The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Latest Post
Showing posts with label स्वराज्याचे मावळे. Show all posts
Showing posts with label स्वराज्याचे मावळे. Show all posts

एक महान सरसेनापती - भाग ११

Written By Nikhil Salaskar on Friday, 8 February 2013 | 00:35


संताजिच्या खूनास जबाबदार कोण? 
रियासतकार सरदेसाई ह्यांच्या मते नागोजी मानेच खरा जबाबदार, जादूनाथ सरकार म्हणतात नागोजी मानेने संताजिचा खून केला. डॉ. खोबरेकर सुद्धा नागोजी मानेलाच जबाबदार धरतात. जयसिंह पवार लिहितात की अमृतराव निम्बालकर हा नागोजी मानेचा मेहुणा. नागोजी मानेची बायको ही अमृतराव निम्बालकरची बहिण. याच अमृतारावंस संताजिने आयेवरकुट्टीच्या युद्धात मारले होते आणि त्याचा बदला म्हणुन नागोजी मानेन संताजिंस कपट नीतीने मारले.पण जेवढा नागोजी माने या खुनास जबाबदार तेवढेच खुद्द राजाराम राजे आणि धानाजी जाधव सुद्धा संताजिच्या मृत्युस कारणीभुत. संताजी हा खरा योद्धा होता आणि त्यांस राजनीतिची तितकीशी जाण नसावी. म्हणुनच जेव्हा जुल्फिकार खानाची जिंजिच्या युद्धात नाकाबंदी झाली होती, तेव्हा संताजीचा डाव मोग्लांचा पूर्ण बीमोड करण्याचा होता. पण राजारामने जुल्फिकार खानास वाट दिली आणि येथूनच दोघां मधे वादास सुरुवात झाली.धनाजी जाधव हे एक श्रेष्ट योद्धा होतेच पण त्याच वेळी ते एक उत्तम राजकारणी सुद्धा होते. हे नंतरच्या काळात प्रकर्षाने जाणवते. वास्तविक संताजी आणि धनाजी या दोघानी जिंजित जुल्फिकार खानाची कोंडी केली होती आणि खानास जेव्हा मोकळी वाट दिली गेली तेव्हा जेवढा राग संताजिंस आला होता तेवढाच धनाजिंस सुद्धा आला असणार पण त्याने राजारामच्या निर्णयाचा कुठेच विरोध केला नाही.संताजिचे युद्ध कौशल्य हे तर अद्वितीय आहे. संताजिने मोगलान विरोधात संगर्ष बुरहानपुर ते थेट जिंजी पर्यंत नेला. संताजिने गनिमी काव्याचा पुरेपुर उपयोग केला. जर का आपण संताजिचे काही युद्ध कौशल्य पाहिले तर एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे, संताजी आपल्या सैन्याचे दोन-तीन तुकडे करीत आणि अगदी अल्प शिबंदिनिशी शत्रु समोर जात. जेव्हा शत्रुस समजे की संताजी अगदी थोडक्या फौजेनिशी जात आहे. तेव्हा तो संताजिवर तुटून पड़े, युद्धास सुरुवात झाल्यावर संताजी पळ काडी आणि आड़ वाटेवर जाई. या ठिकाणी आधीच त्याने आपले बंदूकधारी पेरलेले असत. शत्रु संताजिचा पाठलाग करीत या जागी येई आणि मग बंदूकिच्या गोल्यांच्या आहारी जाई. उरलेल्या शत्रु सैन्याचा पड़ाव करण्यासाठी संताजी आपली राखीव फौज त्यांवर धाडी.संताजिने अनेक युद्धात बंदुकधारयांचा उपयोग केलेला दिसते, हे बंदुकधारी कर्नाटकातले नायक समाजातले असत.(संदर्भ - संताजी घोरपडे: जयसिंह पवार)

एक महान सरसेनापती - भाग १०



संताजी जिंजी कड़े येत असताना, वाटेत अर्काट नजिक त्यांचा मुकाबला जुल्फिकार खानाशी झाला. या युद्धात संताजिचा पाडाव झाला आणि ते पलुन गेले असे भीमसेन सक्सेना लिहितो. ते थेट गेले ते जिंजित, तिथे त्यांनी मद्रास आसपास मोहिम करण्याचे मनसूबे रचले असे कही इंग्लिश पत्रे लिहितात. पण याच दरम्यान त्यांचे आणि राजाराम राजांचे काही तरी बिनसले. नक्की काय झाले याचे दाखले कोणीच देत नाहीत.पण राजारामशी वितुष्ट येताच संताजी आपल्या २० हजार फौजेसह जिंजी बाहेर पडले. संताजिचा बीमोड करण्यासाठी खुद्द राजाराम राजे सोबतीला धनाजी जाधव, अमृतराव निमंबालकर असे वीर घेउन जिंजी बाहेर पडले. संताजिना त्यांनी आयेवरकुट्टी यथे गाठले, या दोघात मोठे युद्ध झाले आणि शेवटी राजारामचा पराजय झाला. धनाजी पलुन जाण्यात यशस्वी झाले तर अमृतराव निमंबालकर या युद्धात मारले गेले. खुद्द राजराम राजांस संताजिने कैद केले पण नंतर सन्मानाने मुक्त सुद्धा केले.जरी छत्रपतिशी वितुष्ट आले होते तरी सुद्धा संताजिने मोग्लंशी संगर्ष चालूच ठेवला. मराठ्यांच्या यदाविच्या बातम्या जुल्फिकार खानास कळल्या आणि त्याने आपली फौज अर्काट बाहेर काडली पण संताजी पुन्हा अर्काट दिशेनी येत असल्याची बातमी कळताच खान परत निघून गेला. पुढे संताजी कृष्णपट्टाम लूटले, मोगल सैन्य बघ्याची भूमिका घेत होते.नंतर संताजिने महाराष्ट्राची वाट धरली आणि येथेच त्यांचा शोकांतिकेची सुरवात झाली. राजाराम राजांनी आता भावनिक आव्हान केले होते आणि अनेक संताजिचे सैनिक पुन्हा राजरामांस जाउन मिलू लागले. हीच संधी साधून धनाजीने संताजिवर हल्ला केला आणि त्यांचा पूर्ण पाडाव केला. संताजी असह्य होउन आपल्या घराकडे निघून गेला. आता मोगल सैन्य सुद्धा संताजिच्या मागावर होते.सातारच्या प्रदेशात शंभुमहादेवचा डोंगर रांगात संताजिने आश्रय घेतला होता. शंभुमहादेवचा डोंगर रांगात मोगल सैन्य येण्यास कुचरत असे कारण हा प्रदेश घनदाट जंगलांनी वेढ़ला आहे. या अगोदर मराठयानी याच डोंगर रांगात दबा धरून अनेक मोगल सैन्याला कापून काढले होते.संताजिंच्या खुनाच्या अनेक आख्यायिका आहेत. कोणी सांगते की संताजिंस मोगल सरदार लुफ्तलुल्ला खानाने मारले. तर कोणी लिहिते की संताजिंस त्याच्याच माणसाने फितुरिने मारले, काहींच्या मते दवेदारानी मारले असे आहे. पण इतिहास जाणकरांच्या मते त्यांस नागोजी मानेने मारले असे आहे.


एक महान सरसेनापती - भाग ९



संताजी घोरपडे यांच्या आयुशातला दूसरा मोठा विजय म्हणजे बसवापट्टणची लढाई. या युद्धात संताजिने हिम्मत खान बहादुर याचा पूर्ण बीमोड केला. दोद्देरीच्या युद्धात मराठयानी कासिम खानचे कंबरडेच मोडले होते. वास्तविक कासिम खानच्या मद्तींस औरंगजेबाने हिम्मत खानास पाठवले होते.बसवापट्टणच्या जवळ हिम्मत खानाने आपला तळ टाकला होता, तो संताजीवर चालून जाण्यास कुचरत होता. एके दिवशी संताजी अगदी अल्प फौजेनिशि हिम्मत खानवर चालून गेले. हिम्मत खानास जेव्हा हे कळले तेव्हा तो सुद्धा युद्धास तयार झाला. मोगल सैन्य संताजिंवर तुटून पडले, युद्धास तोंड फुटले. मराठे युद्धात पडू लागले आणि संताजिने माघारिचे कर्ण फूंकले. आता मोग्लांस चेव चडला आणि पळणार्या मराठ्यांचा त्यांनी पाठलाग सुरु केला.संताजी बसवापट्टणच्या गडी बाहेरच्या जंगलात घुसले. त्यांच्या मागोमाग मोगल सुद्धा तिथे घुसले. जंगलात आधीच लपून बसलेल्या मराठ्यांच्या बंदुकधार्यंनी एक एक करुन मोग्लंना टिपले. युद्धाचे पूर्ण चित्रच पालटले, जे मोगल सैन्य वरचढ़ झाले होते तेच आता पाठ दाखवून पलू लागले. पण त्यांच्या परतीचा मार्ग बंद केला होता. आता हिम्मत खान सुद्धा शर्थीने लढु लागला पण बंदुकीचा एक गोला त्याच्या डोक्यास लागला आणि तो बेशुद्ध झाला. हिम्मत खानाचा मुलगा सुद्धा या युद्धात जख्मी झाला. बाप लेकास मोगल सैनिक परत कसेबसे घेउन गेले. त्या रात्री हिम्मत खान मरण पावला. खानाच्या लष्करातील अनेक घोडे, हत्ती, तोफा, शास्त्रे संताजिच्या हाती लागले.या लढ़ाईचा खाफिखान दाखला देतो.या लढ़ाई नंतर संताजी, जिंजिंस राजाराम राजांस भेटण्यासाठी निघून गेले.


एक महान सरसेनापती - भाग ८



संताजीच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दोड्डरी ची लढाई आणि दूसरी बसवापट्टणची लढाई. या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांशी होऊ शकते. संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासिम खाना बरोबर अनेक नामवंत सरदार त्यांच्या मागे पाठवले होते. कासिम खान बरोबर खानाजाद खान, असालत खान, मुराद खान, सफसिख खान असे अनेक सरदार मोठा तोफखाना, भरपूर धन, आणि काम्बक्षचे सुद्धा सैन्य दिमतीला दिले होते.संताजी मोगल सैन्याच्या हालचाली वर लक्ष ठेउन होते. त्यांना आपल्या गुप्तहेरा कडून बित्तंबातमी मिळत होती. कासिम खानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजिने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्या प्रमाणे आपल्या सैन्याच्या ३ तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासिम खानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतावण्यासाठी कासिम खानने आपले बरेच सैन्य खानाजाद खाना बरोबर तिथे पाठवून दिले. संताजिच्या दुसर्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरु केली. आता कासिम खानाची छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसर्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पूरी वाताहात करून टाकली. मोगली सैन्य रणंगण सोडून पळत सुटले आणि दोडेरीच्या गढ़ीचा आश्रय घेतला. संताजीने या गढ़ीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली.दोडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासिम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकले सोडले. कासिम खान आणि त्याचे सरदार दोरखंड लाउन एक रात्री किल्ल्यात निघून गेले, फौजेला संताजीच्या तोंडी देऊन. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद सुद्धा संपत आली. खानाचे सैन्यतर उपाशी मरू लागले. शेवटी मोग्लंनी संताजीकड़े जीवदानाची याचना केली. संताजीने मोग्लांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडणी घेतली. ही नामुष्की सहन न होउन कासिम खानाने विष पिउन आत्महत्या केली.या लढाईचे दाखले मोगल इतिहासकार देतात पण आपल्या इतिहासकारांनी या एका मोठ्या लढाईचे साधे वृत सुद्धा दिले नाही.

(संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध)


एक महान सरसेनापती - भाग ७



जुल्फिकार खानास वाट दिल्यावरून संताजी आणी राजाराम राजात वाद निर्माण झाला. वास्तविक संताजी हे एक खरे सेनानी होते त्यांना राजकारणाची तितकीशी जाण असण्याची शक्यता कमी होती. या उलट राजाराम राजांस अनेक राजकारणी मंडली सल्ले देत होती.संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले. वाटेत त्यांना कासिमखान जिंजी कड़े चालून येत असल्याची बातमी मिळाली. कासिम खानास बादशाहने जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी पाठविले होते. कांचीपुरम नजिक कावेरिपाक या ठिकाणी खान असताना संताजीने अचानक हल्ला चढ़विला. अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला आणी खान कांचीपुरमला पलुन गेला, तिथे त्याने देवलांचा आश्रय घेतला आणी धोका मिटे पर्यंत तिथेच लपून बसला.याच दरम्यान बहिर्जी घोरपडेने राजाराम विरोधात बंडखोरी केलि आणी याचप्पा नायका संगे मोगलान विरोधात लढु लागले.राजारामने संताजिंस सुद्धा सेनापति पदावरून दूर केले. आता सेनापति पद धनाजी जाधवान कड़े देण्यात आले होते. येथे एक लक्ष्यात घेण्या सारखी गोष्ट म्हणजे, सेनापतिपद गेले तरी संताजीने मोग्लान विरोधातला लढा चालूच ठेवला. ते मोग्लाना वतना साठी किंवा कुठच्या पदासाठी जाउन मिळाले नाहीत. हाच खरा मराठ्यांचा स्वातंत्र लढा जो १८५७ च्या क्रांति पेक्षा ही किती तरी पटीने सरस होता.जाने १६९५ दरम्यान संताजी ने कर्नाटकातुन मुसंडी मारली ती थेट बुरहानपुरात. मोगली सुबेदाराने प्रतिकार करण्याचा प्रयन्त केला पण मराठ्यांच्या २०००० सैन्या पुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो बुरहानपुर सोडून पलुन गेला. मराठयानी बुरहानपुर लूटले आणि ही बातमी जेव्हा औरन्ग्यास कळली तेव्हा त्याने बुरहानपुरच्या सुबेदारास बांगड्यानचा आहेर पाठवला.नंतर संताजीने सुरत लूटण्याचा बेत आखला होता पण तसे न करता त्याने वेढा घातला तो नंदुरबार शहरास. नंदुरबारच्या सुभेदाराने शहर राखण्यासाठी संताजी बरोबर लढाई केली. संताजी नंदुरबारला जास्ती वेळ वेढा घालून बसले नाहीत आणि ते परत खटाव प्रांतात आले. तिथे त्यांने अनेक मोगल सरदारांना लढाईत मारले, अनेक मोगल सरदार युद्ध सोडून पलुन गेले, अनेक सरदार कैद झाले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध)


एक महान सरसेनापती - भाग ६



पुढे हाच स्वातंत्र लढा संताजी-धनाजीने बेलगाव-धारवाड़ करत कर्नाटक प्रांतात नेला. नंतर ह्यांनी जिंजीकड़े आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शेहजादा काम्बक्ष वेढा घालून बसले होते.संताजी साधारण १५ हजाराचे घोड़दल घेउन तर धनाजी साधारण १० हजाराचे घोड़दल घेउन जिंजिंस थडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेउन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागुन येणार्या संताजिंस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजिंच्या मोगली फौजेला रसद पुरवित असे. त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले. (संदर्भ- जेधे शकावली) या लढाईची फ्रेंच गवरनर मार्टिन याने आपल्या डायरित नोंद केलि आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशा समोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली. जिंजीच्या मोगली सैन्याचीतर वाताहात झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते. त्यात किल्ल्यातुन मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावनित आला.जुल्फिकार खानने राजारामकड़े वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुक्माची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वतंत्रयुद्ध)


एक महान सरसेनापती - भाग ५




राजाराम जिंजी कड़े निसटुन जाताना त्यांना बीदनुरची राणी "चेनम्मा" हिने सहाय्य केले होते. औरंग्जेबास याचा खुप राग आला आणि त्याने जाननिसारखान, मतलबखान, व सर्जाखान यांस फौज देऊन कर्नाटकात त्या राणीचा समाचार घेण्यास पाठवले. पण ही बातमी संताजिस समजता त्यांनी या बादशाही फौजेवर आधीच हल्ला करून तिची धुलाधाण उडविली. साकी मुस्तैद खान याचे दाखले देतो. सर्जाखान हा आदिलशाही सरदार, आदिलशाही अस्ता नंतर तो मोघलांस येउन मिळाला होता. १६९० साली सर्जाखान सातारा किल्ल्यास वेढा देऊन बसला होता. त्याचा वेढा उठवण्या साठी संताजी आणि धनाजी यांनी आपल्या फौजा सातारा आसपास आणल्या. त्यांनी सर्जाखानच्या छावणीवर गनिमी हल्ले चालू केले. अशाच एक लढाइत सर्जाखान आणि त्याचा कुटुंब कबीला मराठ्यांच्या हाती लागला. हजारो मोगल सैनिक कापले गेले. नंतर एक लाख होन घेउन संताजीने सर्जाखानची सुटका केलि. (संदर्भ- जेधे शाकावली). या लढाईचे वृतांत मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर सुद्धा देतो.खटाव परिसरात संताजी-धनाजी यांनी तर विजयाचा सपाटाच लावला. एका पेक्षा एक मोघल सरदारांना पाणी पाजले. मोगल सैन्यात तर या दोघांचा इतका धाक निर्माण झाला की म्हणे मोगली घोडे पाणी पिण्यास घाबरित कारन त्याना संताजी-धनाजी पाण्यात दिसत. याच दरम्यान राजारामने संताजिंस सेनापती पदावर नियुक्त केले.





एक महान सरसेनापती - भाग ४



शंभु राजांच्या मृत्यु नंतर मोघलंनी कोकणात मुसंडी मारली. खुद्द रायगडाला विळखा पडला, जुल्फिकार खान याने रायगड आणि आसपासचा परिसर जिंकण्यासाठी पराकाष्ट केले. याच दरम्यान संताजी खर्या अर्थाने एक नेता म्हणुन उदयास आले. त्यांनी राजाराम, ताराराणी, राजसबाई यांस धनाजी बरोबर सुखरूप विळख्यातुन बाहेर काढले. राजाराम राजे प्रतापगड मार्गे वासोटा, पन्हाला करत बेदनुरच्या राणीच्या साह्याने जिंजिंस सुखरूप निघून गेले.येथे महाराष्ट्रात, शंभुराजांच्या मृत्यु आणि मराठ्यांचे राज्य संपणार या धुंधित मोघल गाफिल झाले होते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा संताजिने घेत खुद्द औरंगजेबाच्या तंबूवरील कळस कापून नेले. संताजीने आपल्या बंधू आणि विठोजी चव्हाण यांच्या साह्याने अवघ्या २००० सैन्यानिशी तुलापुर येथील मोघल छावणीवर हल्ला करुन त्यांची बहुत हानीकरुन सिंहगडावर पसार झाले. (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)नंतर संताजिंनी जुल्फिकार खानावर हल्ला केला. जुल्फिकार त्या वेळेस रायगडाला वेढा घालून बसला होता. या छाप्यात त्यांना बरीच लूट मिळाली, ती घेउन ते थेट पन्हाल्यास असलेल्या राजाराम राजांस भेटले.(संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)साधारण १६८९ (नोव्हे- डिसे) या कालात शेख निजाम कोल्हापुरास होता. ह्यास संताजिने युद्धात हरवले, मुकर्रब खान याच युद्धात जबर जख्मी झाला (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध) . पुढे त्याचा (मुकर्रब खान) कुठे उलेख सापडत नाही बहूदा तो नंतर या जख्मानमुले मेला सुद्धा असेल.


एक महान सरसेनापती - भाग ३



म्हालोजी घोरपडे हे शिवाजी महाराजांस आपल्या ५०० स्वरानिशी येउन मिळाले. म्हालोजी हे पुढे पन्हालगडाचे तटसरनौबत होते. शंभुराजे जेव्हा दिलेर खानाकडून निघून आले तेव्हा त्यांची व्यवस्था पान्हाळ्यावर केलि होती आणि सोबतीस म्हालोजी घोरपडे दिले होते. असे कापशीकर घोरपडे घराण्याचा इतिहास सांगतो.संपूर्ण शंभु राजांच्या कारकिर्दीत म्हालोजी घोरपडे हे स्वराज्य राखण्याचे चोख काम करीत होते. शिर्क्यंचे बंड मोडून काढण्याच्या वेळी स्वतः शंभु राजांच्या सोबत म्हालोजी घोरपडे हजर होते. मोगल सरदार मुकर्रब खान जेव्हा संगमेश्वर येथे शंभु राजांस कैद करण्यास पोचला तेव्हा म्हालोजी घोरपडे यांनी लढाई केलि पण ते मारले गेले.संताजी घोरपडे यांचे जन्म साल इतिहासाला माहित नाही पण जयसिंह पवारांच्या अंदाजानुसार साधारण १६४५ असू शकते. चिटणीस बखर सांगते की हंबिररावनच्या हाताखाली जे अनेक वीर होते त्यात एक संताजी घोरपडे होते. अहमदाबाद, बुराण्पुर, जाल्नापुर, सिंदखेड हे मुलुख लुटत हंबिरराव स्वराज्यात आले. हंबिररावनच्या विनंतीवरुन संताजिंस जुमलेदारी दिल्ही.दक्षिण दिग्विजय मोहिमेत कोप्पल प्रांत जिंकणे ही एक महत्वाची योजना होती. कोपल हे अदिल्शाहिचे सरदार हुसैनखान आणि कासिम खान यांचे ठाणे होते. या मोहिमेत हंबिरराव यांनी या पठाण बंधूंचा पड़ाव केला आणि कोपल स्वराज्यात सामील केले. ९१ कलमी बखर सांगते की या युद्धात संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांनी मोठे रण माजवले.पण जालन्याच्या स्वारित संताजिच्या हातुन काही तरी चुक झाली म्हणुनच महाराजांनी त्यास मुजर्यास न येण्याची शिक्षा ठोठावली असे ९१ कलमी बखर सांगते. जालनाची मोहिम ही महाराजांच्या जिवनातील शेवटची मोहिम, जालना शहर मराठयानी ४ दिवस लुटले पण लूट परत आणताना रणमस्तखान या मोगल सरदाराने हल्ला केला आणि बरीच लूट परत घेउन गेला, या यूद्घात सिधोजी निम्बालकर कामी आले.


एक महान सरसेनापती - भाग २



भोसले आणि घोरपडे घराणे हे एकाच वृक्षाच्या दोन शाखा. मुळ पुरुष सुजनसिंह हा उदयपुरच्या राजघराण्यातील होता. दक्षिणेत आल्यावर यानी हसन गंगूची सत्ता मजबूत करण्यासाठी पुष्कल मेहनत घेतली. याच सुजनसिंहच्या पणतूस (भैरवसिंह) मुधोल ची ८४ गावांची जहागीर प्राप्त झाली. भैरवसिंह यांस "भुशल धारी" असे संभोदले आहे. भुशल धारी म्हणजेच "भूतलावरिल शस्त्रधारी" म्हणजेच "क्षत्रिय योद्धा". पुढे कालांतराने भुशलचे भुशाल, भुसाल, भोसाल, भोसल, भोसला, भोसले असे हो़त गेले.मालिक उत्तुजरास खेळणा किल्ल्याच्या पायथ्याच्या जंगलात शिर्के आणि शंकरराव मोरे यांच्या फौजांनी हरवले. पण १४६९ साली मंहमद गवान याने कोकणची मोहिम हाती घेतली. यात त्याला भैरवसिंहचा पणतू कर्णसिंह आणि या कर्णसिंहचा पुत्र भीमसिंह यांची मोलाची साथ लाभली. जे सुलतानी फौजेला जमले नाही ते या पितापुत्र जोड़ीने केले. त्यांनी खेळणा किल्ला घोरपडीच्या साह्याने सर केला आणि हा दुर्गम किल्ला बहमनी सुलतानास बहाल केला. या युद्धात कर्णसिंह मारला गेला. तर भीमसिंहंस "राजा घोरपडे बहाद्दर" हा किताब बहाल करण्यात आला त्याच बरोबर घोरपडीच्या रंगाचे निशाण सुद्धा देण्यात आले. (संदर्भ- मुधोल घोरपडे घराण्याचा इतिहास)पुढे भीमसिंहचे वंशज घोरपडे बहाद्दर हे पद नावा नंतर लाऊ लागले. बाहमनी अस्तानंतर दक्षिणेत पाच शह्या निर्माण झाल्या. घोरपडे हे आदिलशाहशी एक निष्ट राहिले याचे कारण बहुतेक त्यांची जहागीर ही आदिलशाहच्या प्रांतात ये़त असावी म्हणुन असावे.चोलराजा हा घोरपडे घराण्याचा वंशज. चोलाराजचा मोठा मुलगा पिलाजी घोरपडे (बजी घोरपडे यांचे आजोबा) हा मुधोल ची जहागीर संभालून होता तर त्याचा दूसरा पुत्र वल्लभजी यांस वाई प्रांतातल्या पाटिलक्या देण्यात आल्या होत्या. याच वल्लभजीचा नातू म्हणजे "म्हालोजी घोरपडे" ज्यांना संगमेश्वरी वीर मरण प्राप्त झाले. आणि याच वल्लभजीचा पणतू म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे, ज्यांनी स्वराज्य रक्षणात मोलाची कामगिरी बजावली. (sources- डॉ.जयसिंह पवार)


एक महान सरसेनापती - भाग १

Written By Nikhil Salaskar on Thursday, 7 February 2013 | 06:12




महाराजांना एका पेक्षा एक असे सेनापती लाभले तीच परंपरा पुढे शंभुराजांच्या कालात हंबिराव मोहिते यांनी चालू ठेवली.शंभुराजांना आणि कवी कलाशंना संगमेश्वरी शेख निजाम यानि पकडले आणि त्याच वेळेस म्हालोजी घोरपडे मारले गेले. या नंतर मोग्लांनी रायगड घेतला आणि जणू मराठ्यांचे हे राज्य (महाराजांचे दिव्य स्वप्नच) नष्ट होते काय अशी परिस्तिथि निर्माण झाली. पण याच वेळेस महाराजांच्या आणि शंभु राजांच्या तल्मित तयार झालेले काही रणझुंझार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या मस्ताव्लेल्या मोघल बादशाहला गाढ़ला.या योध्यात एक आघाडिचा वीर म्हणजे "सरसेनापती संताजी घोरपडे". मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव न घेता पूर्ण होउच शकत नाही.

नाते काळ्या मातीशी..

Written By Nikhil Salaskar on Thursday, 27 December 2012 | 03:57


नशिबाच्या मागे कोण धावतो..
तलवारीच्या बळावर आम्ही नशिब आजमवितो..
कित्तेक धडकले या छातीशी..
या भुमीपुत्राचे नाते काळ्या मातीशी..

आम्ही शिवबाचे सवंगडी

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 25 December 2012 | 00:34


रायरेश्वरसह्याद्रीच्या कडेकपारी, शिवमंदिर एक । तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख ।।
आणाभाका झाल्या आमुच्या, त्याच्या साक्षीने ।
एकजुटीने राहून कोणा अंतर न देणे ।।
देशासाठी, धर्मासाठी झोकून देऊ उडी ।
मावळे आम्ही शिवबाचे सवंगडी ।।

राजगड नजीकच्या भुतोंडे गावचे सर पाटील येसाजी कंक

Written By Nikhil Salaskar on Saturday, 15 December 2012 | 04:15



राजगड नजीकच्या भुतोंडे गावचे सर पाटील असणारे येसाजी कंक म्हणजे शिवाजीराजांचे बाल सवंगडी.ह्या वंगड्याने आपल्या जीवासर्शी वेळोवेळी अगदी अखेरपर्यंत स्वराज्याची साथ दिली, जवळ जवळ ३० वर्षे येसाजी पायदळाचे सरनौबत होते.शिवाजीराजें तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते.शिवाजीराजेंच्या दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेत ते राजेंसोबत होते.छत्रपतीच्या आदेशानुसार येसाजीने गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह याच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते.अनेक विजयी मोहिमेचे नेतृत्व येसाजींनी केले होते.

शिवरायांचे सरदार येसाजी कंक हे भूतोंडेचेच




दिल्लीत औरंगजेबाच्या हत्तीची सोंड कापणारे आणि शिवाजीमहाराजांच्या विश्‍वासू सरदारांपैकी एक असलेले येसाजी कंक यांचे मूळ गाव भोर तालुक्‍यातील भूतोंडे हेच असून, त्याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आ
हेत, असा दावा त्यांचे बारावे वंशज व पंचायत समितीचे माजी उपसभापती भगवानराव कंक यांनी केला आहे.मागील आठवड्यात काही वृत्तपत्रांमध्ये ('सकाळ' वगळता) येसाजी कंक हे राजघरचे रहिवासी असल्याचा व तेथे त्यांचे समाधिस्थळ मिळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन कंक यांनी वरील दावा केला आहे. वर्तमानपत्रांना खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी राजघरच्या ग्रामस्थांचा निषेधही केला. या वेळी इतिहास संशोधक भास्कर ठाणगे, पंचायत समितीचे माजी सभापती (कै.) रामभाऊ कंक यांचे चिरंजीव शशी कंक आदी उपस्थित होते. भूतोंडे येथे लवकरच शिवसृष्टी उभारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.भगवानराव कंक म्हणाले, येसाजी कंक हे भूतोंडे गावचेच असून, त्याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. यामध्ये शिवाजी महाराजांनी येसाजी कंक यांना भूतोंडेच्या पत्यावर लिहिलेले पत्र, येसाजी कंक यांनी लढाईत वापरलेल्या तलवारी, जिरेटोप, अर्धे चिलखत, नाणी व इतर आयुधांचा समावेश आहे. इतिहास संशोधक भास्कर ठाणगे यांच्या संग्रहात येसाजी कंक यांच्या वाड्यातील बरगळ, पंचधातूचे डाय, देवपूजेचे मातीचे भांडे, मातीच्या बांगड्या या वस्तूंबरोबर औरंगजेबाची मोहोरही आहे.श्री. ठाणगे म्हणाले, येसाजी कंक शिवाजी महाराजांच्या शेतसाऱ्याचे काम पाहत होते. राजघर येथील कृष्णाजी पडवळ व सिदोजी पडवळ हे शिवरायांचे विश्‍वासू सेवक होते. राजघर येथे सापडलेली जागा ही पडवळांच्या संबंधित असू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.



भास्कर ठाणगे यांच्या संग्रहातून 1664 साली शिवरायांनी येसाजी कंक यांना लिहिलेल्या पत्राचे टिपण

(इंग्लंडमधील मराठ्यांच्या इतिहासविषयक साधनांच्या आधारे)
इ. स. 1664 आश्विन शु. तृतीया सोमवासरे
यसाजी कंक ता ! भुतावडे यांसी
यसाजी शत्रू चालून आला! एैसे वर्तमान आले
बहुत मावळे मेळवून! चालून जाणे
बहुत काय लिहिणे!


काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड.

Written By Nikhil Salaskar on Sunday, 23 September 2012 | 08:33



ओक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचड मारित सिद्दी अफ्वानी
रायगडाच्या पायथ्यास पोचला. गडास त्याने वेढा घातला. ही बातमी समजताच बाजीराव
पेशवे रायगड मोहिमेवर निघाले. जानेवारी १७३४ महिन्यात काळ नदीच्या खोर्यात
पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले. गडावरच्या मराठ्यांनाही चेव
चडला. तटसरनौबत जावजी लाड याने महादरवाजा उतरून थेट सिद्दीच्या छावणीवरच
हल्ला चडविला. मराठ्यांचा तो आवेश पाहून सिद्दयाचे सैन्य सैरावैरा पळू लागले.
त्यांनी काळकाई खिंडी मार्गे पळण्याचे ठरविले पण जावजी लाड आणि त्यांच्या
सैनिकाने सिद्द्यांचा पाठलाग केला. शत्रु सैन्यास जावजीने काळकाई खिंडित गाठले
पण तेथे सिद्यांची चौकी होती. या चौकीतील सैन्याचे बळ मिळाल्या मुले
सिद्द्याच्या पळणाऱ्या सैनिकांने उलटून मराठ्यांना तोंड दिले. आता मात्र जावजी
लाड आणि त्यांचे वीर घेरले गेले. अखेर घनघोर युद्ध झाले आणि त्यात अनेक जखमा
शरीरावर सोसत जावजी लाड धारातीर्थ पडले.
रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर एक वीर स्मारक दिसते ते जावजी लाड यांचे आहे असे
आप्पा परब सांगतात. जावजी लाड यांचा उल्लेख पेशवा दफ्तरात सुद्धा मिळतो.

गोपाळराव बर्वेंची पानिपतवर अडकलेल्या भाऊला मदत

Written By Nikhil Salaskar on Friday, 21 September 2012 | 00:30


१७६० च्या अखेरीस गोविंदपंत बुंदेला, अब्दालीची रसद मारण्यासाठी रोहिलाखंडात शिरले. पानिपत येथे मराठी सैन्याची अन्नपाण्यावाचून वाताहात झाली होती. अन्न विकत घेण्यासाठी हातात पैसा सुद्धा नव्हता, भाऊ सतत मामलेदरांकडे पैश्यासाठी तगादा लावत होते.३० डिसेंबर १७६० रोजी उत्तरेतला अजून एक मामलेदार गोपाळराव गणेश बर्वे, दहा हजाराचे अनअनुभवी सैन्य घेऊन शूजाच्या मुलु
खात घुसला.गोपाळरावांच्या मराठी शिलेदारांनी भोजपुरच्या बळकट गढीवर हल्ला चढविला. या गढीत काही उत्तम बंदुकधारी रोहिले होते पण मराठ्यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि ते पळून जवळच असलेल्या धरेमौ गढीच्या आश्रयास गेले. मराठ्यांनी आता या गढीला वेध घातला. उपासमार झाल्याने किल्लेदाराने पूर्ण ताकदीनिशी मराठ्यांवर प्रतिहल्ला केला पण या चकमकीत सुद्धा रोहिल्यांचा पूर्ण बिमोड झाला, त्यांचे अनेक सैनिक कापले गेले तर अनेक युद्ध बंदी झाले. मराठ्यांनी शूजाच्या मुलुखाची वाताहात केली आणि ते तसेच पुढे अलाहाबाद प्रांतात सरकले. अलाहाबाद जवळ असलेल्या नबाबगंज या समृद्ध पेठेवर मराठ्यांनी हल्ला केला आणि ही पेठ लुटून फस्त केली. मराठे तसेच फुलपुर्यास गेले आणि तिथे सुद्धा त्यांनी तोच प्रकार केला. गंगेच्या तीरावर मराठ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हे करण्या मागे त्यांचे मुख्य उधिष्ठ म्हणजे, शुजा ने अद्बली आणि नजीबची साथ सोडून पुन्हा आपल्या प्रांतात यावे. पण हे सगळे करायला फार उशीर झाला होता कारण पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला होता आणि हे जेव्हा गोपाळरावांस समजले तेव्हा त्यांनी ही मोहीम सोडून सैन्यासह सुखरूप कुडाजहानबादेस परत आले. खरे म्हणजे पानिपतावर मराठ्यांची वाताहत होत असताना गोपाळरावांन सारख्या एका सामान्य मामलेदाराने असा पराक्रम करणे म्हणजे भूषणास्पद गोष्ट आहे. पण दुर्दैवाने आज या गोपाळरावांचे साधे नाव सुद्धा कुणास माहित नाही, पण पानिपतच्या पराभवाचे खापर मात्र अनेक इतिहासकार आणि कादंबरीकार मामलेदारांवर फोडतात.
संदर्भ: त्र्यंबक शेजवलकरांनी मात्र गोपाळरावांची ही शौर्यगाथा "पानिपत १७६१" या त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केली आहे.

गोपाळराव बर्वेंची पानिपतवर अडकलेल्या भाऊला मदत

Written By Nikhil Salaskar on Thursday, 20 September 2012 | 00:27



१७६० च्या अखेरीस गोविंदपंत बुंदेला, अब्दालीची रसद मारण्यासाठी रोहिलाखंडात शिरले. पानिपत येथे मराठी सैन्याची अन्नपाण्यावाचून वाताहात झाली होती. अन्न विकत घेण्यासाठी हातात पैसा सुद्धा नव्हता, भा
ऊ सतत मामलेदरांकडे पैश्यासाठी तगादा लावत होते.३० डिसेंबर १७६० रोजी उत्तरेतला अजून एक मामलेदार गोपाळराव गणेश बर्वे, दहा हजाराचे अनअनुभवी सैन्य घेऊन शूजाच्या मुलुखात घुसला.गोपाळरावांच्या मराठी शिलेदारांनी भोजपुरच्या बळकट गढीवर हल्ला चढविला. या गढीत काही उत्तम बंदुकधारी रोहिले होते पण मराठ्यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि ते पळून जवळच असलेल्या धरेमौ गढीच्या आश्रयास गेले. मराठ्यांनी आता या गढीला वेध घातला. उपासमार झाल्याने किल्लेदाराने पूर्ण ताकदीनिशी मराठ्यांवर प्रतिहल्ला केला पण या चकमकीत सुद्धा रोहिल्यांचा पूर्ण बिमोड झाला, त्यांचे अनेक सैनिक कापले गेले तर अनेक युद्ध बंदी झाले. मराठ्यांनी शूजाच्या मुलुखाची वाताहात केली आणि ते तसेच पुढे अलाहाबाद प्रांतात सरकले. अलाहाबाद जवळ असलेल्या नबाबगंज या समृद्ध पेठेवर मराठ्यांनी हल्ला केला आणि ही पेठ लुटून फस्त केली. मराठे तसेच फुलपुर्यास गेले आणि तिथे सुद्धा त्यांनी तोच प्रकार केला. गंगेच्या तीरावर मराठ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हे करण्या मागे त्यांचे मुख्य उधिष्ठ म्हणजे, शुजा ने अद्बली आणि नजीबची साथ सोडून पुन्हा आपल्या प्रांतात यावे. पण हे सगळे करायला फार उशीर झाला होता कारण पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला होता आणि हे जेव्हा गोपाळरावांस समजले तेव्हा त्यांनी ही मोहीम सोडून सैन्यासह सुखरूप कुडाजहानबादेस परत आले. खरे म्हणजे पानिपतावर मराठ्यांची वाताहत होत असताना गोपाळरावांन सारख्या एका सामान्य मामलेदाराने असा पराक्रम करणे म्हणजे भूषणास्पद गोष्ट आहे. पण दुर्दैवाने आज या गोपाळरावांचे साधे नाव सुद्धा कुणास माहित नाही, पण पानिपतच्या पराभवाचे खापर मात्र अनेक इतिहासकार आणि कादंबरीकार मामलेदारांवर फोडतात.



संदर्भ: त्र्यंबक शेजवलकरांनी मात्र गोपाळरावांची ही शौर्यगाथा "पानिपत १७६१" या त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केली आहे.

कावजी कोंढाळकर एक योद्धा

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 19 September 2012 | 23:46



१६६१ च्या जानेवारी महिन्यात, महाराजांनी कोकणात उतरू पाहणार्या कारतलबखान या मोगली सरदाराचा धुव्वा उडविला आणि दक्षिण कोकणात मुसंडी मारली. ही कोकण मोहीम स्वराजासाठी फारच यशस्वी ठरली, पण जवळजवळ पाच महिने मराठी सैन्य या मुलुखात अडकून राहिले. या संधीचा फायदा उठवत शाइस्तेखानाने १६६१ च्या मे महिन्यात कल्याण काबीज केले आणि नंतर देइरीगडास वेढा घातला. या वेढ्याची जबाबदारी 
शाइस्तेखानाने सरदार बुलाखीवर सोपविली होती.महाराजांनी हा वेढा उठविण्यासाठी कावजी कोंढाळकरची रवानगी केली. कावजी कोंढाळकरांच्या मराठी सैन्याने मुघलांचे तब्बल चारशे सैनिक मारीत देइरीगडाचा वेढा उधळून लावला.याचा संदर्भ आपल्याला शि.प.सं मध्ये सापडतो.
आता प्रश्न राहतो तो म्हणजे, हा कावजी कोंढाळकर कोण?
हा संभाजी कावजी कोंढाळकर असेल (अफझलखान युद्धाच्या वेळेस मर्दुमकी गाजविणारा) का? तर या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे, कारण संभाजी कावजी या दरम्यान शाइस्तेखानास मिळाला होता.हा कावजी मल्हार (शिरवळचे ठाणे काबीज करणारा) असेल का? याचे उत्तर सुद्धा नाही कारण कावजी मल्हार यांचे पूर्ण नाव कावजी मल्हार खासनीस असे होते.
 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations