The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Latest Post
Showing posts with label शंभूराजे. Show all posts
Showing posts with label शंभूराजे. Show all posts

हिच ती जागा जिथे ओशाळला मृत्यू ……

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 17 December 2013 | 06:17


हिच ती जागा जिथे ओशाळला मृत्यू ……
तुळापुर ला गेल्यावर तिथे भिमा-भामा-इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमावरून नावे ने पलीकडील तीरावर जाता येते.
नदी पार केल्यावर समोरच्या झाडी झुडपातून वाट काढत पुढे गेल्यावर हे बांधकाम नजरेस पडते. ह्याच ठिकाणी क्रूर औरंग्याने शंभू राजांना साखळ दंडानी बांधून ठेवले होते. याच ठिकाणी त्यांच्यावर अमानुष अत्त्याचार करण्यात आले. इथेच होती त्या औरंगजेबाची छावणी.
आणि ह्याच भूमीवर रक्ताभिषेक घातला माझ्या राजानं …. हीच ती भूमी आणि इथलीच झाडे झुडपे ज्यांनी पाहिले माझ्या राजाचे बलिदान…
याच ठिकाणी शंभूराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून नदीभोवती टाकले होते. रात्री येथील गावकऱ्यांनी ते जमा करून तुळापुर आणि वढू येथे गुपचूप पणे त्या तुकड्यांना अग्नी दिला होता.
काही वर्षांपूर्वी तिथे शंकराचे मंदिर बांधावे या हेतूने काही जणांनी शंकराची पिंड आणि नंदी ची स्थापना केली होती परंतु काही कर्म दरीद्र्यांनी त्याची हि नासधूस केली. बाजूलाच पडलेली नंदी ची मूर्ती याची साक्ष अजूनही देत आहे.
(तुळापुर - आळंदी गावातून तुळापुर १० किमी वर आहे)
  - अमोल तावरे

Sambhaji Maharaj

Written By Nikhil Salaskar on Friday, 24 May 2013 | 07:21

।।प्राण नेण्यासहि भय वाटे यमाला शंभूराजा म्हणती अशा वाघराला।।

रडता आल असत तर.....

Written By Nikhil Salaskar on Saturday, 15 December 2012 | 05:08


रडता आल असत तर,
रडलो असतो आभाळ भरुन..
डाव फितुरांचा गेला स्वराज्यावर जाळ करुन..
रक्तबंबाळ देह पाहुण धरणी जाई हादरुन..
लढला छत्रपतिंचा छावा छातिचा कोट करुन..।।
पाहता आल असत तर पाहील असत डोळा भरुन..
पापन्याचा तुझ्यासाठी रे पाळणा करुन..
सळया रडल्या असतील त्या डोळ्यात शिरुन..
काळीज फाटल असेल हबशाच छाव्याच्या नजरेला भिऊन..।।
बोलता आला असत तर
बोललो असतो जगदंब म्हणुन..
तडफडली असेल जिभ दुर होताच तुझ्या पासुन..
अठवल असेल तिला "आऊसाहेब" म्हटलेल तोंड भरुन..
तळमळली असेल "आबासाहेबांच" नामस्मरण करुन..।।
ओशाळला असेल वधस्थंभ तुझ्या सावलीत बसुन..
साखळदंड हि हुंदके देत असेल तुला आवळुन..
काय अवतार जो गेला तु सहण करुन..
मुजरा करतो छाव्याला तो काळ गुडघे टेकुन..।।

संभाजी महाराज -एक लढवय्या


इतिहासाचे अभ्यासक मिलिंद कारेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहलेला हा लेख.



  कुणीतरी म्हणते  कि , ' शिवाजीने जितके केले , ते सगळे संभाजीने फुकट घालवले. ' आज हि भरपूर जणांना इतकीच माहिती आहे की , संभाजी महाराज म्हणजे विलासी आणि गाण्या बजावण्यात मश्गुल राहणारे होते. आणि त्यांना जेव्हा औरंगजेबाने पकडले तेव्हा त्यांचा अमानुष छळ केला.पण कुणी हा विचार करतो का की , ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले , तिकडे संभाजी महाराजांचे इतके हाल करायचे कारण काय ? असे काय घडले होते , की औरंगजेब इतका दुखावला होता ? महाराजांनी औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली , ( ह्या गोष्टीमुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसे महाराजांचा करतात. त्याच्या मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेब महाराजांचे बोट वाकडे करू शकला नाही , मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की , त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्या मनात इतका राग होता ?काही गोष्टी आपण विसरतो त्या म्हणजे महाराजांचे बालपण हे जिजाऊंच्या देखरेखी खाली गेले तर संभाजी महाराजांची आई , सईबाई ह्या संभाजीच्या लहानपणीच वारल्या होत्या. जिजाऊ होत्या तो काळ संभाजी महाराजांच्या आयुष्यातला चांगला कालावधी आहे. पण तरी शिवाजी महाराजांना जेव्हढा जिजाऊंचा सहवास लाभला तेव्हढा संभाजीमहाराजांना लाभला नाही. शिवाय वेळ प्रसंगी आई जेवढी कठोर होवू शकते तेवढी आजी होत नाही , हे उदाहरण आपण आपल्या घरात देखील बघू शकतो.शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते , त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा , तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि , ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार ?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , ' हत्ती तर आम्ही कसा ही घेऊन जाऊ , पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत .' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबाला सुद्धा लगावलेले आहेत.औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते , जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते , ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं . तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं . त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता . तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं . एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी .’ [संदर्भ:शहेनशहा , ना.स.इनामदार]

युवराज असून देखील दुर्दैवाने त्यांना योग्य तो मानमरातब मिळाला नाही. घरातील बेबनावांमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना स्वतःसोबत कर्नाटकच्या मोहिमेवर न घेता , श्रीरंगपुरला सुभेदार म्हणून धाडले. श्रीरंगपुर संभाजी महाराजांची सासुरवाडी होती. कर्नाटकच्या मोहिमेवरून परतत असताना महाराजांच्या स्वागतासाठी संभाजी महाराज श्रीरंगपुरच्या वेशीवर उभे होते पण शिवाजी महाराज पन्हाळा , सातारा , महाबळेश्वर मार्गे रायगडावर परतले. सगळ्या प्रजे समोर संभाजी महाराजांचा केव्हढा मोठा अपमान झाला असेल ? मानसिंगाच्या पाठीमागे उभं केल्यावर ज्या राजाला अपमानित वाटलं आणि भर दरबारात महाराजांचा आवाज चढला. बापाचा स्वाभिमान जवळून पाहिलेल्या त्यांच्या मुलाने असा अपमान झाल्यावर बंड केले नसते तरच नवल.
मराठेशाहीचे दुर्दैव हे कि संभाजी महाराज वयाच्या ३२व्या वर्षी औरंगजेबा समोर गुडघे न टेकता मातृभूमीसाठी मरणाला बहाद्दुरीने मिठी मारणार्‍या राजा बद्दल जेव्हा सकाळच्या ८:२०ची लोकल पकडण्याची काळजी करणारा आम आदमी , '' शिवाजीने जितके केले , ते सगळे...... '' बोलून अक्कल पाजळतो तेव्हा चीड येते

शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला

Written By Nikhil Salaskar on Sunday, 23 September 2012 | 08:30


शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र दारी भगवा फडकला !!
बापाने घडवल्या मुलुखाला
पुढे रेटाया आज युवराज धड़कला |
सिंहाच्या छाव्या जन्मी घालुनी ,
सयीने पुरंधारी शम्भू जोडीला !!

माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शम्भू लहणपणीच संकटाशी भिडला |
युवराज असुनही त्या दिवासी शम्भू एकाकी पडला
कळन्याअधिच आईचा पदर सरला !!

धाराऊ दुधाने बाळशम्बु सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्या तोलानेच तयाने भगवा हाती धरला |
एक समयी पाच मिहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत , शम्भूराजा अवघ्या मुलुखाची शान बनला होता !!

रायगडाच्या होळी माळावर उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता |
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शम्भू सारी हिरवी धगड़ फोडत होता !!!

गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान , आप्त्स्वकियानिच त्याचा घाट रचला होता ,
पैस्यापाई त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता |
सर्वाना पुरून उरनारा शम्भुराजा
म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!

डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता |
कवडयाच्या माळीवर हात घालनार्यावर ,
त्याअवस्तेताही शम्भुराजा भडकला होता !!!

पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हनुनच की काय तिला हा वीर स्वर्गातच पाहिजे होता |
शिवाने दिलेल्या शपतेपाई शम्भुराजा महाराष्ट्र धर्मासाठी बेचाळीस दिवस लढला
मरता मरताही भगवा कवटाळत ,
शम्भू राजाने " जग्दम्भ !! " म्हणत हिन्दवी शब्दच उच्चारला होता
 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations