शिवकालातिल गडांची रचना आणि देखभालीची व्यवस्था यासाठी काही विशेष उपाययोजना राबविन्यात येत .....
१) एका किल्ल्याच्या शेजारी दूसरा डोंगर नसावा.असला तरी सुरुंग लावून पाडून गडाच्या आहारी आणावा.नाहीतर तो डोंगर सुद्धा बांधकाम करून दूसरा किल्लाच बनवावा.
२) बांधकाम मजबूत करावे
३) दरवाजा बांधताना तो सर्व बाजूने होणारे हल्ले चुकवून बुरुज बांधून रचाव.
४) गडाला दोन पेक्षा जास्त दरवाजे असावेत,चोरवट असावी.
५) गडावर यायचे मार्ग अवघड करून ठेवावेत .गडाभोवती मुद्दाम झाडी वाढवावी.म्हणजे हल्ल्याच्या वेळेस झाडीमागेसुद्धा सैन्य लपवून मारा करता येत असे.
६) पाणी आणि इतर व्यवस्था उपलब्ध आहे की नाही हे पहावे.
७) गडावरील राजाच्या निवास्थानापेक्षा इतर इमारती उंच बंधू नयेत.
८) दारुकोठाराची व्यवस्था जलरोधक ,कडेकोट असावी.
९) गडावर ब्राम्हण,ज्योतिषी,सुतार,लोहार,चांभार त्यांच्या त्यांच्या हत्यारानसाह ठेवावेत.ज्यावेळी त्यांच्या कौशल्याची गरज नसेल त्यावेळी त्यांच्याकडून गडावरील इतर चाकरी करून घ्यावी.
Post a Comment