The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Latest Post
Showing posts with label छत्रपती शिवाजी महाराज. Show all posts
Showing posts with label छत्रपती शिवाजी महाराज. Show all posts

आज्ञापत्र

Written By Nikhil Salaskar on Monday, 23 December 2013 | 21:05


सातारकर छत्रपती शाहू महाराजांनी 'राज्याभिषेक शक ६१ आनंदनाम संवत्सर, मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदा, भृगुवासर' म्हणजेच इ. स. १५ नोव्हेंबर १७३४, शुक्रवार रोजी मावळ प्रांताच्या 'देशाधिकारी व लेखक' यांच्या नावे लिहीलेले आज्ञापत्र. संताजी बिन रामजी आणि खंडोजी बिन दादजी माणकर तर्फ मोसेखोरे परगणेमजकूर यांच्या सरमोकदमीच्या (सरपाटील) वतनाचा हा ताम्रपट आहे. कागद जिर्ण झाला की फाटून जातो त्यामूळे त्याची 'नकल' बनवावी लागत असे. पण ताम्रपट पिढ्यानपिढ्यांसाठी राहत असे. यामूळे, एकाच पत्राच्या अनेक नकला करून त्या फाटू नयेत म्हणून सांभाळण्याचे काम सोपे झाले.
स्रोत आणि आभार : देवदेवेश्वर संस्थान संग्रहालय, पर्वती, पुणे

शिवाजी महाराजांची समाधी

Written By Nikhil Salaskar on Sunday, 1 December 2013 | 03:48



ई. स. १९२६ पूर्वीची शिवाजी महाराजांच्या समाधीची स्थिती दर्शवणारे छायाचित्र. अष्टकोनी चौथर्‍याच्या मागे जगदीश्‍वर मंदिराचे प्रवेशद्वार व आतील मंदिराचा घुमट दिसत आहे. या छायाचित्रात अष्टकोनी चौथर्‍यावरील मध्यभागी असणारा उंचवटा स्पष्ट दिसत आहे. ई. स. १८९३ साली एफ. डी. कॅम्पबेलने तयार केलेल्या या समाधीच्या नकाशामधे अष्टकोनाच्या मध्यभागी दाखवलेला उंचवटा तो हाच हे ह्या छायाचित्रावरून सुस्पष्ट दिसते. ह्याच उंचवट्याखाली ६ फुटावर शिवप्रभूंच्या पवित्र अस्थि आणि राख एका दगडी पेटीत सुरक्षित ठेवल्या आहेत.

सर्व मावळ्यांना ३८३व्या शिवजयंतिच्या हार्दिक शुभेच्छा

Written By Nikhil Salaskar on Saturday, 30 March 2013 | 00:40


हीच आमची दिवाळी अन हाच आमचा दसरा ...............
छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस हाच आमचा सण अन हीच आमची परंपरा ................
सर्व मावळ्यांना ३८३व्या शिवजयंतिच्या हार्दिक शुभेच्छा......।।
!!! जय भवानी !!! जय शिवराय !!!

श्रीमत् शिवनृप की जय बोला



देशास्तव शिवनेरी घेई देहाला..
देशास्तव रायगडी ठेवी देहाला ..
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला ..
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ..!!!

शिवरायांची युद्धनीती

Written By Nikhil Salaskar on Friday, 4 January 2013 | 23:20




हिंदूस्थान आक्रमकांच्या पंजाखाली रगडला गेला. त्याची कारणेही तशीच होती. सर्व प्रकारची वैचारिक दुर्बलता हिंदुस्थानच्या गुलामगिरीस कारणीभूत होती. हिंद्स्थान म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी झाली होती. हे एका रात्रीत घडले नव्हते न ??????
शिवरायांनी याचा सूक्ष्म अभ्यास केला. भारतीयांनी केलेल्या चुका त्यांच्या ध्यानात आल्या. सुलतान लोकांची मर्मस्थळे हि त्यांनी तपासली. या दोहोंच्या अभ्यासातून त्यांनी स्वत:ची एक जबरदस्त युद्धनीती निर्माण केली. भारतवर्षातील हिंदू राजे हे फार शूर, पराक्रमी होते, त्यांचे सैन्यही प्रचंड होते. मग पराभव का झाला??? गाफिलपणा !!! गाढ निद्रा !!! भोळसट आशीर्वाद !!! आणखीन बरेच कारणे होती. भारताचा गतकालीन इतिहास पहिला तर दिसून येते कि शस्त्राने युद्ध लढताना भारतीयांना हरवणे कठीण गेले, पण भावनिकरीत्या कागदी करार, तह यामध्ये भारतीय फार लवकर हरले. शिवरायांच्या भाषेत म्हणायचे झाल्यास त्या राजांनी सरदारकीपेक्षा शिपाईगिरीच जास्त गाजविली. हे भारतीय राजे युक्तीने लढलेच नाहीत. शत्रूला सोडून देण्याचा आत्मघातकी उदारपणा हे राजे दाखवत असत शौर्यामध्ये पृथ्वीराज चौहान, हेमू, यादव साम्राज्य व विजयनगर साम्राज्य कुठेही कमी नव्हते. परंतु त्यांच्यापाशी विस्तारवादी महत्त्वकांक्षेचा आभाव होता. आपापसात एकजूट नव्हती. ते भावनेच्या आहारी जाऊन लढत असत, राज्यासाठी नव्हे. म्होरक्या पडला कि सैन्य पळू लागे. राजधानी जिंकली कि सारे साम्राज्य आपोआप पराभूत होत असे. त्यांची सज्जनता हि तथाकथित सहिष्णुतेच्या आदर्शवादाला बळी पडली होती आणि निष्क्रिय सज्जनता म्हणजे दुर्जनांची आक्रमकता असते. ते कधीही पर्वतांच्या आधाराने लढले नाहीत. संत महर्षींचे ज्ञान अव्हेरले गेले होते. कर्मकांडे आणि जातीभेदावर वादविवाद चालू होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इस्लामी आक्रमकांपाशी असणारे 'जिहाद' चे संमोहन अस्त्र त्यांच्यापाशी नव्हते. जिहादचे मानसशास्त्र त्यांना कधीही समजले नाही. चाणक्यानंतर एक सम्राट विक्रमादित्य सोडला तर अध्यात्मिक व धार्मिक अधिष्ठानावर आधारलेले व्यवहारिक नेतृत्त्व पुढे येऊ शकले नाही. तरीही हिंद्स्थान ह्या आक्रमकांना यशस्वीपणे तोंड देत राहिला.एकदमच मृतप्राय झाला नाही. कारण म्हणजे 'संत'. संतांनी जनतेच्या हृदयातील झरे अद्यापि बुजु दिले नव्हते. संतांनी सामान्यांना श्रद्धा व सबुरीचा मार्ग दिला होता. त्यामुळेच हिंदुस्थान अत्याचारांना पुरून उरला. एकदमच ढेपाळला मात्र नाही. संतांनी आपल्या मठांचे जाळे भारतभर विस्तारलेले होते. राजकीय क्षेत्र विभिन्न होते पण त्या मठांमुळेच संपूर्ण भारतभर अध्यात्मिक, सामाजिक समतोल साधण्याचे प्रयत्न संतांकडून केले गेले.
शिवरायांचा उदय झाला आणि भोळसट तत्त्वज्ञान मागे पडले. शिवरायांनी हे जाणले कि बुद्धीच्या बळावर जिंकली जातात. केवळ शस्त्राच्या बळावर नव्हे. राजे नेहमी गनिमी काव्याने लढत. राजांनी स्वराज्याला गनिमी कावा दिला. 'नाठाळाच्या माथी हन काठी' हि संत तुकाराम महाराजांची शिकवण राजांनी उपयोगात आणली. राजांनी संरक्षणाचे विकेंद्रीकरन केले. म्हणजेच आपले स्वराज्य डोंगरी दुर्ग, कोट, जलदुर्गामध्ये विभागून घेतले. प्रत्येक दुर्ग म्हणजे एक स्वतंत्र राजधानिच बनला. असे चारशे किल्ले स्वराज्यात होते. राजे किल्ल्यांवर खूप खर्च करतात असे काही अनाहूत हितचिंताकांना वाटले. त्यांनी राजांजवळ चिंता व्यक्त केली तेव्हा महाराज म्हणाले, " जैसा कुळंबी शेतास मला घालून शेत राखतो तैसे किल्ले राज्यास रक्षक आहेत. तारवांस (नाव) खिळे मारून बळकट करतात तशी बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या मार्गाने औरंगशहा सारख्यांची उमर गुजरून जाईल." पुढे अगदी तंतोतंत तसेच झाले. औरंगजेब मेला परंतु किल्ले आजही आपण पाहतो. दुर्ग म्हणजे स्वराज्याची शिल्पे आहेत. राजे दुर्गावर खर्च करत नव्हते, त्यांनी ती स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या भावी पिढ्यांसाठी केलेली गुंतवणूक होती. राजे दुर्गामातेचे पुत्र होते. दुर्गांची पूजा करीत असत. दुर्गांवरती राहत असत. राजांनी समुद्रावर वर्चस्व राहावे म्हणून स्वराज्याचे आरमार स्थापन केले. सिंधूदुर्ग किल्ला नव्याने बांधला. त्याचे वास्तुशास्त्र अप्रतिम आहे. आसपास जहाज फिरकू शकणार नाही अशी जागा आहे ती. राजांनी आपल्या आरमारामध्ये जलद गतीने पळणारी 'संगमिरी' जहाजे भांध्ली होती. "शिवाजी राजांच्या युद्ध नौकांचा पाठलाग करणे आपल्या नौकांना जमत नाही." असे मुंबईच्या गव्हर्नरने लंडनला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. राजांनी विजयदुर्ग किल्ल्याजवळ समुद्राखाली अर्धा किलोमीटर लांबीची एक दगडी भिंत बांधून घेतली होती. हि अतिशय रहस्यमय गोष्ट काही वर्षांपूर्वी उघड झाली आहे. आजही आपल्याला पाण्याखालील बांधकामासाठी जे परकीय तंत्रज्ञान लागते ते महाराजांनी साडे तीनशे वर्षांपूर्वीच विकसित केले होते.राजांनी आपल्या सेनेत तोफा बाळगल्या नाहीत. कारण राजे हे नेहमी गनिमी काव्याने लढायचे. अशा जलद लढाईमध्ये तोफा कुचकामी ठरत. राजांनी राजधानीसाठी रायगड किल्ल्याची निवड केली होती. इंग्रज वकील निकल्स म्हणतो कि, "अन्नाचा पुरवठा भरपूर असल्यास अल्प सैनिकांच्या सहाय्याने तो सर्व जगविरूद्ध लढू शकेल." रायगड हा हिंदुस्थानचा जिब्राल्टर आहे असे इंग्रज म्हणतात. महाराजांनी अवास्तव भावना प्रधान युद्ध परंपरा बंद केली. त्यांनी चातुर्य, मुत्सदेगिरी, मधुर लेखणी आणि तह यांचा प्रभावीपणे उपयोग केला. अफझलखानाचे युद्ध त्यांनी असेच जिंकले. जौहर आणि शायिस्तेखान यांनाही असेच जिरवले. शाइस्तेखनच्या एक लाख सैन्यामध्ये मुठभर मावळ्यांसह महाराज जातात काय !!! आणि खानची बोटे तोडून परत येतात काय !!! आग्र्याला कैदेमध्ये असताना त्या १० बाय २० फुटाच्या खोलीमध्ये महाराजांच्या पदरी कोणते सैन्य होते??? इथेच संख्याशास्त्राची मती गुंग होते. आज अमिरिकेत महाराजांवर अभ्यास करण्यासाठी तब्बल सातशे पुस्तके उपलब्ध आहेत. आपल्याकडे ????????????
शिवराय हे बुद्धीचे बळ वापरण्यात पटाईत होते. शिवरायांनी वास्तववादाला नेहमीच जास्त महत्त्व दिले होते. राजे आपल्या युद्धात सैनिकांच्या कुटुंबाची अत्यंत काळजी घेत असत. कुटुंबातील युवकांना सैन्यात नोकरी मिळे. मत भगिनींना वस्त्रे, उपहार देण्यात येउन त्यांचा सन्मान करण्यात येई. राजांनी आपल्या अचूक युद्धनीतीच्या बळावर शत्रूंना चारी मुंड्या चित केले. महाराज हयात असे पर्यंत औरंगजेब कधीही स्वराज्यात स्वत: उतरला नाही. महाराज कैलासवासी झाल्यावर तो प्रचंड सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. परंतु मराठ्यांचे दुर्ग, मराठ्यांची मने आणि मराठ्यांचे स्वराज्य तो जिंकू शकला नाही. महाराजंची गुंतवणूक स्वराज्याच्या विजयासाठी कारणीभूत ठरली.

''शिवाजी ''

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 1 January 2013 | 21:22


अधर्मा पुढे मान वाके न ज्यांची,
तयांच्या पुढे मान झुकते जगाची ,
महामोह हि स्पर्शु ज्याला शके ना,
 ''शिवाजी '' त्याची असे जात जाणा..!!



‎सर्वोत्तम अभियंता राजा...



छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सुमारे पस्तीस वर्षाच्या साधरणपणे 360 किल्ले जलदुर्गासह नवे बांधले अथवा जुने दुरुस्त केले.सिँधुदुर्ग,विजयदुर्ग सारखे भरसमुद्रातील जलदुर्ग आजही 350 वर्षे समुद्राच्या भीषण लाटा अंगावर न खचता उभे आहेत.
शिवरायांचे स्थापत्य अभियांत्रिकीमधील ज्ञान व कौशल्य पाहुन अनेक पोर्तुगीज, फ्रेँच, इंग्रज व्यापारी राज्यकर्ते आश्चर्यचकीत झाले होते.सतराव्या शतकातील बांधकाम क्षेत्रातील मर्यादा पाहता शिवरायांनी केलेले अजस्त्र बांधकाम ही एक जागतिक आश्चर्याचीच बाब आहे.जागतिक आश्चर्य म्हणुन आपण चिनी भिँतीचा उल्लेख करतो; परंतु चिनी भिँतीचे बांधकाम सुमारे सहाशे वर्षे चालले होते.शिवरायांनी अवघ्या 35 वर्षात केलेले सर्व प्रकारचे बांधकाम भितीँत विभागल्यास त्याची सुमारे चार हजार किमी लांबीची भिँत होईल. यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांना स्थापत्य अभियांत्रिकीमधील निष्णात राजाच म्हणावे लागेल. प्रत्येक बांधकामाची आखणी, बांधकाम, मजबुती उपयुक्तता, सौँदर्य आणि विशेष म्हणजे आयुष्यमान पाहता शिवरायाएवढा तज्ज्ञ स्थापत्य अभियंता दुसरा इतिहासात सापडत नाही..

माझ्या शिवबाचही एक राज्य होत ....

Written By Nikhil Salaskar on Monday, 31 December 2012 | 22:23


शिवनेरीवर पान्हा फुटला.....

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 26 December 2012 | 06:55


शिवनेरीवर पान्हा फुटला,
लालमहाली सवंगडी 

रोहिडेश्वरा कंठ फुटला,
स्वराज्याची दे ललकारी 

तोरण्यावरी तोरण बांधून,
राजगडी करी राजधानी

पुरंदरा सवे सिहगडाला,
सहजच घाले गवसणी 


छत्रपति शिवराय

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 25 December 2012 | 00:26


छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी



शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी (६जून १६७४ इ.स.) ये दिवशी हा महाराष्ट्राचा राजा सिंहासनाधिष्ठित चक्रवर्ती नृपति झाला. येणेप्रमाणे राजे सिंहासनारुढ झाले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. हा ‘मऱ्हाटा पातशाहा’ येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. शिवरायांचा निकटतम आदयं चरित्रकार कृष्णाजी अनंत ‘सभासद’ हिरेपारखी यांचे वरील वर्णन महाराजांच्या देदीप्यमान, अतुलनीय अशा राजाभिषेक सोहळयाची यथोचित माहिती देते. ज्याप्रमाणे महाराजांची प्रत्येक कृती अदभूत व असामान्य होती तद्वत त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारुन देवनागरी लिपीत पाडलेली स्वत:ची ‘नाणी’ ही एक दूरगामी व क्रांतिकारी घटना होती.बिंदूमय वर्तुळात एका बाजूला तीन ओळीत ‘श्री राजा शिव’ व दुसऱ्या बाजूस दोन ओळीत ‘छत्रपति’ असे महाराजांच्या नाण्याचे सर्वसाधारण स्वरुप होते. तसेच या मजकूराबरोबर सूर्य, चंद्र, बेलाचे पान, पिंडी, त्रिशूळ अशी काही चिन्हे ही त्या नाण्यांवर छापलेली असायची. शिवराईच्या अशा जवळपास दीडशेच्या वर वैविध्यपूर्ण आवृत्त्या मिळतात. राजाभिषेक समयी महाराजांची पाडलेली स्वभाषेतील (लिपीतील) नाणी तसेच प्रचलित पर्शियन / उर्दू शब्दांना पर्याय म्हणून संस्कृत / नागरी प्रतिशब्दांचा (राज्यव्यवहार कोश) वापर या क्रांतिकारक व स्वधर्मावरील, स्वभाषेवरील असलेल्या ज्वलंत निष्ठेची उदाहरणे आहेत. राजाभिषेक समयी इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडेन रायगडावर उपस्थित होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती त्यातील महत्त्वाचे कलम म्हणजे इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी. मात्र महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून इतर कलमे मंजूर करताना ही मागणी साफ नाकारली तसेच ग्रँट डफ तेव्हा दि. २७ मे १६७४ला हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेल्या पत्रात असे म्हणतो, ‘and especially against that wherein it incerted that Bombay money shall go current in the Rajas (शिवाजी महाराज) dominions, which will never be granted for after his coronation he intends to setup a mint, and proposes to himself great advantage thereby. (Ref. English Records on Shivaji (१६५९-१६८२), Letter no. ४८०, Page - ३६३)’औरंगजेबाच्या चरित्रकार खाफीखान तसेच ग्रँट डफ म्हणतात, शिवाजीने १६६४ मध्ये म्हणजे शहाजी राजांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर ‘राजा’ हा किताब धारण केला व स्वत:ची नाणी पाडण्यास सुरुवात केली, मात्र हे ग्राह्य धरल्यास नाण्याच्या मागील बाजूस (ध्दङ्ढध्ङ्ढध्दद्मङ्ढ) ‘छत्रपति’ हे शब्दं कसे येतील? कारण अभिषिक्तं राजाच हे शब्दं वापरु शकेल आणि शिवरायांचा राजाभिषेक १६७४ मध्ये झाला. त्या समयी त्यांनी ‘छत्रपति’ हा किताब धारण केला. म्हणून खाफीखानाचे म्हणणे ग्राह्य धरण्यास अडचण येते.मात्र शिवराई तसेच होन यांवर मूल्यदर्शक उल्लेख (फेस व्हॅल्यू)े वर्ष (मिंटिंग ईयर), कोठे पाडले याचा उल्लेख (ंमिंट-टांकसाळीचे ठिकाण) इ. बाबी छापलेल्या नाहीत. त्यामुळे केवळ धातूवरुन त्याचे महत्त्व लक्षात घ्यावे लागते. गेल्या शतकात देखील शिवराई हे नाणे पुणे व इतर भागात वापरत होते असा स्पष्ट उल्लेख दत्तो वामन पोतदार यांनी केला आहे. गेली दोन-तीन वर्षे शिवराई मुंबईतही बऱ्यापेैकी उपलब्ध होती (संग्राहकांसाठी) पण आता ती क्वचितच मिळते. महाराजांचे सोन्याचे होन हे मात्रं खूपच दुर्मिळ नाणे आहे. आज हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच होन शिल्लक आहेत. तरीही काही संशोधक तसेच अभ्यासक महाराज राज्याभिषेकाआधी नाणी पाडत असावेत असे अजून समजतात. मात्र हेन्री ऑक्झिंडेनचे वरील पत्रं साऱ्या गोष्टी स्पष्ट करणारे आहे.शिवाजी महाराजांना आपल्या हिंदू धर्माचा रास्त आभिमान होता. त्यांनी आपल्या नाण्यांवरील लिपी ही देवनागरी ठेवली तसेच मोगलांप्रमाणे सोन्याच्या मोहोरा न पाडता विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवर सोन्याचे २.७२८ ग्राम वजनाचे होन पाडले. मराठी भाषेत शिरलेल्या ‘फारसी’ (पर्शियन) शब्दांना संस्कृत प्रतिशब्दं, देवनागरी भाषेतील नाणी व चक्रवर्ती राजाप्रमाणे राजाभिषेकाद्वारे धारण केलेले छत्रपतिपद यांवरून महाराजांना स्वधर्म, स्वभाषा व स्वराज्य या गोष्टींचा निस्सीम अभिमान होता हे दिसून येते. महाराजांनी तांब्याच्या व सोन्याच्या नाण्याप्रमाणे चांदीची नाणी का पाडली नाहीत याचा उलगडा होत नाही. नाही म्हणायला ‘श्री जगदंबा प्रसन्न’ असे लिहिलेले एक नाणे उपलब्ध झाले आहे. मात्र ते शिवाजी महाराजांनी पाडले असे ग्राह्य धरण्यास कोणताही आधार नाही. जर तांबे व सोन्याच्या नाण्यांवर श्री राजा शिव छत्रपति ही अक्षरे / मजकूर असेल तर तोच न्याय चांदीच्या नाण्यास का नसावा? मात्रं गुजरातमधील एका व्यापाऱ्याकडे चांदीची शिवराई असल्याचा उल्लेख श्री. पद्माकर प्रभुणे यांनी एके ठिकाणी केला आहे. इतिहासातील उल्लेखांस पुरावा जरी अत्यावश्यक असलाच तरी केवळ पुरावा नसल्याने एखाद्या गोष्टीची शक्यता नाकारणे हे ही तितकेसे योग्य नव्हे. कारण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात त्याप्रमाणे अनेक इतिहास अभ्यसकांचा आक्षेप आहे की छत्रपति शिवरायांना लिहिता येत नव्हते कारण त्यांचे हस्ताक्षर सापडत नाही याच न्यायाने ते म्हणतात की, तसे तर औरंगजेबाचे कपडे ही आज उपलब्ध नाहीत मग काय म्हणायचे? असो. हे जरा विषयांतर झाले. मात्र छत्रपतिंचे नाव घेताच डोळया समोर येणारी नाणी म्हणजे होन आणि शिवराई. हिलाच रुका, तांबडा छत्रपति अशी ही अन्य संबोधने आहेत.तांब्याच्या या शिवराई पैश्याचे वजन साधारणत: १२ ते १४ ग्राम इतके असते, व तिचा व्यास २.५ सेंमी इतका असतो. शिवराई पैसा तसेच सोन्याचा होन हे हाती पाडले जायचे. एका बाजूची डाय (आवृत्ती) खाली, मध्ये तांब्याची पट्टी व त्यावर दुसऱ्या बाजूच्या पंचिंग रॉड किंवा हातोडयाने (ज्यावर उलटी / अक्षरे असायची) घाव घातला जायचा. त्यामुळे नाण्यावरील लिपी / लिखाण हे बरेचदा आजूबाजूला सरकलेले दिसते. या पध्दतीने पाडलेल्या नाण्यास क्रूड कॉईन्स असे म्हणतात. त्यामुळे ही नाणी साधारणत: ओबड धोबड स्वरुपात दिसतात. सह्याद्रीच्या मुलुखाप्रमाणे. सोन्याचे होन पाडण्याची पध्दतही हीच होती. मात्र त्याची डाय वेगळी असायची. कारण होनाचा व्यास १.३ सेमी इतका असायचा. बाकी मजकूर, नाण्याच्या कडेभोवती (कॉलर) बिंदूयुक्त वर्तुळ ह्या अन्य बाबी समान होत्या.स्वभाषेत पाडलेल्या या क्रांतीकारी नाण्यांची परंपरा महाराजांनंतर छत्रपति संभाजी महाराज, छत्रपति राजाराम महाराज, तसेच छत्रपति शाहू (थोरले) महाराज यांच्या कालावधीत सुरु होती. मात्रं शाहू महाराजांच्या काळात पेशव्यांनी मराठा साम्राज्य संपूर्ण हिंदुस्थानात पसरवण्यास सुरुवात केली. थेट अटकेपर्यंत मराठा सैन्याने राघोबादादांच्या नेतृत्वाखाली धडक मारली. त्यामुळे पेशवे व त्यांचे आधारस्तंभ असणाऱ्या शिंदे, होळकर, पवार, गायकवाड आदि संस्थानिक सरदारांना स्थानिक भाषेचा (पर्शियिन) आधार घ्यावा लागला. कारण इंदौर, धार, देवास, ग्वाल्हेर, बडोदा, कटक (रघुजी भोसले - नागपूरकर) असे सर्वत्र मराठा साम्राज्य विस्तारले होते. दिल्लीला कोण बादशाहा बसणार हे सुध्दा मराठेच ठरवित. आज ऐकायला नवल वाटेल की, सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर तसेच मुलतान या शहरांवर काही काळ मराठयांचा ताबा होता व त्यांच्या तेथे टांकसाळी (मिंटस्-नाणी पाडण्याची जागा) सुध्दा होत्या. असो छत्रपति शिवरायांनी निश्चितच हिंदुधर्माला व जनतेला स्वत:च्या तेजाने पुन्हा जागृत केले. त्यांना स्वधर्म, स्वभाषा व स्वराज्य यासाठी लढा देण्यास शिकवले. त्यासाठी स्वभाषेतील नाणी पाडली, संस्कृत प्रतिशब्दांचा कोष (डिक्शनरी) तयार केली.सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘स्वत्वाची’ जाणीव करुन दिली म्हणून त्यांचे यथार्थ वर्णन करताना कवी भूषण म्हणतात 
देवल गिरावते फिरावते निशाने अली
ऐसे डूबे राव-राने सबी ठाये लबकी
गौरा-गनपति आप, औरन को देत ताप
अपनी ही बार सब मारी गये दबकी
पीरा-पैगंबरा दिंगबरा दिखाई देत.
सिध्दकी सिध्दाई गयी रही बात रब की
कासी हूँ की कला जाती, मथुरा मसीद होती
सिवाजीन होतो तो सुनाति होत सब की !
अर्थ - सगळया सरदार संस्थानिकांसमोरच (अर्थात हिंदू) देवळेपाहून तेथे अलीची निशाणे लावली जात आहेत. विघ्नकर्ते, विघ्नहर्ते गौरी तसेच गणपति या संरक्षक देवता स्वत:वर पाळी येताच लपून बसल्या आहेत. जिकडे तिकडे पीर, फकीर यांचेच प्राबल्य वाढले असून साधक (साधू-पुरुष) नामशेष होऊन केवळ अल्लाचा (रब) घोष सर्वत्र उठतआहे.काशीची कला/कळा नाहीशी झाली असती, मथुरेची ही मशीद झाली असती, जर छत्रपति शिवाजी महाराज जन्मले नसते तर अवघ्यांची सुंता झाली असती.

संपूर्ण लेखन : श्री प्रशांत ठोसर ( नाणे संग्रहक , ठाणे )  

https://www.facebook.com/forts.sahyadri


शिवाजी चरित्रास भावे स्मरावे.....

Written By Nikhil Salaskar on Saturday, 15 December 2012 | 05:01


जधी दाटतो पूर्णतः अन्धकार |
दिसे मार्ग ना लक्ष्य सर्वस्वी दूर ||
आशा संकटी कोणी ना घाबरावे |
शिवाजी चरित्रास भावे स्मरावे ||

असंख्यात गेले विरोद्हत लोक |
तरी घालणेना यमलाही भिक ||
जारी सागर एवढे म्लेंच्छ आले |
शिवाजी आणि मावळे नाही भ्याले ||

करी घेऊ ते कार्य सिद्धिस नेवू |
असा सह्यनिर्धार चित्तात ठेवू ||
शिवाजी आपत्ति पुढे नाही झुकले |
जगी हिन्दवी राज्य निर्माण केले ||

सुखाला आधी लाथ मारा ध्रृतीने |
उठा मार्ग चला कडया निश्चायाने ||
जगी गांडुळासारखे ना जगावे |
उरी बाजी तानाजीला संस्मरावे ||

नका भिक घालू कधी संकटाला |
उठा ठोकारा येई ते ज्या क्षणाला ||
मनाला नसावा कधी भिती स्पर्श |
जिजाऊसुताचा जगुया आदर्श ||

महामंत्र आहे नव्हे शब्द साधा |
जयांच्या भितीने जळे म्लेंच्छ बाधा ||
नूरे देश अवघा ज्याचे आभावी |
शिवाजी जपु राष्ट्र मंत्र प्रभावी ||

जिथे मोगरा तेथ राहे सुवास |
जिथे कृष्ण तेथे जयाश्री निवास ||
शिवाजी जपू मंत्र आर्त मतीनी |
शिवाजी तिथे माय तुळजाभवानी ||

चाहू बाजुनी वादळे घेरतील |
कूणीही सवे सोबतीला नसेल ||
दिशा वाट सर्वस्वहि हारविता |
शिवाजी असे मंत्र हा शक्ति दाता ||

करी खड्ग घ्या धर्म रक्षावयाला |
यशस्वी करा दिव्य भगव्या ध्वजाला ||
उठा फडकवा दिल्लीवरती निशान |
स्मरा अंतरी नित्य शिवसुर्यआण ||

उरी ध्येय ज्वाला असे पेटलेली |
अशाना करी लागती ना मशाली ||
रवि नित्य तेवे विना तेलवात |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||

छत्रपति म्हणजे........


छत्रपति म्हणजे
जिजाउच्यां गळ्यातली मोत्याची माळ.........
छत्रपति म्हणजे
सईचं कुकंवान भरलेल कपाळ.........
छत्रपति म्हणजे
बलीदानी पुत्र ज्याचा शभुंबाळ.........
छत्रपति म्हणजे
तुकोबारायाच्यां अभंगातला टाळ.........
छत्रपति म्हणजे
सोन्याच्या नागराला चादींचा फाळ.........
छत्रपति म्हणजे
कायम अठवणीतले आभाळ.........
छत्रपति म्हणजे
कतृत्वच्या सरीने हिरवा झालेला रानमाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान भारतमातेच्या पायात बाधंली सोन्याची चाळ.........
छत्रपति म्हणजे
गनिमासाठी तुफाणी जजांळ.........
छत्रपति म्हणजे
ज्याच्यापुढ शीजली नाही मुगलाचीं डाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान स्वर्गात जाउन बाधंला सोन्याचा सात मजली ताळ.........
छत्रपति म्हणजे
औरगंजेबाला स्वप्नात् भासलेला महाकाळ.........
छत्रपति म्हणजे
भगव्या स्वराज्याचा सुवर्णकाळ.........
छत्रपति म्हणजे
येणा-या प्रत्येक पीढीचा भविष्यकाळ.........
छत्रपति म्हणजे
परक्रमाच्या काळजातला जाळ.........
छत्रपति म्हणजे
अन्यायाचा कर्दनकाळ.......

राजं यवु नगा...परत फ़िरा......

Written By Nikhil Salaskar on Saturday, 1 December 2012 | 01:27


राजं यवु नगा...परत फ़िरा
राजं यवु नगा....
तुमच्या मावळ्यांनी मिशा कापल्यात कव्हाच,
डोस्क्याच्या पगड्या सुटल्यात कव्हाच...
मावळे निजलेत ढोरावाणी...राजं...
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...
तुमचा म्हाराष्ट्र इकलाय पालकरांनी,
किल्ले लुटले तुमचे किल्लेदारांनी....
सोवळी सुटलीत कस्पटावाणी....राजं..
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...
आमच्या तलवारी गंजलात समद्या,
भिताडाला लटकत्यात दांडपट्टे आता...
भगवा आता सरंजामानी चोरला...राजं....
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...
राजं..आमचं रगात पाणी झालंय कव्हाच,
माणुसकीची सुंता झालीय राजं तव्हाच...
घरात बसतो आम्ही षंढावाणी...राजं....
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...
समदी गावं डुकरांनी भरलीत राजं...
मुलुकाचा उकिरडा बनलाय राजं....
आमच्या माना झुकल्यात लाजंनी....राजं...
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...
आमच्या लेकीबाळी संस्कार इसरल्यात राजं,
नऊवारीची लक्तरं झालीत आता राजं...
आमच्या जिजाऊ दगडाच्या हायेत... राजं..
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...
तुमची देवळं मांधली आम्ही राजं...
तुमची पुतळी मांधलीत आम्हीराजं.....
तुमच्या तसवीरीला माळा घालतो आम्ही राजं....
तुमच्यावाणी दाढी वाढिवतो आम्ही राजं....
तुम्ही हरलात...राजं तुम्ही हरलात....
तुमचा मरहट्टा पांगलाय आताकव्हाच...
तुमची कुर्बाणी इसरलाय तो कव्हाच....
फ़कस्त कुळाचं नाव गाजवतोय आम्ही..राजं.....
राजं यवु नगा...राजं तुम्ही परत फ़िरा...
राजं.....राजं.....राजं.........


शिवराज्यातले 'बारा महाल' आणि 'अठरा कारखाने' ... !

Written By Nikhil Salaskar on Friday, 30 November 2012 | 02:52




छत्रपति शिवरायांच्या काळात राज्य शासनाच्या महत्वाच्या कामासाठी विविध विभाग पाडण्यात आले होते. यात 'कारखाने' आणि 'महाल' असे २ प्रमुख भाग होते. कारखाने म्हणजे 'कार्यस्थाने' तर महाल म्हणजे 'वि
विध भांडारे'. सभासद बखरीत एकुण बारा महाल आणि अठरा कारखाने यांचे उल्लेख आले आहेत.
बारा महाल आणि अठरा कारखाने खालीलप्रमाणे ... (कंसातील नावे 'राजव्यवहारकोश' यामधून घेतली आहेत)

******बारा महाल******

१) पोते (कोशागार)

२) थट्टी (गोशाळा)

३) शेरी (आरामशाळा)

४) वहिली (रथशाळा)

५) कोठी (धान्यागार)

६) सौदागीर

७) टकसाल (मुद्राशाळा)

८) दरुनी (अंत:पुर)

९) पागा (अश्वशाळा)

१०) ईमारत (शिल्पशाळा)

११) पालखी (शिबिका)

१२) छबिना (रात्रिरक्षणं)

*****अठरा कारखाने*****

१) खजिना (कोशागारं खजाना स्यात)

२) जव्हाहिरखाना (रत्नशाळा)

३) अंबरखाना (धान्यशाळा)

४) आबदारखाना (जलस्थानम)

५) नगारखाना (आनकस्तु नगारास्यात)

६) तालीमखाना (बलशिक्षा तु तालीमं)

७) जामदारखाना (वनसागर)

८) जिरातेखाना (शस्त्रागार)

९) मुदबखखाना (पाकालयम)

१०) शरबतखाना (पानकादिस्थानम)

११) शिकारखाना (पक्षिशाळा)

१२) दारूखाना (अग्न्यस्त्र संग्रह)

१३) शहतखाना (आरोग्यगृह)

१४) पीलखाना (हत्तीगृह)

१५) फरासखाना (अस्तरणागार)

१६) उश्टरखाना (उंटशाळा)

१७) तोपखाना (यंत्रशाळा)

१८) दप्तरखाना (लेखनशाळा)

बारा महाल आणि अठरा कारखाने यांच्या मधल्या प्रत्येकावर एक अधिकारी नेमलेला होता आणि त्याने 'खाजगीच्या इतल्यात' म्हणजे 'Under Information' राहावे असे स्पष्ट नियम होते. महत्वाचे म्हणजे जर आपण कंसातील म्हणजे राज्यव्यवहारकोशामधील नावे नीट वाचली तर आपल्या लक्ष्यात येइल की ती संस्कृत व मराठी मध्ये आहेत. थोडक्यात शिवरायांनी फारसी नावे असलेल्या ह्या सर्व खात्यांना राजाभिषेका नंतर संस्कृत व मराठी नावे दिली होती.


महाराजांच्या आयुष्यात ' ८ ' या अंकाचा खूप जवळचा संबध

Written By Nikhil Salaskar on Thursday, 29 November 2012 | 09:36


श्री छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती आणि काय बोलायचे त्याच्यापुढे मी तर एक शून्यच. लहानपणापासून शिवरायांबद्दल आदर आहे जसा मोठा होत गेलो तसा आदरहि वाढला आणि मग त्यांच्याविषयीचा इतिहास वाचायला सुरुवात झाली. नववी मध्ये असल्यापासून मला इतिहास हा विषय आवडू लागला. ह्यावेळेस चौथांदा मी शिवचरित्र वाचले. त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती अशी कि महाराजांच्या आयुष्यात ' ८ ' या अंकाचा खूप जवळचा संबध आहे, योगायोग असाही समझा...
सर्व बैजवार माहिती हि अशी :-

  • महाराजांचा जन्म झाला तो दिवस व वर्ष होते १९ फेब्रुवारी १६२७ ह्यांची आकडेमोड केल्यास उत्तर '८' असे येते.
१+९+१+६+२+७ = २६= '८'

  • १७ व्या शतकपासून शिवकाळला सुरुवात झाली.
१+७ = ८

  • महाराजांच्या आठ पत्नी होत्या.
सईबाई 
सोयराबाई 
पुतळाबाई 
लक्ष्मीबाई 
काशीबाई 
सगुणाबाई 
सकवारबाई 
गुणवंताबाई 

  • महाराजांना आठ मुले होती
संभाजी महाराज 
राजाराम महाराज 
राणू                 
सखुबाई 
अंबिका            
दीपाबाई 
कमळजा        
राजकुवर 

  • महाराजांची राजमुद्रा सुद्धा अष्टकोनी होती.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते

  • महाराजांनी स्वराज्याच्या सेवेकरिता अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती.
मोरोपंत पिंगळे 
रामचंद्र नीलकंठ 
अण्णाजी दत्तो 
रामचंद्र त्रिंबक 
हंबीरराव मोहिते 
दत्ताजी त्रिंबक 
रघुनाथराव 
रावजी निराजी 

  • स्वराज्यावर चालून आलेले परकीय ज्यांच्याशी शिवरायांनी प्रखरपणे लढा दिला.

मोगलशहा 
आदिलशाह 
निझामशाह 
कुतुबशाह 
इंग्रज 
पोर्तुगीज 
सिद्दी 
स्वकीय (जावळीचे मोरे, शिर्के, सावंत इ.)

  • महाराजांच्या काळात स्वराज्यात एकूण ३५० किल्ले होते.

  • राजमाता जिजाऊ साहेबांचे देहावसान झाले ते १७ तारखेला.

  • महाराजांची समाधी सुद्धा अष्टकोनीच आहे.





आपल्या धर्माइतकाच ईतरांचाही धर्म श्रेष्ठ आहे.उपासना पद्धती वेग वेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश एकच आहे. 
-- छत्रपती शिवाजी महाराज


 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations