The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Latest Post
Showing posts with label एक पहाट रायगडावर. Show all posts
Showing posts with label एक पहाट रायगडावर. Show all posts

Ek Pahat Raigadavar 2016

Written By Nikhil Salaskar on Thursday, 20 October 2016 | 01:39


आज प्रत्येकाने आपापल्या घरी दिवाळी साजरी करायचे नवनवीन संकल्प करून त्याप्रमाणे तयारीला सुरुवात हि केली आहे. फटाके, फराळ, कपडे आणि सजावट प्रत्येक जण वेळ मिळेल तशी तयारी करतोय... पण आपल्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे घर म्हणजे गडकिल्ले यांच्या विषयी काय ? आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय ते ह्याच ऐतिहासिक वारसदारांमुळे. आजही ऐन सण-उत्सवांच्या काळात हे गडकोट अंधारात असतात. हाच अंधार दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून दिवाळी पहाट गड-किल्ल्यांवर साजरी करण्याची संकल्पना मनात आली आणि त्यानुसार 'महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती' परिवारातर्फे दिवाळी २०१२ पासून "एक पहाट रायगडावर" ह्या उत्सवाची सुरुवात करण्यात आली.अनेक वर्षांपासून दूर झालेली ती पहाट रायगडाने पुन्हा एकदा अनुभवली ! ती एक सुरुवात होतो इतिहासाचा वारसा जपण्याची...संस्कृतीला इतिहासाची जोड देण्याची :) .ह्याही वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनापासून देव-दिवाळीपर्यंत महाराष्ट्राच्या दुर्गसंपत्तीवर हा उत्सव साजरा केला जाणार आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या परिचित-अपरिचित २५ गडकिल्ल्यांच्या साथीने आपण दिवाळीची हि अनोखी पहाट अनुभवणार आहोत. सोबतीला स्वराज्याच्या मावळ्यांचे वंशज, दुर्गसंवर्धक, इतिहास अभ्यासक आणि महाराष्ट्रभरातील सर्व शिवभक्त असणार आहेत. ज्यांनी आमचे जीवन प्रकाशित केले त्या गड-किल्ल्यांवरचा अंधार दूर करण्यासाठीच्या ह्या आगळ्या-वेगळ्या उत्सवात तुम्ही सहभागी होऊ शकता. प्रत्येकाच्या हातून गडावर किमान एक पणती अथवा मशाल लागावी हा उद्देश मनात ठेऊन दरवर्षी कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. हा उत्सव तुम्हा-आम्हा सर्वांचा आहे , त्यामुळे शरीराने उपस्थित राहता आल नाही तरी मनाने आपला सहभाग नक्की दर्शवावा.
आपल्या आयुष्यातील एक क्षण ह्या गड-किल्ल्यांना देऊन बघा !!!
शिवतीर्थाच्या माथ्यावर...टकमकाच्या टोकावर
होळीच्या माळावर...जगदीशवराच्या पायर्यांवर
इतिहासाच्या सान्निध्यात...एक पहाट रायगडावर
दिनांक २९ आणि ३० ऑक्टोबर २०१६ - किल्ले रायगडावर
www.durgsampatti.com
९५९४८७५१३५ ।। ९९२०९४४९४३ ।। ९७६५१९९०८० ।। ८८०५७४५९६२ || ९७७३६७६२४५
#Durgsampatti #EkPahatRaigadavar #Diwali2016 #dipotsav #fortraigad#maharashtrachidurgsampatti

आयुष्यात कधीही न विसरता येणारी दिवाळी पहाट

Written By Nikhil Salaskar on Sunday, 15 November 2015 | 15:19



या वर्षीची दिवाळी माझ्यासाठी खुप म्हणजे खुपच ख़ास होती, कारण या वर्षीची दिवाळी पाहाट मी साजरी केली ती चक्क किल्ले रायगडावर दिपोत्सव करुन. घरी तर आपण दर वर्षी दिवाळी साजरी करतो, पण गडावर दिवाळी साजरी करण्याची मजाच काही वेगळी आहे. आणि ती ही स्वराज्याची राजधानी दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर आणि महाराजांच्या सानिध्यात म्हणजे दुग्धशर्करा योगच. गेल्या वर्षी टी.व्ही. वर हा दिपोत्सव सोहळा मी पाहिला, तेव्हाच मी ठरवले की आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घ्यायचाच. आणि ही माझी इच्छा लगेच पूर्ण झाली ती माझा मित्र अजित पाटिल आणि बेलापुर च्या 'शिवप्रेमी ग्रुप' मुळे. त्याबद्दल मी त्यांचा खुप खुप आभारी आहे. मुळात रायगडावर दिवाळी साजरी करणे ही कल्पनाच फार सुंदर आहे. कारण ज्या शिवाजी महाराजांच्या कृपेमुळे आपण आज आपली दिवाळी साजरी करतोय, आपल्या घरात रोशनाई करतोय, त्या महाराजांना आणि गडाला दिवाळीच्या सणाला मिट्ट काळोखात राहु देण ही आपल्यासाठी फार खेदाची गोष्ट आहे. यापेक्षा वाईट काही असुच शकत नाही. म्हणून ही संकल्पना ज्यांच्या मनात आली त्याचं मनापासून स्वागत.
आमच्या 'एक पहाट रायगडावर' या मोहिमेची सुरवात झाली ती लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी नरकचतुर्दशीला. मी आणि माझा मित्र आदित्य दोघेही शिवप्रेमी ग्रुप सोबत जाणार होतो. आम्ही दोघेही ग्रुप मधे नवीन होतो पण आम्हाला तशी जाणीव बिलकुल झाली नाही. पुर्ण रात्र गडावर घालवायची असल्यामुळे कसलीच घाई न्हवती. मजा मस्करी करत, महाराजांचे पोवाड़े ऐकत आम्ही रायगडाच्या पायथ्याच्या गावी म्हणजेच पाचाड ला पोचलो. पहिले दर्शन घ्यायचे ठरले ते राजमाता जिजाऊंचे. जिजाऊंची समाधि म्हणजे एक अतिशय शांत, नीरव आणि पवित्र असे स्थान. जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि एक पणती पेटऊन दिपोत्सावाची सुरवात करण्यात आली. थोडा वेळ त्या रम्य जागी विश्रांति घेऊन मग पुन्हा रायगडाकडे कुच केली. रायगडाच्या पायथ्याशी पोचलो तेव्हा दुपारचे १ वाजले होते. समोरच्याच एका छोट्याश्या हॉटेल मधे जेवणाचा कार्यक्रम उरकला कारण सर्वाना ओढ़ लागली होती ती गडावर जाण्याची. किल्ल्याचा पायथाच एक डोंगरभर उंच आणि पायथ्यावरून दिसणारा रायगड म्हणजे गरुडाच्या झेपेतहि ना बसण्यासारखाच भासत होता. महाराजांचा जयजयकार झाला, हर हर महादेव च्या घोषणा झाल्या तसे सर्वाना एकच स्फुरण चढले आणि गड चढण्यास सुरवात झाली.
माझी तशी रायगडावर यायची ही दूसरी वेळ त्यामुळे प्रत्येक पायरीबरोबर गेल्यावेळेच्या आठवणी मनात येत होत्या. माझ्या 'भटकंती unlimited' च्या सर्व मित्रांना मी खुप मिस करत होतो कारण त्यांच्या शिवाय हा माझा पहिलाच ट्रेक होता.
चढलेल्या प्रत्येक पायरी बरोबर गडमाथा आजुन जवळ येत होता. अखेर १५०० पयऱ्या क्रमित,धापा टाकत, घामाने चिंब होउन, महादरवाजा पार करुन आम्ही गडावर येऊन पोचलो. हाच तो महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणारा गड. शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. ज्याने छत्रपती शिवाजी महाराज पाहिले, छत्रपती संभाजी महाराज पाहिले, याच किल्ल्यावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याचा सुवर्णकाळ याच गडाने पाहिला. याच गडावरुन स्वराज्याच्या अनेक मोहिमा आखल्या गेल्या. महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते महाराजांच्या अंतिम काळापर्यंत राजांनी याच गडावरुन त्यांचे राज्य चालवले. याच गडावर आजची रात्र आम्हाला जागवायची होती, याचा इतिहास नव्याने जाणायचा होता, गड पुन्हा एकदा दिव्यानी ऊजाळुन टाकायचा होता.
ठरल्याप्रमाणे आम्ही गडावर येऊन पोचलो. बॅगा ठेऊन फ्रेश होऊन सगळे राजदरबारकडे निघालो. राजदरबारात छत्रचामरखाली सिंहासनावर बसलेल्या महाराजांच्या प्रतिमेला नकळत नतमस्तक व्हायला होते. कोण तो माझ्या राजाचा थाट.  राजदरबारात पहाटेच्या कार्यक्रमाची तयारी चालु होती. फुलांच्या माळा साजत होत्या, रांगोळ्या पडत होत्या, मशाली लागत होत्या. वातावरण उत्साहाने भरून गेले होतो. त्या कामात आम्हीही खारीचा वाटा उचलला आणि मग गड पाहायला सुरवात केली. संध्याकाळची वेळ, मस्त ठंड वारा सुटला होता. दिवस मावळायच्याआधी गड पहायचा होता. मग एक एक करुन शिरकाईचे मंदीर,होळीचा माळ, बाजारपेठ,हत्ती तलाव, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राणीवसा, महाराजांचे राजभवन, अष्टप्रधानांची घरे, नगारखाना,धान्याची कोठारे, खलबतखाना ही ठिकाणे पाहुन घेतली. एव्हाना सूर्यनारायण अस्तास गेले होते. गडावर ही गर्दी झाली होती.आयोजकांनी सर्वांसाठी गरमा गरम पोहे आणि चहा ची सोय केली होती. त्यावर सर्वांनी ताव मारला. गप्पा मारता मारता २ तास कसे गेले ते कळलेच नाही. जेवणाची सोय ही आयोजकानी उत्तम रित्या केली होती. जेवण संपऊन आम्ही पुन्हा राजसभेकडे जाण्याचा निर्णय घेतला. टॉर्च च्या उजेडात आम्ही राजसभेत येऊन पोचलो. कोणत्याही गडावर रात्र घालवण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. अमावसेच्या रात्री, चांदण्यांच्या प्रकाशात , मोकळ्या आभाळाखाली, घोंघावणार्या वाऱ्यात आणि बोचऱ्या थंडीत आमची मस्त पंगत बसली. इतिहासाच्या चर्चेला उधाण आले होते. गप्पाचा फड चांगलाच रंगला होता. एक एक प्रसंग डोळ्यासमोरून जात होते. आता रात्रीचे २ वाजत आले होते. कार्यक्रमाची खरी सुरवात तर आत्ता होणार होती. आयोजकांनी स्वपरिचय आणि ओळखसत्राचा एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता. त्यातून समजले की संपूर्ण महाराष्ट्रातून लोक दिवाळी साजरी करायला गडावर आले होते. जवळपास २५० ते ३०० जण गडावर दिवाळी साठी उपस्थित होते.
शिवप्रेमी ग्रुप च्या वतीने उपस्थितांना महाराजांचे पोवाडे आणि महाराजांच्या संदर्भातील भाषणाच्या सीडीज वाटन्यात आल्या.
मुख्य कार्यक्रमाची लगबग आत्ता सुरु झाली, सर्वानी पारंपारिक पोशाख चढवला. पांढरे, भगवे कुरते घालून मुले सज्ज झाली तर स्त्रिया नऊवारी नसून. काहिनी डोक्यावर फेटा घातला, चंद्रकोर तर संगळ्यांच्याच कपाळी आरूढ़ झाली होती. सगळे जण तयार होऊन पहाटे ३.३० ला जगदीश्वराच्या देऊळात जायला निघाले. तिथेच शंकराच्या पिंडिवर अभिषेक होऊन दिपोत्सवाची सुरवात होणार होती. जगदीश्वराचा गाभारा आणि मंडप लोकांनी भरून गेला होता. अभिषेक झाला आणि दिपोत्सवाला सुरवात झाली. तेवढ्यात आपला सर्वांचा लाडका अभिनेता दगडू म्हणजेच प्रथमेश परब आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचे देवळात आगमन झाले.  त्यानी सुद्धा देवळात दिवे लावण्यास मदत केली. अभिषेका नंतर सर्व जण महाराजांच्या समाधी जवळ जमा झाले. समधीजवळ मशाली शीलगावण्यात आल्या, प्रतिज्ञा झाली, एकच जयघोष झाला, एकच चैतन्य गडावरच्या वातावरणात आले होते. समाधिला वंदन करुन मशालीच्या प्रकाशात सगळे निघाले ते होळी च्या माळाकड़े. जगदीश्वर ते होळीचा माळ हा पूर्ण रस्ता मशालीच्या प्रकाशात ऊजाळुन निघाला होता. क्षणभर तर मला आपण शिवकाळातच आलो की काय असा भास झाला. होळीच्या माळावर पुन्हा जयघोष झाला आणि त्याच जयघोषात आमची प्रभात फेरि राजसभेकडे निघाली. दरबारात घोंघावणाऱ्या वाऱ्यापुढे पणत्या टिकुच शकल्या नाहीत पण मशालिंनी त्यांचे काम चोख केले. संपूर्ण राजसदर मशालीच्या उजेडात ऊजाळुन निघाली होती. डोळ्यांचे पारणे फेडणारा तो क्षण होता. सगळे तो डोळ्यात समांऊन घेत होते. कोणाच्याही डोळ्यावर झोप न्हवती, अंगात थकवा नव्हता, की थंडीची फिकिर नव्हती.
सगळ्यांच्या येण्याचे सार्थक झाले होते.
ही दिवाळी पहाट सर्वांना आयुष्य भर लक्षात राहणार होती. आता ओढ़ लागली होती ती सूर्योदयाची. तो क्षण ही अगदी लक्षात ठेवण्या सारखच होता. बाकीच्यांसाठी ती दरवर्षी प्रमाणे  फक्त एक दिवाळीतली पहाट होती पण आमच्यासाठी ती आयुष्यात कधी न विसरता येणारी  दिवाळी पहाट होती.
- कल्पेश-

एक पहाट रायगडावर

Written By Nikhil Salaskar on Monday, 26 October 2015 | 05:43


आज प्रत्येकाने आपापल्या घरी दिवाळी साजरी करायचे नवनवीन संकल्प करून त्याप्रमाणे तयारीला सुरुवात हि केली आहे.पण आपल्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे घर म्हणजे गडकिल्ले यांच्या विषयी काय ? आजही ऐन सण-उत्सवांच्या काळात हे गडकोट अंधारात असतात.हाच अंधार दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून दिवाळी पहाट गड-किल्ल्यांवर साजरी करण्याची संकल्पना मनात आली आणि त्यानुसार 'महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती' परिवारातर्फे दिवाळी २०१२ पासून
"एक पहाट रायगडावर" ह्या उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
अनेक वर्षांपासून दूर झालेली ती पहाट रायगडाने पुन्हा एकदा अनुभवली !
ह्याही वर्षी दिनांक १० आणि ११ नोव्हेंबर रोजी किल्ले रायगडावर हा उत्सव साजरा केला जाणार आहे.आपण सर्व जगभरातून कुठूनही ह्या सोहळ्यात उपस्थित राहू शकता.ज्यांना ह्या कार्यक्रमास हजर राहणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या परीने सहकार्य करावे.मदतीची कोणतीही अट नाही पण प्रत्येकाच्या हातून गडावर किमान एक पणती अथवा मशाल लागावी हि प्रामाणिक इच्छा ह्यामागे आहे.एक पणती आणि मशाल गडावर प्रज्वलित करण्याचा खर्च १५० रु येवढा होतो.प्रत्येक दिवाळीला आपल्या घरात होणार्या खरेदीच्या खर्चापेक्षा हि किंमत नक्कीच कमी आहे.हा उत्सव तुम्हा-आम्हा सर्वांचा आहे , त्यामुळे शरीराने उपस्थित राहता आल नाही तरी मनाने आपला सहभाग नक्की दर्शवावा.
आपल्या आयुष्यातील एक क्षण ह्या गड-किल्ल्यांना देऊन बघा !!!
शिवतीर्थाच्या माथ्यावर , टकमकाच्या टोकावर , होळीच्या माळावर , जगदीशवराच्या पायर्यांवर ... इतिहासाच्या सान्निध्यात "एक पहाट रायगडावर"
-------------------------------------------
निखिल साळसकर , महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती
-------------------------------------------
अधिक माहितीसाठी - www.durgsampatti.com
९५९४८७५१३५,९८२०६५८८७५,९९२०९४४९४३,९७६५१९९०८०,८८०५७४५९६२


इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत ह्यांनी 'एक पहाट रायगडावर' साठी केलेले मार्गदर्शन.

Written By Nikhil Salaskar on Thursday, 22 October 2015 | 02:12



इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत ह्यांनी 'एक पहाट रायगडावर' साठी केलेले मार्गदर्शन आणि शुभेच्छा smile emoticon

पुन्हा एकदा तोच उत्साह , पुन्हा एकदा तोच जोश ... एक पहाट रायगडावर ( वर्ष ४ थे )

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 21 October 2015 | 13:20



इतिहासाच्या सान्निध्यात पुन्हा दिवाळी साजरी करूया...पुन्हा एकदा रायगडला दिपोत्स्वाच्या प्रकाशात पाहूयाएक पहाट रायगडावर ... एक अभूतपूर्व सोहळा !
१० आणि ११ नोव्हेंबर २०१५ - किल्ले रायगड
‪#‎ekpahatraigadavar‬ ‪#‎diwali‬ ‪#‎durgsampatti‬ ‪#‎history‬ ‪#‎maharashtra‬‪#‎atrangi‬ ‪#‎rudramedia‬

रायगडावरची दिवाळी पहाट

Written By Nikhil Salaskar on Saturday, 17 October 2015 | 13:33


आता हवा हाथी हाथ...रांगड्या सह्याद्रीची साथ 
पुन्हा एकदा अनुभवू...रायगडावरची दिवाळी पहाट 
                                                                                -निखिल साळसकर 

महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती आयोजित एक पहाट रायगडावर ... एक अभूतपूर्व सोहळा !



एक पहाट रायगडावर .....एक अभूतपूर्व सोहळा !
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गड-किल्ल्यांनी समृद्ध असा आपला महाराष्ट्र. सुमारे ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती ह्याच गड-किल्ल्यांच्या साथीने.आज गडकिल्ल्यांवर फिरत असताना नेहमी एक खंत मनात येते कि गड-किल्ल्यांमुळे आपल्याला स्वराज्य मिळाले तेच गडकिल्ले ऐन सणउत्सवांच्या काळात अंधारात असतात.आपण घराघरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतो पण आजही हे गडकोट एकांतात इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.इतिहास फक्त वाचून टिकणार नाही तर तो प्रत्यक्षात जपावा लागेल हे विसरून चालणार नाही. ह्याच ऐतिहासिक वारसदारांना त्यांचे वैभव परत मिळवून देण्याच्या उद्देशाने , महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती परिवाराने सन २०१२ पासून ' एक पहाट रायगडावर ' ह्या उत्सवाला सुरुवात केली. ज्यांनी आमचे जीवन प्रकाशित केले त्या गड-किल्ल्यांवरचा अंधार दूर करण्याचा हा एक नाविन्यपूर्ण प्रयत्न होता.दिवाळी जवळ आली कि प्रत्येक जण खरेदीच्या धावपळीत असतो , दिवाळी पहाट सारख्या कार्यक्रमाला हजेरी लावले हे तर नित्याचेच होऊन बसले आहे. पण रायगडावरची हि हटके दिवाळी पहाट प्रत्येकाने अनुभवावी अशी आहे. दरवर्षी लक्ष्मीपूजनाला मशालींच्या प्रकाशात संपूर्ण रायगडावर दीपोत्सव साजरा केला जातो.
ह्या आगळ्या वेगळ्या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त मोठ्या जल्लोषात सहभागी होतात. ह्याही वर्षी दिनांक १० आणि ११ नोव्हेंबर २०१५ रोजी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आले.गडावर जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरून व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना ह्या कार्यक्रमास प्रत्यक्ष सहभागी होता येनार नाही त्यांनी स्वखुशीने कार्यास मदत करावी .हे गडकोट आपल्या सर्वांचे आहेत , त्यामुळे प्रत्येकाच्या हातून किमान एक पणती अथवा मशाल गडावर लागावी हाच उद्देश ह्यामागचा आहे.एक पणती गडावर लावायचा खर्च प्रत्येकी १० ते १५ रु आणि एका मशालीचा खर्च ११५ रु एवढा होतो ,प्रत्येक दिवाळीला आपल्या घरात होणार्या खरेदीच्या खर्चापेक्षा हि किंमत नक्कीच कमी आहे. ज्यांना ज्या पद्धतीने मदत करणे शक्य होईल त्यांनी त्या परीने करावी.जे शिवभक्त सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत त्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करावा.गडावर येताना कोणत्याही प्रकारचे फटाके सोबत आणू नये.
कार्यक्रमाची माहिती परिवाराच्या www.durgsampatti.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
अमोल तावरे - ९७६५१९९०८०
स्वप्नील घाडीगावकर - ९९२०९४४९४३
सुबोध आंग्रे - ९७७३६७६२४५
हर्ष पवळे - ८८०५७४५९६२
शैलेश कंधारे - ९९२३४९३५०६
अंबादास डांगे - ९८८१२१२१८४
सुप्रभा बहिरम - ९८८१८५३५४८
निखिल साळसकर - ९५९४८७५१३५

Ek Pahat Raigadavar 2015

Written By Nikhil Salaskar on Friday, 16 October 2015 | 14:01


एक पहाट रायगडावर ... एक अभूतपूर्व सोहळा !

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 13 October 2015 | 12:28


एक पहाट रायगडावर - Ek Pahat Raigadavar

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 5 November 2013 | 22:31

शिवतीर्थ रायगड येथे दि . ०३. ११. २०१३ रोजी पहाटे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. गतवर्षीपासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते ,यंदाही " महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती " परिवाराच्या माध्यमातून हि परंपरा कायम ठेवण्यात आली .शिवतीर्थ रायगड हा या हि वर्षी राज्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्या २००० पणत्या आणि ५० माशालींच्या प्रकाशातून न्हाऊन निघाला .महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ किल्ले रायगड येथे साजऱ्या केलेल्या या अनोख्या दिपोत्सावासाठी महाराष्ट्रभरातून १५० हून अधिक शिवभक्त आले होते ,ह्यात ३ वर्षाच्या छकुली पासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्व जन मोठ्या उत्साहात सहभागी झाले .
गडावर येणाऱ्या प्रत्येकाने किमान एक पणती सोबत आणावी असे आवाहन करण्यात आले होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला .

ह्यापुढेही असे नाविन्यपूर्ण उपक्रम दुर्गसंपत्ती परिवारातर्फे आयोजित करण्यात येतील

ए बी पी माझा ह्या वृत्तवाहिनीने सदर सोहळ्याचा घेतलेला आढावा
लिंक : https://www.youtube.com/watch?v=wMnrAii9fAc
एक पहाट रायगडावर - काही निवडक छायाचित्र खास तुमच्यासाठी
छायाचित्र साभार : अनुप , अक्षय , सुहास  

















एक पहाट रायगडावर - Ek Pahat Raigadavar

Written By Nikhil Salaskar on Sunday, 20 October 2013 | 01:40

ज्यांना ह्या कार्यक्रमास हजर राहणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या परीने सहकार्य करावे
प्रत्येकाने किमान एक "पणती" स्वतः तर्फे द्यावी .....
एक पणती गडावर लावायचा खर्च प्रत्येकी ५ रु येवढा होतो .......
प्रत्येक दिवाळीला आपल्या घरात होणार्या खरेदीच्या खर्चापेक्षा हि किंमत नक्कीच कमी आहे .......
आपल्या आयुष्यातील एक क्षण ह्या गड-किल्ल्यांना देऊन बघा ....
महाराजांचे मावळे आहोत .....त्याप्रमाणेच राहू
पुन्हा एकदा रायगडला दिपोत्स्वाच्या प्रकाशात पाहू .....

"एक पहाट रायगडावर"
येत्या दिवाळीत दिनांक २ आणि ३ नोव्हेंबर रोजी किल्ले रायगडावर
संपर्क :
मुंबई :९५९४८७५१३५,९७७३६७६२४५,९९२०९४४९४३
पुणे :९८६०७२१७२८,८८०५७४५९६२,९७६५१९९०८०
नाशिक : ९८९०११५०४७


एक पहाट रायगडावर ( वर्ष २ रे ) - Ek Pahat Raigadavar

साजरी करूयात दिवाळी गड-किल्ल्यांच्या सहवासात
दिनांक २ आणि ३ नोव्हेंबर २०१३ ( शनिवार आणि रविवार )
ठिकाण : किल्ले रायगड
संपर्क
मुंबई :९५९४८७५१३५,९७७३६७६२४५,९९२०९४४९४३
पुणे :९८६०७२१७२८,८८०५७४५९६२,९७६५१९९०८०
नाशिक : ९८९०११५०४७

एक पहाट रायगडावर २०१२ - Ek Pahat Raigadavar 2012

ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण सण- उत्सव साजरे करत आहोत त्यांनाच अंधारात ठेऊन कस चालेल ???
कोणत्या न कोणत्या स्वरुपात प्रत्येक किल्ल्यावर दिवाळी साजरी झाली पाहिजे ह्या अनुषंगाने २०१२ पासून 
" एक पहाट रायगडावर " ह्या उपक्रमास सुरुवात केली .

पहिल्याच वर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला
संपूर्ण महाराष्ट्रातून शिव भक्तांनी दिलेल्या १४५६ पणत्या रायगडावर प्रज्वलित करण्यात आल्या
पणत्यांच्या मंद प्रकाशात संपूर्ण रायगड उजळून गेला .
ह्या कार्यक्रमास ५० मावळे उपस्थित होते .
शिवाजी ट्रेल्स दुर्गसंवर्धन संघटनेचे मिलिंद सर आणि त्यांच्या परिवाराने मोलाचे सहकार्य केले


ह्याही वर्षी मोठ्या जल्लोषात ह्या अनोख्या सोहळ्याच आयोजन करण्यात आल आहे
दिनांक २ आणि ३ नोव्हेंबर २०१३ रोजी रायगडावर पुन्हा एकदा दीपोत्सव रंगणार आहे
तुम्हा सर्वांना ह्या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण 

एक पहाट रायगडावर
साजरी करूयात दिवाळी गड-किल्ल्यांच्या सहवासात
दिनांक २ आणि ३ नोव्हेंबर २०१३ ( शनिवार आणि रविवार )
ठिकाण : किल्ले रायगड
संपर्क :
मुंबई :९५९४८७५१३५,९७७३६७६२४५,९९२०९४४९४३
पुणे :९८६०७२१७२८,८८०५७४५९६२,९७६५१९९०८०
नाशिक : ९८९०११५०४७


एक पहाट रायगडावर

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 18 December 2012 | 08:25




 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations