटबंदीच्या बाजूने जाते, या मार्गावर आपल्याला एक खोल विहीर पाहायला मिळते. गडाची तटबंदी आजही सुस्थितीत असल्यामुळे त्यात जागोजागी आपल्याला जंग्या पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडील पायर्‍यांची वाट मोठ्या बुरुजाकडे जाते. या बुरुजाला तोफेसाठी जंग्या आहेत. या बुरुजावरुन गडाचा मधला उंचवटा दिसतो. बुरुज पाहून मधल्या उंचवट्याकडे जाताना, उजव्या हाताला भव्य बांधीव कुंड दिसते. या कुंडाजवळच महादेवाचे छोटे मंदीर आहे. या मंदिरावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या हरणाइ देवीचे उत्तराभिमुख मंदिर दिसते. या जिर्णोध्दारीत मंदिरात हरणाई देवीची दिड फूट उंचीची मुर्ती आहे. मूर्तीवर पितळी मुखवटा बसविलेला आहे. हरणाई देवीच्या उजव्या बाजूस सिध्दनाथाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. मंदिरासमोर दिपमाळ व शेंदूर फासलेले दगड आहेत. मंदिरासमोरील पायवाटेने उंचवटा उतरुन आपण गडाच्या उत्तर तटबंदीपाशी येतो. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. याशिवाय भूषणगडची तटबंदीच्या खालच्या अंगाला असलेली दक्षिणोत्तर पसरलेली लांब सोंड दिसते.तटबंदीवरुन चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो. याच तटबंदीवरुन आपण संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणाकरुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो. प्रवेशद्वारातून बाहेर पडून काही पायर्‍या उतरल्यावर डाव्याबाजूला एक रुंद मळलेली पायवाट दिसते. ही तटबंदी व बुरुजाखालुन जाणारी पायवाट भूयारी देवी मंदिराकडे जाते. वाटेत आपल्याला तटबंदीवरुन दिसणारी भूषणगड डोंगराची सोंड लागते. भूयारी देवीचे मंदिर भूयार बुजवून नविनच बनविण्यात आलेले आहे. भूषणगडची गडफेरी येथे पूर्ण होते; ती करण्यास १ तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
भूषणगड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात येतो. दहीवडी - कराड मार्गावरील वडूज या मोठ्या गावातून भूषणगडला जाण्यासाठी बसेस आहेत. खाजगी वाहानाने भूषणगडला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत.

१) पुणे - फलटणमार्गे - भुषणगडला जाण्यासाठी :

अ) दहीवडी - कराड मार्गावर वडूज पासून २० किमी अंतरावर पुसेसावळी गाव आहे. या गावात शिरल्यावर उजव्याबाजूला जाणारा रस्ता भूषणगडच्या पायथ्याशी जातो. या ५ किमी रस्त्यापैकी अर्धा रस्ता कच्चा आहे.

आ) दहीवडी - वडूज - उंबर्डेफाटा - शिरसेवाडी - होळीचेगाव - भूषणगड हा छोट्या गावांमधून जाणारा रस्ता खराब आहे. तसेच चुकण्याची शक्ययता जास्त आहे

२) पुणे - सातारा मार्गे भुषणगडला जाण्यासाठी :

क) पुणे - सातारा - कोरेगाव - रहिमतपुर - पुसेसावळी - भुषणगड.

२) पुणे - सातारा - कोरेगाव - पुसेगाव रहिमतपुर पुसेसावळी - रहाटणी - भुषणगड.
राहाण्याची सोय :
गडावरील हरणाई देवीच्या मंदिरासमोरील शेडमध्ये रहाण्याची व्यवस्था होऊ शकेल.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची व्यवस्था नाही.आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
भूषणगडवाडीतून गडावर जाण्यास ३० मिनीटे लागतात.

सूचना :
वर्धनगड , भूषणगड, महीमानगड हे तीन किल्ले खाजगी वाहानाने एका दिवसात पाहून होतात.

अजिंक्यतारा

अजिंक्यतारा 
 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बामणोली, सातारा
किल्ल्याची ऊंची : 950
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम

अजिंक्यतारा हा किल्ला सत्पर्षी, सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा शहर वसलेले आहे. गडावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते. प्रतापगडापासून फुटणार्‍या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. गडावरुन पूर्वेला नांदगिरी, चंदन-वंदन हे किल्ले आणि पश्चिमेला सज्जनगड दिसतो.
इतिहास :
सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. सातार्‍याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज(दुसरा) याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने सातार्‍याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले, मात्र काहीही इजा न होता ते वाचले. तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. त्यामुळे मोठा तट पुढे घुसणार्‍या मोगलांवर ढासळला व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा. ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर केले अजिंक्यतारा ! पण ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र १७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. इ.स. १७१९ मध्ये महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना किल्ल्यावर आणण्यात आले. पुढे पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसर्‍या शाहुच्या निधनानंतर फितुरीमुळे किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.
पहाण्याची ठिकाणे :
सातार्‍यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आ.हे दरवाजाचे दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे, मात्र गडावर पाण्याची सोय नाही. दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडील सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व " मंगळादेवी मंदिराकडे " असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाईंचा ढासाळलेला राजवाडा आहे. येथे एक कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या दक्षिणेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना ते नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्या मार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो. संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणत दीड तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता. येते सातारा एस टी स्थानकावरून अदालत वाड्या मार्गे जाणारी कोणतीही गाडी पकडावी आणि अदालत वाड्यापाशी उतरावे. सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर १० ते १५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने जाणार्‍या थेट वाटेने आपण गडावर जाणार्‍या गाडी रस्त्याला लागतो. येथून गाडी रस्त्याने १ किमी चालत गेल्यावर आपण थेट गडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो.अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे. या रस्त्याने आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचतो. कोणत्याही मार्गे गड गाठण्यास साधारण १ तास लागतो.
राहाण्याची सोय :
गडावरील हनुमानाच्या मंदिरात १० ते १५ जणं राहू शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची व्यवस्था आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
सातार्‍यापासून साधारणत: १ तास लागतो.
सूचना :
सातार्‍यात २ दिवस राहुन अजिंक्यतारा, सज्जनगड, यवतेश्वर, पाटेश्वर ही ठिकाणे पाहता येतात.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाची बांधणी

Written By Nikhil Salaskar on Monday, 22 April 2013 | 23:23


सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाची बांधणी ‘‘गोमुखी‘‘ पध्दतीची आहे. या बांधणीत किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या कवेत लपवलेले असते. प्रवेशद्वार नेमके कोठे आहे, ते निश्चितपणे सांगता येत नाही. प्रत्यक्ष दरवाजासमोर छोटे प्रांगण असते; पण शत्रुच्या हत्तीला दरवाजावर धडक मारण्यासाठी मागे जाण्याएवढी जागा ठेवलेली नसते.गोमुख दरवाजा हे शिवकालीन दुर्ग रचनेचे आणखीण एक वैशिष्ट्य. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून केले आहे. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे.

भरतगड - Bharatgad


सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे कालावलची खाडी आहे. या खाडीच्या किनार्‍यावर नारळी पोफळीच्या बागांनी समृद्ध असलेले मसुरे गाव आहे. मसुरे गाव भरतगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे. मालवण पासून साधारण १६ कि.मी. अंतरावरील मसुरे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्ग वरील कणकवली येथूनही रामगडमार्गे मसुरे पर्यंत गाडी मार्गाने येता येते. समुद्रसपाटी पासून ७५ मीटरची उंची असलेला भरतगड चारही बाजुंनी झाडी झुडुपांनी घेरलेला आहे. झाडी झुडुपांनी झोकोळल्यामुळे भरतगडावरील तटबंदी दिसत नाही. त्यामुळे दूर अंतरावरुन एक झाडीभरला डोंगरच दृष्टीपथात येतो. मसुरे गावापर्यंत मालवणकडून एस.टी. बसेसची सोय उपलब्ध आहे. भरतगडाच्या पायथ्याला असलेल्या दर्ग्यापासून गडावर जाणारा मार्ग आहे. या मार्गावर सध्या पायर्‍या केलेल्या आहेत. मार्गाच्या दोन्ही बाजूला रेलिंग उभारलेले असून मधून मधून विश्रांतीसाठी बसण्याची सोय केलेली आहे. पायथ्यापासून पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीपर्यंत पोहोचतो. समोरची तटबंदी डावीकडे ठेवीत जाणार्‍या पायवाटेने गडाच्या प्रवेशद्वाराकडे जावे लागते. तटबंदी तोडून केलेल्या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. लहान माथा असलेला भरतगड आयताकृती आकाराचा आहे. चारही बाजुंनी तटबंदी आणि बुरुजांनी तो परिवेष्टीत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने विचार करुन मारा करण्यासाठी तटबंदी आणि बुरुजांची रचना केलेली आहे. सध्या गडाच्या माथ्यावर आंबा, काजूची लागवड केलेली दिसते. गडाच्या माथ्यावर अतिक्रमणकरुन ही लागवड केली गेली आहे. पण यामुळे डोंगरमाथा हा हिरव्यागर्द झाडीने फुललेला आहे. या गर्द झाडीमधे धनेश पक्ष्यांचा वावर मोठय़ाप्रमाणावर दिसतो. येथे एकावेळी १२ धनेश पक्षी पहायला मिळाले. गडमाथ्यावर मधे बालेकिल्ला अथवा परकोट आहे. या परकोटात जाण्यासाठी दोन बाजुंना दोन दरवाजे आहेत. त्यापैकी एक दरवाजा बुरुजाला लागूनच आहे. दरवाजाच्या आत पहारेकर्‍यांची देवडी आहे. डावीकडील तटबंदीजवळच एक लहानसे मंदिर आहे. चौथर्‍यावर हे मंदिर देवसिद्ध महापुरुषाचे असल्याचे तेथिल फलकावरुन कळते. काही काळापुर्वीच याचा जिर्णाद्धार केल्यामुळे हे मंदिर सुस्थितीमधे आहे. मंदिरासमोरच तुळशी वृंदावन केलेले आहे. मंदिराच्या डावीकडे खोल विहीर आहे. मात्र याच्या पायर्‍या ढासळलेल्या असल्याने खाली उतरता येत नाही. पाणी काढण्याची काही सोय नाही. मंदिराच्या मागच्या बाजूला वाडय़ाचे भले मोठे जोते पहायला मिळते. सर्वत्र झाडीझुडपांचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे या परिसरात सावधगिरीनेच वावर करणे गरजेचे आहे. डावीकडील तटबंदीमधे एक लहान दरवाजा आहे. याला चोर दरवाजा असेही म्हणतात. या दरवाजाच्या बाहेरील तटबंदीचा मोठा भाग सुटा होऊन ढासळला आहे. वेळीच याची दुरुस्ती झाली नाही तर तटबंदीचा मोठा भाग नामशेष होईल. या बालेकिल्ल्यातून बाहेर पडून दक्षिण टोकावरील बुरुजावर जाता येते. उत्तम बांधणीचा बुरुज पाहून पश्चिम टोकावर आल्यावर बालावलखाडीचे दृष्य दिसते. नारळी पोफळीच्या हिरव्यागर्द झाडीमधून संथ गतीने हेलकावणारी कालावलची खाडी खिळवून ठेवते. खाडीच्या पलिकडील तीरावर गर्द झाडीने झाकलेला भंगवतगड दिसतो. तटाच्या कडेने परत फिरत आपण पुन्हा दरवाजा जवळ येतो. गडफेरी साधारणत: तासाभरात पूर्ण होते. शिवरायांनी येथे गड बांधण्याच्या दृष्टीने पहाणी केली. पण पाण्याची सोय न झाल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला होता. पुढे फोंड सावंतानी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गडावर पाणी मिळाल्यावर त्यांनी आपल्या रक्षणासाठी येथे किल्ला उभारला. पुढे १८१८ मधे इतर किल्ल्याप्रमाणे हा ही किल्ला इंग्रजाना मिळाला तेव्हा गडावर अठरा तोफा असल्याची नोंद केलेली आढळते.

पेडगावचा बहादूरगड

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 27 March 2013 | 04:27


पेडगावचा किल्ला बहादूरगड म्हणून प्रसिध्द आहे. बहादूरगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदे तालुक्यामधे आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात श्रीगोंदे तालुका आहे. या तालुक्याच्या दक्षिणसीमेवर भीमा नदी वहाते. या भीमा नदीच्या उत्तरतीरावर बहादूरगड किल्ला आहे.
पेडगावचा बहादूरगडाला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत. दौंड हे पुणे जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव असून
 रेल्वे आणि गाडी रस्त्याने जोडले गेले आहे. दौंडकडून गाडीरस्त्याने देऊळगाव पर्यंत येवून पेडगाव गाठावे लागते. अलिकडील पेडगाव मधून नावेने पलीकडील पेडगावामधील बहादूरगडाला जावे लागते. अलिकडील पेडगाव मधून नावेने पलीकडील पेडगावामधील बहादूरगडाला जावे लागते. दुसरा मार्ग म्हणजे अहमदनगर कडून अथवा पुण्यातून  श्रीगोंदेला पोहोचावे व तेथून पेडगावला यावे. हा मार्ग सोयीचा आहे. पेडगावचा बहादूरगड हा भीमेच्या काठावर आहे. याची दक्षिणेकडील तटबंदी भीमानदीला समांतर अशी आहे.
 साधारण आयताकृती आकाराच्या बहादूरगडाची निर्मिती मोगल सरदार बहादूरखान कोकलताश याने केली.
किल्ल्याला तीन चार प्रवेशव्दारे आहेत. मुख्य प्रवेशमार्ग गावाच्या बाजूला आहे. किल्ल्यामधे असलेल्या
 अनेक वास्तू आज ध्वस्त झालेले आहेत. याची तटबंदीमात्र कशीबशी उभी असून सर्वत्र काटेरी रान माजलेले आहे. नदीच्या बाजूच्या तटबंदीमधे असलेले बांधकाम पहाण्यासारखे आहे. या दुमजली इमारतीच्या खिडक्यांमधून  भीमानदीचा देखावा सुंदर दिसतो. किल्ल्यामधे सुबक नक्षीकाम असलेली दोन मंदिर आहेत. या मंदिरापैकी लक्ष्मीनारायण मंदिर त्यातल्या त्यात बर्‍या अवस्थेमधे आहे. या मंदिरामधील अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मुर्ती पहाण्याजोग्या आहेत. बहादूरखानाने हा किल्ला बांधला. या बहादूरखानाला शिवाजीराजांनी चांगलाच धडा शिकवला तोही तोनदा. हा बहादूरखान औरंगजेबाचा दूधभाऊ आहे. त्याला औरंगजेबाने सुभेदार म्हणून दक्षिणेत पाठवले. त्याला बहादूरखान कोकलताश अशी पदवी दिलेली होती. याने भीमेच्या काठावर किल्ला बांधला आणि त्याला आपलेच नाव देण्याची बहादूरी केली. बहादूरखानाच्या या बहादूरीबद्दल औरंगजेबाला काय वाटले ते औरंगजेबालाच माहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र बहादूरखान याची बहादूरी माहिती होती. त्यांनी बहादूरखानाला मराठय़ांची बहादूरी दाखवायचे ठरवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरुन काढायला बहादूरखानाने आपण होवून शिवाजीराजांना संधी दिली. बहादूरखानाने बहादूरगडामधे एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरवी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्यासाठी गोळा केले होते. महाराजांच्या हेरांनी सगळा तपशिल गोळा करुन आणला होता.
महाराजांनी आपल्या सरदाराबरोबर नऊ हजाराचे सैन्य बहादूरगडावर खजिना आणण्यासाठी पाठवले.
 या सददाराने आपल्या सैन्याने दोन भाग केले. एक दोन हजाराचे तर दुसरे सात हजाराचे भग केले.
दोन हजाराच्या तुकडीने बहादूरगडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्येश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला.  बहादूरखान लढाईसाठी तयारी करुन मराठय़ांच्या सैन्यावर धावून गेला. त्यामुळे मराठय़ांच्या
तुकडीने माघार घेवून पळायला सुरवात केली. त्यामुळे बहादूरखानाला चेव चढला. त्याने मराठय़ांना
गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरु केला. मराठय़ांनी बहादूरखानाला हुलकावणी देत देत खूप लांबवर आणून सोडले. दरम्यान मराठय़ांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादूरगडावर हल्ला चढवला.
गडामधे तुरळक सैन्य, नोकरचाकर आणि बाजारबुणगेच उरले होते. मराठय़ांनी खजिना आणि घोडे ताब्यात घेवून रायगडाकडे कूच केली. बहादूरखान पाठलागावरुन परत आला तेव्हा त्याला मराठय़ांनी शाही खजिना लुटल्याची बातमी कळाली . तेव्हा त्याला मराठय़ांच्या बहादूरीची जाणीव झाली. खजिना घालवून आणि कशीबशी आपली इभ्रत वाचवून या पेडगावच्या शहाण्याला गप्प बसावे लागले. बहादूरखानाच्या बहादूरीच्या या आणि इतरही घटना आपण बहादूरगड बघत असताना
 आपल्या स्मृतीपटलावर नव्याने कोरल्या जातात हे मात्र निश्चित.

कुलाबा किल्ला

Written By Nikhil Salaskar on Saturday, 16 February 2013 | 00:45




अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गद्वयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. 
इतिहास :
१९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्‍या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला
किल्ल्याचे प्रवेशद्वार किनार्‍याच्या बाजूस पण, इशान्येकडे वळवलेले आहेकिल्ल्याला १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. डावीकडची वाट हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार ह्यांच्या दर्ग्याकडे जाते. १७५९ साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. मंदिराच्या प्राकारातच उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे. 
दरवाजालगत कान्होजींची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जूनी दुरुस्त कली जात असत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या २ तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणार्‍या कंपनीच नाव कोरलेल आहे ‘‘ डाऊसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड ", व वर्ष आहे १८४९. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला जाता येते. 
पोहोचण्याच्या वाटा : 
मुंबईहून - पनवेल - वडखळ मार्गे अलिबागला जावे, अलिबागच्या समुद्र किनार्‍यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते. 
राहाण्याची सोय : 
गडावर राहण्याची सोय नाही ,राहण्याची सोय अलिबाग मध्ये आहे.


अजिंक्यतारा

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 25 December 2012 | 02:51



                                                                      
 सातारचा किल्ला (अजिंक्‍यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्‍यतारा. .इ.स. 1673 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर 1682 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. 1699 रोजी औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. 13 एप्रिल 1700 च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणाऱ्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि 21 एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा.ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर केले अजिंक्‍यतारा ! पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र 1708 मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. पुढे पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसऱ्या शाहुच्या निधनानंतर किल्ला 11 फेब्रुवारी 1818 मध्ये इग्रजांकडे गेला.साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्ही बुरूज आज अस्तित्वात आहेत.दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. मात्र गडावर पाण्याची सोय नाही.डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसारभारती केंद्राचे टॉवर्स आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व 'मंगळादेवी मंदिराकडे' असे तिथे लिहिलेले आढळते.या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासाळलेला राजवाडा तसेच कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे.मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या उत्तरेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गाने खाली उतरावे लागते.संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणत दीड तास लागतो.

तेरेखोलचा किल्ला


तेरेखोलचा हा किल्ला गोव्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान बाळगून आहे. तेरेखोलच्या खाडीच्या तीरावर सावंतवाडीच्या राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले. त्यानंतर १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडाच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यात काही बदल केले. त्यानंतर मराठे आणि नंतर पुन्हा पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात १८१८ मध्ये असल्याने बाकी किल्ल्यांप्रमाण े या किल्याचे नुकसान झाले नाही. किल्ल्याच्या बांधकामात कोकणी, पोर्तुगीज आणि गॉथिक वास्तुशैलीची छाप दिसते. १९२५ मध्ये पोर्तुगीजांविरु द्ध डॉ. बर्नाडो पेरेझ डिसूझा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या वहिल्या गोवन बंडाची आखणी याच किल्ल्यावरुन केली गेली. १९६१ मध्येही पोर्तुगीजांविरु द्धच्या गोवा मुक्तिसंग्रामाच ्या वेळी या किल्ल्याचा एक तळ म्हणून मुक्तिसैनिकांनी वापर केला. गोव्यात एकूणच पर्यटन विकासाचा वेग चांगला असल्याने गोवा शासनाने या किल्लायचा हॉटेल मध्ये रुपांतर केले.


किल्ले रामगड आणि सदानंदगड

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 19 December 2012 | 06:08




कणकवली हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई -पणजी महामार्गावर आहे. कणकवली पासून रामगडला जाणे सोयीचे आहे. रामगडला कणकवली तसेच कसालकडूनही जाता येते. एस.टी. बसेसची सोय आहे. रामगडच्या पायथ्याला वेले नावाचे गाव आहे. कणकवली ते बांदीवडे या गाडीरस्त्यावर बेले गाव आहे या वेले गावाजवळून गड नावाची नदी वहाते. या गड नदीच्या काठावर असलेल्या लहानशा टेकडीवर गर्द झाडीने घेरलेला रामगड किल्ला आहे.समुद्रसपाटीपासून अवघा ५० मीटर उंचीचा हा किल्ला आहे. गावामधून दहा ते पंधरा मिनिटांमधे आपण रामगडावर पोहोचू शकतो. गावाला लागूनच जाणारी वाट आहे. या वाटेवर एक पाण्याची टाकी आहे. त्याच्या जवळून थोडे चढल्यावर गडाचा प्रवेशमार्ग आहे. हा प्रवेशमार्ग बुरुजांमधे लपलेला आहे. गोमुखी पद्धतीने बांधलेला हा प्रवेशमार्ग म्हणजे शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ठ आहे. शत्रु प्रवेशद्वाराला येवून भिडला तरी बाहेर आलेल्या बुरुजांवरुन त्याच्यावर मारा करता यावा अशी याची योजना असते.उत्तम अवस्थेमधील प्रवेशद्वारातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आपल्या दिसतात. पुर्वी पहार्‍यावर असणारे पहारेकरी येणार्‍या नवीन माणसाची ओळख पटवून आणि झाडाझडती घेतल्याशिवाय येथून पुढे सोडत नसत.आता पहारेकरीही राहीले नाहीत आणि पहाण्याची गरज ही राहीली नसल्यामुळे रामगड पुर्णपणे बेसाऊ पडलेला पडलेला आहे. गडाचा या दरवाजाच्या माथ्यावर जाता येते. त्यासाठी पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या दरवाजापासून काही अंतरावर दुसरा दरवाजा केलेला आहे. एकंदरीत एकाच तटबंदीत एवढय़ाजवळ असे दोन दरवाजे इतरत्र पहायला मिळत नाहीत.रामगडाची तटबंदी काही ठिकाणी १५ ते २० फूट उंचीची आहे. काही ठिकाणी तिची पडझड झालेली दिसते. या तटबंदीमधे जवळजवळ पंधरा बुरुजांची गुंफण केलेली आहे. या बुरुजांमुळे गडाची सरंक्षणसिद्धता वाढवलेली दिसून येते. पुर्वी या बुरुजांवर तोफा होत्या. गडावर तोफांचे गोळे आणि २१ तोफां असल्याची नोंद आहे. सध्या सात तोफा किल्ल्यात आहेत. या तोफा कोणी नेऊ नये म्हण्नू एका घराच्या जोत्यावर उभ्या करुन अर्धवट जमिनीमधे गाडून ठेवल्या आहेत. तोफा इकडे तिकडे हलवू नये म्हणून केलेली ही नामी शक्कल पाहून करणार्‍याचे कौतुकच वाटते.रामगडाच्या एका बाजुने गडनदी वहाते. नदीच्या बाजुच्या तटबंदीमधे एक लहान दरवाजा केलेला आहे. या दरवाजाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. पुर्वी याचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असणार कारण गडावर पाण्याची कसलीच सोय केलेली आढळत नाही. गडावरील पाण्याची गरज ही नदीतून वाहणार्‍या पाण्यावरच भागवली जात असावी असे दिसते.रामगडाचा आवाका लहानच आहे. गडावरील घरांची जोती. वाडय़ाचे अवशेष, तटबंदी, बुरुज तसेच गणेश्मुर्ती तोफां इत्यादी पहाण्यासाठी तास दीड तासांचा अवधी पुरेसा आहे.शिवकालीन बांधकामाची वैशिष्ठ जपणारा रामगड मात्र इतिहासाबद्दल मौन बाळगून आहे. रामगडाचा किल्ला तुळाजी आंग्रे यांनी जिंकुन घेतल्याची नोंद आहे. इंग्रजांच्या सेनेचा कॅप्टन पिअससन हा रामगड जिंकण्यासाठी आला. त्याने ६ एप्रिल १८१८ मध्ये रामगड जिंकून घेतला.रामगडाची ही छोटीशी पण आनंदाची भ्रमंती आटोपून आपण जवळच्या सदानंदगडाकडे निघतो. हो सदानंदगड नावाचा किल्ला रामगडापासून १२ ते १३ कि.मी. अंतरावर आहे. १९८६ साला पर्यंत सदानंदगडाची माहिती कोणालाही नव्हती. आजही या दुर्लक्षीत किल्ल्याची माहिती अनेकांना नाही.सदानंदगडाच्या परिसरातील गावांमधेसुद्धा किल्ला म्हणून तो डोंगर प्रसिद्ध नाही. रामगड मधून एक रस्ता शिरगावकडे जातो. या मार्गावर गोठणे, सांडवे, कुवळे अशी गावे लागतात या मार्गावर एस.टी. बसेस मर्यादीतच आहेत. स्वत:चे वाहन सोयीचे पडते.कुवळेगावाच्या पुढे सदानंदगडाचा डोंगर आहे. पुर्णपणे झाडीने झाकल्यामुळे त्याचे गडपणही हरवून गेले आहे. सदानंदगडाच्या मार्गावर कातळात कोरलेल्या काही पायर्‍या आढळतात. गडाच्या प्रवेशद्वाराचे तुरळक अवशेष दिसतात. तटबंदी व इतर वास्तू कालौघात नष्ट झाल्याचे आढळते. सदानंदगडावर पाण्याच्या दोन विहीरी मात्र आहेत. त्यात दगडमाती पडल्याने त्याही बुजत चालल्या आहेत.सदानंदगडावरुन साळशीकडे उतरता येते. या मार्गावर काही पायर्‍यांही केलेल्या आढळतात. सदानंदगडासारख्या उपेक्षीत किल्ल्याची भ्रमंती येथील निसर्गरम्य परिसरामुळे आपल्याला वेगळाच आनंद देवून जातो. 

श्री प्रमोद मारुती मांडे 


किल्ले दुर्गाडी




कल्याण शहर उल्हास नदी, खाडी किनारी वसलेले आहे. सातवाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण बंद खूप प्रसिद्ध होते. मध्यपूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणार्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते. कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल येथून नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच प्रतिष्ठाण (पैठण) या राजधानीकडे रवाना होत असे.
बोर घाटाजवळ उगम पावणारी उल्हास नदी वसईजवळ समुद्राला मिळते. उल्हास नदीला कसारा घाटाजवळ उगम पावणारी भातसाई नदी तसेच माळशेज घाटाकडून वाहत येणारी काळ नदी येवून मिळते. त्यामुळे खाडीला पाणी भरपूर असते.हा भाग निजामशाही (अहमदनगर) च्या अस्तानंतर आदिलशाही (विजापूर)च्या ताब्यात आला. इ.स. १६३६ नंतर आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५४मध्ये घेतला. त्यावेळी कल्याण बरोबर भिवंडीही ताब्यात आणली.कल्याण सारखे महत्त्वाचे बंद ताब्यात आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधण्याचा आदेश दिला. आबाजी महादेवाने येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खंदत असताना या पायामध्ये अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळाही ही दुर्गेचीच कृपादृष्टी समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले.दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली. येथे निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना, वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिर्याच्या सिद्धीला दहशत बसविली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला.
कल्याणच्या बसस्थानकापासून रिक्षाने १५ मिनिटात दुर्गाडी किल्ल्याजवळ पोहोचता येते. किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर सध्या कमान उभारलेली आहे. या मार्गावर पूर्वी दरवाजा होता, याला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जाता असे. येथे गणेशाची मूर्ती आहे.दुर्गाडीच्या लहानशा किल्ल्यावर दुर्गामातेचे मंदिर आहे. त्यामुळे येथे भक्तांचा नेहमीच राबता असतो. मंदिरात पूर्वीचा देवीचा तांदळा असून नव्याने बसविलेली मूर्तीही आहे.मंदिराजवळ इदग्याची भिंत आहे. गडाच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत. गडावरील अवशेष मात्र काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. दुर्गाडीचा किल्ला लहान असल्यामुळे सर्व परिसर पाहण्यासाठी अर्धा पाऊण तास पुरेसा आहे.

श्री प्रमोद मारुती मांडे 


किल्ले राजगड नकाशा


बाणकोट किल्ला

Written By Nikhil Salaskar on Thursday, 13 December 2012 | 02:01




मंडणगड तालुक्यातील बाणकोट हे लहानसे गाव. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेस रायगड-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर सावित्री नदीच्या उगमस्थानावर हे गाव आहे. त्यामुळे इथला निसर्गरम्य परिसर भुरळ पाडणारा आहे. गावाच्या एका बाजूला उंचावर बाणकोट किल्ला उभा आहे.
मुंबईहून येताना मंडणगड तालुक्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाच्या सान्निध्यातील भटकंतीची सुरुवात करता येते. मुंबई-गोवा महामार्गावर म्हाप्रळ पासून १८ किलोमीटर अंतरावर मंडणगड आहे.मंडणगडपासून बाणकोट २५ किलोमीटर अंतरावर आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वरला भेट देऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करायचा असल्यास केवळ ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बागमंडला गावाला लागून असलेल्या बाणकोटच्या खाडीत फेरीबोटची सुविधा आहे. आपल्या वाहनासह या बोटीतून प्रवास करतांना केवळ पाच मिनिटात मंडणगड तालुक्यातील वेसवी गावात प्रवेश करता येतो. वेसवीपासून बाणकोटचा किल्ला ३ किलोमीटर अंतरावर आहे.बाणकोट हे मासेमारीचे प्रमुख केंद्र असून येथून नारळ, सुपारी, आंबे, खारे मासे, माशांचे पंख आणि मावा निर्यात केला जातो. वाटेने जातांना दाट झाडीत बाणकोट खाडीच्या किनाऱ्यावर असलेली टूमदार घरे लक्ष वेधून घेतात. किल्ल्याकडे जाणारी वाट अरुंद असली तरी वाहन अगदी वरपर्यंत जाते. किल्ला अजूनही चांगल्या स्थितीत आहे. लिनी या ग्रीक तज्ज्ञाने पहिल्या शतकात या किल्ल्याचा उल्लेख 'मंदगीर' म्हणून केला होता. किल्ला आदिलशाहकडून १५४८ मध्ये पोर्तुगिजांकडे आला.पोर्तुगिजांकडून मराठ्यांकडे आल्यावर या किल्ल्याला 'हिंमतगड' नाव देण्यात आले. इंग्रजांनी किल्ला आंग्र्‌यांकडून ताब्यात घेतल्यावर त्यास 'व्हिक्टोरिया' असे नाव दिले. कमांडर जेम्स याने १७५५ मध्ये किल्ला ताब्यात घेतल्यावर परिसरातील ९ गावे इंग्रजांच्या ताब्यात गेली. ब्रिटीशांच्या काळात बाणकोटला व्यापार आणि भौगोलिक स्थानामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि ते जिल्हा कचेरीचे मुख्य स्थान झाले. मात्र दळणवळणाच्या गैरसोयींमुळे नंतरच्या काळात जिल्हा कचेरी रत्नागिरीस आणली गेली.लाल पाषाणाच्या टेकडीवर बांधलेल्या या किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत असून समुद्राच्या बाजूने असलेले भव्य प्रवेशद्वार नजरेत भरते. प्रवेशद्वाराजवळ उभे राहिल्यास समोर खाडीच्या पलिकडे हरिहरेश्वराचा डोंगर दिसतो. किल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. किल्ल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या, पाण्याचे हौद, भुयार आणि विविध भागांना जोडणारे जिने पाहायला मिळतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेल्या तटबंदीस लागून खंदक आहे. खालच्या बाजूस बांधलेले 'ऑर्थर सीट' किल्ल्यावरून स्पष्ट दिसते.हे स्मारक १७९१ मध्ये पुण्याचा रेसिडेंट असलेल्या चार्ल्स मॅलेट याचा मुलगा आर्थर मॅलेट महाबळेश्वरला जात असतांना तो मुंबईहून बोटीने बाणकोटकडे निघाला. त्याची पत्नी सोफीया आणि ३२ दिवसांची मुलगी एलेन या दोघी १३ खलाशांसह बाणकोटच्या खाडीत बुडून मरण पावल्या. त्यांच्या पार्थिव शरीराचा दफनविधी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत करण्यात आला. या ठिकाणी चौथरा बांधण्यात आला आहे. यास 'ऑर्थर सीट' म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध 'आर्थर सीन' पॉईंटचे नाव याच आर्थर वरून देण्यात आले आहे.नाना फडणवीस यांचे गाव वेळास किल्ल्यापासून काही अंतरावरच आहे. गावात त्यांनी बांधलेली दोन देवालये पाहायला मिळतात. हिवाळ्यात निसर्गमित्रांनी कासवांचे संवर्धन करण्यासाठी भरवलेल्या कासव महोत्सवातही सहभागी होता येते. समुद्र किनाऱ्याची भटकंती आणि इतिहासाच्या पाऊलखुणा अभ्यासतांना वेगळेच समाधान मिळते. म्हणूनच ही भेट स्मरणीय ठरते.

डॉ.किरण मोघे 

किल्ल्यावर जावंच कशाला?

Written By Nikhil Salaskar on Sunday, 9 December 2012 | 07:43


 किल्ल्यावर जावंच कशाला?
या प्रश्नाला उत्तर एकच, "किल्ले आहेत म्हणुन तेथे जावं." पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या भुगोलाला पुढील अनेक पिढ्यांनी गौरवानं-अभिमानानं सांगावं असा इतिहास जिथंघडला तिथं जाणं अगत्याचं आहे, प्रत्येक महाराष्ट्रीकाचं ते आद्य कर्तव्य आहे. पण तिथंजाताना तिथल्या इतिहासाची आपल्याला जाणीव हवी. नाहीतर आज तिथं दिसतीलढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, पडलेली तटबंदी अन ओहोरलेली टाकी. पण हीचती ठीकाणे जिथे इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. जगण्यातला अर्थत्यांच्या मरणाने आपल्याला मिळाला आहे. उत्तरेकडचे किल्ले धड उभे आहेत. त्यांच्यादगडादगडावर कोरीव काम आहे अन आतल्या भिंती, वाडे, दालने शाबुत आहेत. पण त्याचीकिंमत..? फ़ार भयानक किंमत देऊन हे सारं टिकवलं गेलं आहे! आपल्यामुलीबाळी परधर्मीय जुलमी सत्ताधिशांच्या घरी लोटाव्या लागल्या. नावांत सिंह अनकिताबाने राजे असणारे या किल्ल्याचे माल्क आपली धनदौलत, अब्रु आणि मुख्यम्हणजे स्वातंत्र्य त्या सत्तांध - धर्मांध सुलतानांकडे गहाण टाकुन आले होते. म्हणुन हे असे राहिले! शोकेसमध्ये ठेवलेल्या या नटव्या बाहुल्याच.पण महाराष्ट्रातल्या या रांगड्या किल्ल्यांच तसं नाही. इथले भग्नावशेष हीच या किल्ल्यांची महावीर अन परमवीर चक्रंआहेत. ज्याला आपण दुषण देतो तीच त्यांची भुषणं आहेत. आपल्या लढाऊ परंपरेची ही जिवंत स्मारकं आहेत. अगदी १८१८ च्या शेवटच्या इंग्लिश-मराठे युध्दातही सिंहगड, वासोटा, रायगडचे किल्ले भांडवल केले गेले. त्यात त्यांच नुकसानझालं. एकावर एक दगड ठेवुन हे किल्ले बांधले नाही गेले. मानसांची मने त्यांशी जखडली गेली होती. हे सारं दुर होण्यासाठी डिकीन्सन आणि एतरांनी बुध्द्याच हे किल्ले ढासळवुन टाकावेत, किल्ल्यावर जाण्याचे मार्गच तोडावेत व स्वातंत्र्याची कारंजी मुळात नष्ट करावीत असे मनी धरुन मोहिम मांडुन हे उध्वस्तीकरण केले. काही प्रमाणात इंग्लिशांना त्यात यशही आले. पण घामाचा पाऊसपाडुन अन रक्ताचा सडा शिंपुन ही दुर्गपुष्पे इये देशी वाढवली गेली-टिकवली गेली हे विसरुन चालणार नाही !

-प्र.के. घाणेकर 

राजमाची... एक जोड किल्ला

Written By Nikhil Salaskar on Thursday, 6 December 2012 | 05:36



राजमाची हा एक आगळावेगळा दुर्ग आहे.त्याचे दोन बालेकिल्ले हे त्याचे वैशिष्ट्य. श्रीवर्धन आणि मनरंजन अशी नावे असलेले हे बालेकिल्ले एकमेकांना पूरक आहेत.कोकणातून देशावर येणाऱ्या घाटवाटेवर हा दुर्ग लक्ष ठेवतो.लोणावळ्याहून उढेवाडीकडे चालत जाऊन राजमाचीवर जाता येते,तर पुणे-मुंबई रेल्वेमार्गातील खंडाळ्याच्या घाटात ठाकरवाडी या छोट्या स्थानकावर उतरून खाली कोंडाण्याचे लेणे पाहून मोठा चढ चढून राजमाचीवर जाता येते.उढेवाडी एक छोटे टुमदार गाव आहे.'राजमाची ग्रामसहाय्य योजना' या मुंबईच्या संस्थेने या छोट्या गावाचा विकास करण्यासाठी बर्याच योजना राबवल्या आहेत. समोरच श्रीवर्धन हा बालेकिल्ला आहे.दोन्ही बालेकिल्ल्यांमध्ये जवळच पाण्याची टाकी आहेत.मनरंजन या बालेकिल्ल्यापेक्षा श्रीवर्धनची उंची थोडी अधिक आहे.दुर्गात लेणी आहेत.वरून मोठा प्रदेश पाहता येतो.विसापूर,लोहगड,धक,माहुली,माथेरान असा चौफेर प्रदेश दृष्टीपथात येतो. राजमाचीचे हे दोन बालेकिल्ले स्वतंत्र दुर्ग मानले जात.या दोघांचे हवालदार वेगवेगळे असत. शिवाजीमहाराजांनी इ.स.१६६१ मध्ये महिनाभर श्रीवर्धन गडावर मुक्काम केला होता.गडाभोवती दाट झाडी आहे.त्यात बिबट्याचा वावर आहे.एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न आहे.राज्यवहारकोषात बालेकिल्ल्याचा 'अधित्यका' असा शब्दप्रयोग केला आहे.दोन बालेकिल्ले हे एकमेकास पूरक आहेत,म्हणून बांधून काढावेच लागले.अर्थात,दोन्ही अधित्यकांचा पसारा मोठा असल्याने स्वतंत्र गड म्हणूनही गणले जाऊ लागले.दोन अधित्यका आणि तेच दोन स्वतंत्र गड असे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे.पाण्याची टाकी ,लेणी,दरवाजे,तटबंदी अशा अनेक गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत.खंडाळ्याच्या घाटातून एका बोगद्यातून दुसर्या बोगद्यात जाणार्या आगगाड्या न्याहाळताना फारच मजा येते.

गडावरील लॊक व्यवस्था

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 4 December 2012 | 20:17



गडावरील लॊक व्यवस्था

सुभेदार => हवलदार => सरनौबत => सरनाईक => नाईक => सैनिक तुकडी

* हवलदार
:- (किल्लेदार) (गडाचा हवाला ज्याच्या ताब्यात दिला आहे असा)
साधारण जात :- मराठा
काम :- राजे गडावर येई पर्यंत याचा मुक्काम कुटूंबकबील्या (फ़ॅमिली) सहीत (कारण त्यामुळे त्याची निष्टा गडावर व कामकाजावर राही. कारण तो फ़ॅमिली व गड या दोन्ही कडे लक्ष देवू शके) राजवाड्य़ात असे.
गडावरील सर्वात मुख्य व्यक्ती.
गडा भोवती गाव / मेट बसवणे / उठ्वणे
महसूल गोळा करणॆ
याच्य़ा हाता खाली ३ सरनौबत असत
गडावर अंमल

* सरनौबत
तट्बंदी पहारेकर्‍य़ांचा मुख्य
हवालदारच्या हाताखालील उपाधीकारी
सेनापती
सेनापतींच्या हाताखाली सरनाईक असत

* सबनीस (गडावरचा अकाऔंटंट कम ऍडमिनिस्टेटर)
साधारण जात :- ब्राम्हण
काम:- गडाचा कारभार पहाणे
गडावरील अन्न / पाणी ई. स्थिती बघणॆ
गडावर हजेरी घेणे
पत्रव्यवहार बघणे
अकाऔंटंटस बघणे
(युद्धजन्य परीस्थीतीत गड लढवायचा कि सोडुन द्यायचा हे ठरविण्याचा निर्णय हवल्दार व सबनीस मिळून घेत असत. एखादा गड जर आपण जास्त दिवस लढ्वू शकत नाही {अन्न / पाणी / सैन्य दारू गोळा ई. च्या कमतरते मुळे तर} हे लक्षात आल्यावर मराठे खंडणी घेवून किल्ला शत्रुच्या हवाली करत. आणी पावसाळ्य़ाचा दिवसात जॆंव्हा शत्रू किल्ला सर्व गोष्टींनी सुसज्ज करत असे तेंव्हा हल्ला करून किल्ला परत मिळ्वत आसत)

* कारखानीस
साधारण जात :- प्रभु
काम:- गडाची डागडुची करणे
स्टॉक बघणे
याच्य़ा हाताखाली कारकून असत

[ हवलदाराचा कार्यकाल एकाच ठिकाणी :- ३ वर्षे, सरनौबतांचा कार्यकाल एकाच ठिकाणी :- ४ वर्षे, सबनीसांचा कार्यकाल एकाच ठिकाणी :- ५ वर्षे. या नंतर त्यांची दुसर्‍य़ा ठिकाणीबदली केली जात असे एखाद्या किल्लेदारावर फ़ितुरीचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याचा शिरछेद केला जात असे.आरॊप सिदध न. जाल्यास त्यास योग्य ती सम्ज देवून बदली केली जात असे.
या सर्व अधी कार्‍य़ांना त्यांच्य़ा रहात्या ठिकाणा पासून दुरच्या ठिकाणी नेमलेले असे त्यामुळे फ़ितूरीची शक्यता कंमी होते. ] 
फ़डणवीस : फ़ड म्हणजे दप्तर (ऑफ़िस, कचेरी) :- कचेरीचा मुख्य तो फ़डणवीस
सभासद :- यालाच वाकनिस असे सुध्दा म्हणतात :- वाकन म्हणजे घट्ना :- गडावरील घट्ना लिहीण्य़ाचे काम वाकनीस उर्फ़ सभासद करीत असे.

या सर्वां शिवाय गडावर :- गंवंडी, सुतार,पाथरवट,कामाटणी,ताटकरी,कोठावळ (स्टॉक किपर),गुरव,पुजारी,चांभार(चांभाराचे काम पखाली तयार करण्याचे असे. या पखालींचा उपयोग बांधकामा साठी पाणी वाहणे, तटावर पाणी घालणे ई. साठी होई) हे लोक कायम असत.

कायम स्वरूपी किल्ल्यावर नेमणुक असलेल्य़ांना सनदी असे म्हणत युध्द्जन्य परिस्थीतीत ईतर ठिकाणांवरुन सैन्य पाठ्वले जाई युद्ध झाल्यावर हे सैन्य आपआपल्या ठिकाणांवर परतत असे. यांना गैरसनदी अथवा नामजाद म्हणत आसत.
मराठी राज्यात कोणालाही जामिनी शिवाय नोकरी मिळत नसे.,गडावर चालणार‍य़ा प्रत्तेक गोष्टीचा हिशोभ ठेवला जात असे, वर्शातुन एकदा एक मोठा अधिकारी गडावर जाऊन हिशोभ तपासत असे, दर ५ वर्षांनी बेहडा (मॊठी पंचायत) होत असे यात गेल्या ५ वर्षांचा हिशोभ तपासला जाई (या प्रकारचे अंदाजे १५/२० लाख हिशोबाचे कागद ईतिहास संशोधन मंडळात आहेत, ते मोडी लिपीत आहेत, ज्यांना मोडी शिकायची आहे त्यांच्य़ा साठई मंडळ मॊडि चे वर्ग चालवते, येत्या १८ तारखे पासुन नविन वर्ग चालू होत आहेत ज्य़ांना यायचे असेल त्यांनी भारत ईतीहास संशोधन मंडळात संध्या. ६ ते ८ या वेळेत श्री. मंदार लवाटे यांना भेटावे - फ़ोन नं ९८२३०७९०८७, वर्गाची फ़ी रु.२६० असुन तो १६ दिवस चालेल , याच बरोबर मॊडिची पुस्तके व मोडी अभ्यासा साठी काही कागद पत्रांच्या झेरॉक्स मिळ्तील त्या साठी रु.११५)
किल्य़ाचा खर्चा साठी किल्य़ांना गावे जहागीर म्हणुन दिली जात, या गावांमधुन किल्य़ासाठी धान्य पिकवले जाई व ते किल्य़ास पाठविले जात असे. 
मानवाच्य़ा उतक्रांती झाली त्या वेळी माणूस उघड्य़ावर रहात असे त्या मुळे त्याला ईतर श्वापदांचे भय नेहमीच असे म्हणून त्याने गुहेचा आसरा घेण्य़ास सुरुवात केली ओ गुहेत असताना त्याला थोडे संरक्षण मिळाले नंतर त्याने गुहेच्या तॊंडावर मोठ मॊठे दगड लावून स्वत: साठी आसरा निर्माण केला.. नंतर तो पाण्य़ाचा स्त्रोता जवळ वस्ती करून राहू लागला त्याने घर बांधण्यास सुरुवात केली या वस्ती भोवती संरक्षणा साठी तो लाकडई, काट्य़ांचे कुंपण घालू लागला. पण हे जेंव्हा अग्नीच्या भक्षी पडे तेंव्हा त्य़ाचे खुप नुकसान होत असे म्हणुन त्याने मातीची तटबंदी बाधण्य़ास सुरुवात केली.( हि तटबंदी घालण्य़ाची सुरुवात होती) .. जर त्याच्या जवळील पाणी साठा संपला तर तो आता तो दुसर्‍य़ा पाणी साठ्य़ा कडे जात असे.. तेथील वस्ती वर हल्ला करत असे.. (येथुनच लढाईस प्रारंभ झाला).. या मुळे वस्तीच्य़ा संरक्षणा साठी त्याने वस्ती भोवती खंदक खोदण्य़ास सुरुवात केली...नंतर तो घडीव दगडाची तट्बंदी उभारु लाआगला (हिच किल्ले उभारण्य़ाची सुरुवात म्हणता यॆईल). आपल्य़ा कडे मोहिन्जोदोडो व हड्प्पा संस्क्रूती चे अवशेश या प्रकारचे आहेत..
महाराष्ट्राचा ईतीहास हा साधारण पणे सातवाहनांच्या काळा पासुन सुरु होतो यावेळी येथे अनेक बंदरांमधून परदेशाची व्यापार चालत होता.महाड म्हणजे महाह्ट खुप मॊठी बाजारपेठ. बाणकॊट पाशी सावित्री समुद्राला मिळते. ते बाणकॊट बहूत प्राचीन तिथून ना.ना परिचा सम्रुध्द माल नावां मधून महाड पर्यंत यायचा. कमितकमी ५ हजार वर्ष तरी हा वहातघाणा सूरू आहे, ग्रिस मधून अलेक्झान्ड्रीयातून व्यापारी तारवातून मद्य, तांब, कथील शिस पोवळी पुष्कराज, बिलोरी कांच सुरमा, अस काय काय आणीत,फश्चिम किनारयावर कित्तेक बंदरं भ्रुगुकछ. शुर्पारक,श्रीस्थानक,कलीयन,चेउल,बाणकॊट, दल्भपूरी. यां बंदरातून हा माल उतरायचा मग लमांणांचे तांडे आपल्य़ा बैलांच्या पाठीवर माल चढवायचे. घाट वट चढूं लागायचे, व देशावर यायचे या वाटां वर लक्ष देण्य़ासाठी व या व्यापार्‍य़ांना संरक्षण देण्य़ा साठी, यांच्या वर लक्ष देण्य़ासाठी या वाटां वर किल्ल्य़ांची निर्मीती झाली..


किल्ल्यावरील वास्तू


किल्ल्यावरील वास्तू :

दारू कॊठार :- हे लोकवस्ती पासुन लांब असे , युध्दजन्यपरीस्थीतीत चटकन उपलब्ध होण्य़ासाठी दारू गोळा काहीप्रमाणात तट्बंदी मध्येही ठेवला जाई जर शत्रूने हल्ला केला तर ईथे आग लावण्य़ात येई.

सदर :- कचेरी - गडाचाकारभार पहाण्यासाठी.

राजवाडा :- येथे राजे येई पर्यत येथे गडाचाकिल्लेदार रहात असे व वाडा जागता ठेवत असे राजे येण्य़ाआधी काही दिवस तो वाडा रिकामा करत असे. नंतर वाड्य़ाची सफ़ाई होत असे. धुप जाळला जाई.

धान्य कॊठार :- तांदूळ , नाचणी ई धान्य साठवले जाई.

लक्कड्खाना :- येथॆ जळाउ माल साठवला जात असे.याचा उपयोग गडावर दिवाबत्ती करण्य़ासाठी हॊत असे.

तेल व तुप टाकी :- येथे तेल व तुप साठवले जाई , जुन्या तुपाचा उपयोग जखमा भरण्य़ासाठी होत असे.

तोफ़खाना :- पावसाळ्य़ात तोफ़ांचे काने भरण्य़ासाठी तोफ़ा येथे गोळाकरत.

पाण्य़ासाठी :- तलाव व टाकी :- प्रत्तेक जमाती साठी वेगवेळी टाकी होती त्यामुळे गडावर एकापेक्षा अनेक टाकी अढळतात. टाकी तोफ़ेच्य़ा मार्‍याने व आवाजाने फ़ुटून त्यातील पाणी वाया जाऊनये म्हणून त्यात अनेक कप्पे केले जात (जर त्यामधील एखादे टाके फ़ुट्ले किंवा चिरले गेले तर सगळे पाणी वाहून जात नसे उदा. अलंग मलंग , रॊहीडा.), [या टाक्य़ांच्य़ा बाजुला काही खोबणी दिसतात पावसाळ्य़ाचा दिवसात या खॊबणीं मध्ये बांबु रॊवुन टाकी झाकत असत. पावसाळ्य़ात गढूळ पाणी मिक्स होऊ नये याच्यासाठी विशेष प्रकारचे चरे घेतअले जात. या मुळे गाळ गाळला जाउन स्वछ पाणई टाकीत साठवले जाई] {टाकी खोदताना मिळालेल्य़ा दगडाचा उपयोग गड बांधणी साठी होत असे.}


किल्य़ाचे भाग


किल्य़ाचे भाग :-

घेरा : गडाचा परीघ

दांड्य़ावरची वाट :- मेट :- (साधारण गडाच्या मध्यावर) येथे कॊळी,रामॊशी लोकांची वस्ती असे त्यांचे काम गडाचे रक्षण करणे.

दरवाजे :- गडाला अनेक लहान मोठे दरवाजे असत याचा उपयोग युध्दजन्यपरीस्थीतीत होत असे.. (देवगीरी किल्य़ाला एकच दरवाजा होता त्या मुळे प्रतीकार करणे अवघड गेले)

अलंकार :- दरवाज्य़ा जवळील पहारेकर्‍य़ांची रहाण्य़ाची जागा.

ताट : घंटा :- पहारेकर्‍य़ां ची शिफ़्ट चेंज झाल्यावर घंटा वाजवण्य़ात येई. या घंटा वाजविणार्‍यांना ताटकरी म्हणत

छायाचित्रकार : केयूर रेगे महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती | Maharashtrachi Durgsampatti


किल्याची व्याख्या

किल्याची व्याख्या :- संरक्षणात्मक तट्बंदीत्म्क बांधकाम.

किल्यांचे प्रकार :- स्थळ दुर्ग(भुई कोट :- चाकण, सुभानमंगळ), गिरी दुर्ग (राजगड, रायगड ),जल दुर्ग (जंजीरा,सिंधुदुर्ग)

किल्ले हर्षगड

Written By Nikhil Salaskar on Friday, 28 September 2012 | 07:16




पुर्वपश्चिम पसरलेली त्रंबकरांग भास्करगडापासून सुरु होवून हर्षगड, त्रंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी असे किल्ले आपल्या कवेत घेवून धावते.भास्करगडाच्या पुर्वेला आणि त्रंबकगडाच्या पश्चिमेला हर्षगड आपला कातळमाथा उंचावून उभा आहे. हर्षगडाला जाण्यासाठी दोन चार मार्ग हे ट्रेकिंगच्या दृष्टीने उत्तम आहेत. पण किल्ला चढायचा असेल तर पायथ्याचे गाव गाठणेच सोयीचे आहे. हर्षगडाच्या दक्षिण पायथ्याला टाकेहर्ष
म्हणून लहानसे गाव आहे. येथून तासाभरात आपण हर्षगडाचा पायथा गाठू शकतो. तसेच उत्तर बाजुला असलेल्या जांभुळपाडा या गावाकडूनही भास्करगडाच्या खिंडीत येवून भुंडी, फणी, असे डोंगर ओलांडून आपण हर्षगड गाठू शकतो. मात्र जांभुळपाडा गाठण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागतो हे लक्षात असू द्यावे.हर्षगडाचा उभा असलेला कातळमाथा लक्षवेधी असला तरी त्याच्या चहुअंगाचे सरळसोट कडे मात्र आपल्याला धडकी भरवतात. गडावर चढण्यासाठी उत्तरबाजु कडून वाट आहे ही एकमेव वाट पायर्‍यांची आहे. उभ्या कातळात या पायर्‍या कोरुन काढलेल्या असल्याने दमछाक करणार्‍या आहेत. टाकेहर्षकडून तासादीडतासातआपण येथ पर्यंत पोहचू शकतो.टाकेहर्ष हे गाव नाशिक ते खोडाळा या गाडीरस्त्यावर आहे. नाशिक कडून येताना अंजनेरीचा किल्ला ओलांडल्यावर डावीकडे इगतपुरीकडे जाणारा फाटा आहे. या फाटय़ावरुन पुढे निघाल्यावर इगतपुरीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे वळाल्यावर आपण खोडाळाच्या दिशेने जावू लागतो. या वाटेवर आखलीहर्ष, टाकेहर्ष अशी गावे लागतात. ठाण्याकडून येताना कसारा घाटाच्या सुरवातीलाच खोडाळा तसेच जव्हारकडे जाणारा गाडीमार्ग आहे. येथून खोडाळा कडूनही आपण टाकेहर्ष गाठू शकतो.टाकेहर्ष कडून साधारण चारपाच तासांचा अवधी हाताशी ठेवून सोबत पाणी आणि खाण्याचे साहित्य घेवून हर्षगडाकडे प्रयाण करावे.हर्षगडाच्या नावात जरी हर्ष असला तरी पायर्‍या चढताना मात्र तो हर्ष मावळतो. जसजश्या पायर्‍यांनी आपण वर चढतो तस तसा विस्तृत प्रदेश दिसासला लागतो. पायर्‍यांच्या माथ्यावर प्रवेशद्वार आहे. एवढे प्रवेशद्वार अडवले की हा किल्ला शत्रुला जिंकणे कठीणच आहे.गडाचा माथा लहान व लांबोळका आहे. चारही बाजुने ताशीव कडे असल्यामुळे तटबंदीची आवश्यकता नव्हती. पाण्याची टाकी, घरांची जोती, दारु कोठार अशा गडपणाचा खुणा किल्ल्यावर पहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरुन भास्कर, उतवड, भुंडी, फणी, वाघेरा, त्रंबकगड, अंजनेरी तसेच स्वच्छ वातावरण असल्यास सिद्धगड आणि माहूलीची रांगही दिसते.या किल्ल्याचे नाव हर्षगड का पडले ? याची एक कथा या भागात प्रसिद्ध आहे. हर्षगड उर्फ हरिहरगड हा मराठय़ांच्या ताब्यात होता तेव्हाचीही कथा एकदा मोघलांच्या एका सरदाराने किल्ल्याला वेढा घातला. किल्ला दुर्गम असल्यामुळे तो मोघलांना जिंकता येईना. गडावर फक्त पन्नास-साठ लोकांचीच शिबंदी होती. ती शिबंदी बाहेरुन होणार्‍या मदतीच्या प्रतिक्षेत होती. तर मोगल सरदार किल्ल्याची रसद रोखण्यावर भर देत होता. किल्ल्याची कोंडी केली तर मराठय़ांना अन्नपाण्याचा तुटवडा जाणवेल आणि त्यांना गड सोडावा लागेल अशी योजना आखून गडाचा वेढा आवळला होता.महिन्या दोन महिन्यात बाहेरुन मदत आली नाही. येण्याची काही आशाही दिसत नव्हती. रसदीशिवाय परिस्थिती बिकट होत आली होती. गडावर एक म्हातारी होती. तिने वेढा उठवण्यासाठी एक युक्ती केली. गडावरील शिबंदीची जेवण उरकल्यावर खरकाटय़ा पत्रवळ्या गोळा केल्या. त्याबरोबर शेकडो पत्रावळ्या मिसळून त्याही खरकाटय़ा केल्या. गडावर तोफांचे बार काढण्यात आले. नगारे कर्णे वाजवण्यात आले. गडावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे गडाखाली गोळा झालेले मोघल चकीत झाले. ते वर पाहू लागले. म्हातारीने कडय़ावरुन नेहमीप्रमाणे पत्रावळ्या खाली टाकण्यास सुरवात केली. मोघलांनी विचार केला की रोज पन्नाससाठ पत्रावळ्या खाली पडतात म्हणजे गडावर पन्नास एक लोक असावेत पण आज दोन अडीचशे पत्रावळ्या खाली पडल्या म्हणजे मराठय़ांना गडावर रसद आणि सैन्याची जादा कुमक मिळाली असावी म्हणूनच गडावर आनंदोत्सव साजरा होतोय. म्हणजे आता गड जिंकणे अवघडच की? मोघल सरदार वेढा उठवून चालता झाला. म्हातारीच्या युक्तीने वेढा उठल्याचा सर्वांना हर्ष झाला म्हणून गडाचे नाव हर्षगड असे झाले. म्हतारीच्या युक्तीची गंमत आपल्यालाही हर्षेउल्हासीत करते आणि त्याच आनंदात आपण परतीच्या मार्गावर चालू लागतो.

-श्री.प्रमोद मारुती मांडे
 

किल्ले रतनगड

Written By Nikhil Salaskar on Sunday, 23 September 2012 | 08:55

Ratangad


सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिम अंगाला हा तालुका आहे. अकोले तालुका डोंगरदर्‍यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे.रतनगडाचा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेला आहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असल
ेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणून ओळखला जातो. रतनगड आणि खुटा भंडारदरा धरणावरुन उत्तम दिसतात.भंडारदर्‍याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे.अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवर भंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचा फुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो.भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ शेडी नावाचे गाव आहे. शेंडी गाव पर्यटनाच्या सोयीच्या दृष्टीने काहीसे विकसित झाल्यामुळे सध्या पर्यटकांची याला चांगलीच पसंती आहे.मुंबई - आग्रा हा महामार्ग इगतपुरी कडून नाशिककडे जातो. या महामार्गावर इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर छोटी गाव आहे. छोटी ओलांडून पुढे गेल्यावर एक लहानशा खिंडीच्यापुढे उजवीकडे संगमनेरकडे गाडी वाट जाते. हीच वाट आपल्याला शेंडी गावात घेऊन जाते. या रस्त्यावर कळसूबाई शिखराच्या पायथ्याचे वारी गाव लागते. बारीच्या पुढे बाकी गावापासून शेंडीला जाता येते. इगतपूरी ते शेंडी साधारण ३५ कि.मी अंतर आहे.पुणे-नाशिक या राज्यमार्गावर संगमनेर हे तालुक्याचे गाव आहे. संगमनेरमधून अकोले-राजूर-शेंडी असाही गाडीरस्ता आहे. शेंडी पासून रतनगडाकडे जाता येते. भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फुगवटय़ाच्या कडेने गाडीरस्ता जातो. या मार्गाने फुगवटय़ाला पुर्ण वळसा मारता येतो. स्वत:चे वाहन असल्यास सोयीचे होऊ शकते. अथवा एस.टी.बसनेही पायथा गाठता येईल. मात्र अशा परिस्थितमध्ये किमान आठ ते दहा तास एवढा वेळ हाताशी असणे आवश्यक आहे.भंडारदर्‍याच्या खोर्‍यात अखेरचे गाव घाटघर आहे. घाटघरला शेंडीपासून एस.टी.ची सोय आहे. घाटघर साधारण शेंडीपासून २६ कि.मी. आहे. त्याच्या अलिकडे ४ कि.मी.वर साम्रद्रचा फाटा आहे. फाटय़ापासून चालत साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद गावातून रतनगडाकडे जाणारी पायवाट आहे. साम्रद गावामधून वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे. साम्रदमधून पाणी भरुन घ्यायला पाहीजे. पाणी व खाण्याचे पदार्थ तसेच वाटाडय़ाला घेवून रतनगडाकडे निघावे लागते.साधारण दीड दोन तासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडे खोल दरीतील बाणच्या मुळका आपले लक्षवेधून घेतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर पायर्‍या लागतात. या कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे. या दमछाक करणार्‍या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशदारात पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ा, दरवाजा आणि पायर्‍या या सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत.या अनामिक कारागिरांना आणि त्यांच्या कल्पकतेला दाद देतच आपण गडफेरीला सुरवात करतो. संपूर्णगड फेरी करण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पावसाळ्यानंतर प्रचंड गवत वाढलेले असते. बर्‍याचदा ते डोक्यापेक्षाही उंच असते. त्यामुळे डिसेंबर नंतर गेल्यास या गवताचा फारसा त्रास होत नाही. रतनगडाच्या उत्तरभागातून कळसूबाईची रांग आपल्याला खिळवून ठेवते. कुलंग, मदन, अलंगडाबरोबर महाराष्ट्राचे उत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो. या नेढय़ातून भन्नाट वाहणार्‍या वार्‍याचा थरार अनुभवून आपण पुढे निघतो. येथे खालच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे.गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. इथे एक नंदी आणि शिवलींग पहायला मिळते.इथून जवळच गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे.याच्या थोडे पुढे प्रशस्त गुहा आहे. जवळ पाण्याचे टाकेही आहे. ही जागा मुक्कामास योग्य आहे. येथून समोर भंडारदरा धरणाचा जलाशय, प्रवरा नदी, पाबरगड आणि महाराष्ट्रातील उंचीने दुसर्‍या क्रमांकचे पठार असलेले घनचक्करचे पठार उत्तम दिसते.गडावर मुक्कामाचा बेत आणि नियोजन नसल्यास परतीचा प्रवास दुपारी ३ वाजे पुर्वी सुरु करावा म्हणजे अंधाराच्या आत खाली पोहोचता येते.गणेश दरवाजातून शिडीच्या वाटेने खाली उतरावे लागते. या शिडय़ा अतिशय अवघड जागी बसवलेल्या आहेत. अतिशय धाडसाने व सावधानतेनेच हे दिव्य पार करावे लागते. कमकुवत मनाच्या लोकांना हे अवघड ठरु शकते. शिडय़ाउतरुन खालच्या पायवाटेने जंगलातून आपण दीड ते दोन तासामधे रतनवाडी मधे पोहोचतो.रतनवाडीमधे एक अद्भुत मंदिर आपल्याला पहायला मिळते. १० व्या ११ व्या शतकामधे झांज राजांनी १२ नद्याच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर.अमृतेश्वर मंदिराच्या नुसत्या दर्शनानेही आपला दिवसभराचा थकवा दूर होतो. भुमिज पद्धतीचे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाला दोन्ही बाजुला दरवाजे आहेत ही रचना वैशिष्ठ पुर्ण आहे.येथून साम्रद साधारण ७ कि.मी. आहे तर शेंडी २० कि.मी. आहे. दुसर्‍या रतनवाडीस येवून तेथून पुढे लाँच चालू असल्यास लाँच ने मुरशेत अथवा शेंडीला येवून आपली भ्रमंतीची सांगता करता येवू शकते.

-श्री प्रमोद मारुती मांडे
 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations