The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Latest Post

दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर

Written By Nikhil Salaskar on Tuesday 17 October 2017 | 05:10


दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांचा परिचय
● भारतातील ११०० हुन अधिक किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट
● भारतातील २००० हुन अधिक किल्ल्यांचा ज्ञानकोश
● ४५ वर्षे सह्याद्रीत पदभ्रमण करणारा सह्याद्रीपुत्र, ऋषितुल्य ट्रेकर
● किल्ले, स्मारके, मंदिरे यांची मिळुन २ लाखहुन अधिक छायाचित्रे संग्रहात
● महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ३५० हुन अधिक किल्ल्यांची माहिती जनतेसाठी उपलब्ध करून देणारे पहिले दुर्गप्रेमी
● कोल्हापूरचे छत्रपती शाहु महाराज यांच्याकडून 'दुर्गमहर्षी' किताबाने गौरव.
● अपरिचित शिवाजी, कथा क्रांतिकारकांच्या विषयावर १२०० हून अधिक व्याख्याने, ४०० हुन अधिक स्लाईड शो
● दुर्गभांडार, Heritage Forts of India , आझादी के दिवाने हि प्रसिध्द प्रदर्शने
● महाराष्ट्रासह अनेक राज्यात २०० हुन अधिक किल्ले, क्रांतीकारकांच्या चित्रांची प्रदर्शने भरवली
● ५००० हुन अधिक दुर्मिळ पुस्तके, ४५० क्रांतीकारकांच्या पेंटीग्सचा वैयक्तिक संग्रह
● क्रांतीकारकांवरील संशोधनासाठी रिटायरमेंटचे सर्व पैसे खर्च करणारा राष्ट्रप्रेमी
● क्रांतीकारकांवरील संशोधन ग्रंथाला पंतप्रधानांची प्रस्तावना, इंग्रजी, गुजराथी, कन्नड भाषेतही प्रकाशित
● पुणे व्हेन्चरर्स, वडवानल प्रतिष्ठान, श्री राजगड स्मारक मंडळ, गड किल्ले सेवा समिती, लोकसेवा अकादमी यासह अनेक संस्थांचे संस्थापक सदस्य
● टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, पुणे परिचय, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य, पुढारी, सामना, चित्रलेखासह अनेक वृत्तपत्रे, मासिके यात लेखन
● छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगड ते आग्रा आणि आग्रा ते राजगड या ६३०० किमी मार्गावरुन दोन वेळा प्रवास करुन संशोधन आणि चित्रीकरण. ABP Maza कडून प्रकाशित.
● आपल्या कार्यातुन हजारो शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्स, तरुण इतिहास अभ्यासक तयार केले.
● “गड किल्ले महाराष्ट्राचे” या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची इत्यंभुत आणि प्रमाण माहिती देणाऱ्या महाग्रंथाचे लेखक.
● पुस्तके - गडकिल्ले महाराष्ट्राचे, सह्याद्रीतील रत्नभांडार, स्वातंत्र्यसंग्रामातील समिधा, स्वातंत्र्यसंग्रामातील अंगार, स्वातंत्र्यसंग्रामातील अग्निशलाका, १११ क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र (मराठी, इंग्रजी, गुजराती, कन्नड)
● प्रदर्शने- आझादी के दिवाने (क्रांतिकारकांच्या जीवनावरील प्रदर्शन)
सह्याद्रीतील रत्नभांडार (किल्ले, मंदिरे, लेणींच्या फोटोंचे प्रदर्शन)
हेरिटेज फॉर्ट्स ऑफ इंडिया (भारतातील किल्ल्यांचे व वास्तुंचे भव्य प्रदर्शन)

एक पहाट रायगडावर...लक्ष्मीपूजनाची पहाट गड-किल्ल्यांच्या सोबतीने

Written By Nikhil Salaskar on Monday 31 October 2016 | 06:52


Ek Pahat Raigadavar 2016

Written By Nikhil Salaskar on Thursday 20 October 2016 | 01:39


आज प्रत्येकाने आपापल्या घरी दिवाळी साजरी करायचे नवनवीन संकल्प करून त्याप्रमाणे तयारीला सुरुवात हि केली आहे. फटाके, फराळ, कपडे आणि सजावट प्रत्येक जण वेळ मिळेल तशी तयारी करतोय... पण आपल्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे घर म्हणजे गडकिल्ले यांच्या विषयी काय ? आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय ते ह्याच ऐतिहासिक वारसदारांमुळे. आजही ऐन सण-उत्सवांच्या काळात हे गडकोट अंधारात असतात. हाच अंधार दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून दिवाळी पहाट गड-किल्ल्यांवर साजरी करण्याची संकल्पना मनात आली आणि त्यानुसार 'महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती' परिवारातर्फे दिवाळी २०१२ पासून "एक पहाट रायगडावर" ह्या उत्सवाची सुरुवात करण्यात आली.अनेक वर्षांपासून दूर झालेली ती पहाट रायगडाने पुन्हा एकदा अनुभवली ! ती एक सुरुवात होतो इतिहासाचा वारसा जपण्याची...संस्कृतीला इतिहासाची जोड देण्याची :) .ह्याही वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनापासून देव-दिवाळीपर्यंत महाराष्ट्राच्या दुर्गसंपत्तीवर हा उत्सव साजरा केला जाणार आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या परिचित-अपरिचित २५ गडकिल्ल्यांच्या साथीने आपण दिवाळीची हि अनोखी पहाट अनुभवणार आहोत. सोबतीला स्वराज्याच्या मावळ्यांचे वंशज, दुर्गसंवर्धक, इतिहास अभ्यासक आणि महाराष्ट्रभरातील सर्व शिवभक्त असणार आहेत. ज्यांनी आमचे जीवन प्रकाशित केले त्या गड-किल्ल्यांवरचा अंधार दूर करण्यासाठीच्या ह्या आगळ्या-वेगळ्या उत्सवात तुम्ही सहभागी होऊ शकता. प्रत्येकाच्या हातून गडावर किमान एक पणती अथवा मशाल लागावी हा उद्देश मनात ठेऊन दरवर्षी कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. हा उत्सव तुम्हा-आम्हा सर्वांचा आहे , त्यामुळे शरीराने उपस्थित राहता आल नाही तरी मनाने आपला सहभाग नक्की दर्शवावा.
आपल्या आयुष्यातील एक क्षण ह्या गड-किल्ल्यांना देऊन बघा !!!
शिवतीर्थाच्या माथ्यावर...टकमकाच्या टोकावर
होळीच्या माळावर...जगदीशवराच्या पायर्यांवर
इतिहासाच्या सान्निध्यात...एक पहाट रायगडावर
दिनांक २९ आणि ३० ऑक्टोबर २०१६ - किल्ले रायगडावर
www.durgsampatti.com
९५९४८७५१३५ ।। ९९२०९४४९४३ ।। ९७६५१९९०८० ।। ८८०५७४५९६२ || ९७७३६७६२४५
#Durgsampatti #EkPahatRaigadavar #Diwali2016 #dipotsav #fortraigad#maharashtrachidurgsampatti

अतरंगी कट्टा

Written By Nikhil Salaskar on Friday 3 June 2016 | 01:39



हल्ली वर्तमानपत्रात हमकास एक बातमी लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे "१०वी - १२वी नंतर काय ?" प्रत्येकाला भविष्यात काही ना काही बनायचे असते आणि ते साध्य करण्यासाठी तो नेहमीच मार्गदर्शनाच्या शोधात असतो. निकाल लागला कि पुढचा प्रवास सुरु होतो पण नेमकी सुरुवात कुठून करायची हा प्रश्न अनेकांना असतो. आज देशभरात अशी अनेक क्षेत्र आहेत ज्यात करियर करू इच्छीणारे अनेक आहेत पण तिथपर्यंत पोहोचणारे फार कमी !
कला क्षेत्राचा विचार केला तर हि गोष जास्त निदर्शनास येते. सिनेमात- नाटकात काम करणारे म्हणजे कलाकार
अशी व्याख्या सध्या प्रचलित झालीय. मुळात अभिनेता आणि कलाकार ह्यातला फरक जाणून घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक अभिनेता हा एक कलाकारच असतो कारण तो त्याच्याकडे असणारी नवरसांनी बहरलेली एक कला सदर करत असतो. कलाकार म्हणजे एखाद्या कलेला आकार देणारा अथवा ती आत्मसात करून सादर करणारा अथवा जपणारा.
भारतीय संस्कृतीनुसार असंख्य विद्या आणि कला अस्तित्वात आहेत , किंबहुना अनेक नव्या कला-कलाकार आकार घेत आहेत. १०वी-१२वी च्या निकालानंतर अनेकांना हाच प्रश्न पडतो कि पुढे काय ? आपल्याला जी कला अथवा विद्या शिकायची आहे त्याची सुरुवात कशी करावी आणि मार्गदर्शन कोणाकडून घ्यावे ?
ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला अतरंगी कट्ट्या मध्ये मिळतील.
अतरंगी कट्टा हे एक असे फिरते व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी तुम्हाला १४ विद्या आणि ६४ कला त्या आत्मसात केलेल्या प्रतिष्ठीत कलाकारांकडून जाणून घेता येतील, तुम्हाला एखाद्या कलेत करियर करायचं असल्यास त्या संबंधी योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. अतरंगी कट्टा हे कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही एखाद्या कलेबद्दल अधिक जाणून घेऊ शकता, ती कला स्वताहून शिकू शकता आणि कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकता.
प्रत्येकात काही न काही गोष्ट असते, फक्त ती समजायला उशीर होतो अथवा समजली असली तरी ती जगासमोर कशी आणायची हा मोठा प्रश्न पडतो.
आता विचारात पडण्याची काही गरज नाही, आतापर्यंत कलेच्या मंदिराचा शोध घेतलात ह्यापुढे अतरंगी कट्टा स्वतहा तुमच्यापर्यंत विविध विद्या आणि कलेचे भांडार घेऊन येणार आहे. तर मग लागा तयारीला आणि हो तुमच्याकडेही काहीतरी अतरंगी गोष्ट असेल तर आम्हाला नक्की कळवा !
Contact : Nikhil Salaskar - 9594875135
Facebook Page : www.facebook.com/atrangistudios

१४ विद्या आणि ६४ कला आणि त्या आत्मसात केलेले असंख्य कलाकार आता एकाच व्यासपीठावर.

Written By Nikhil Salaskar on Saturday 21 May 2016 | 04:12

https://www.facebook.com/atrangistudios
भारतीय संस्कृतीने अगदी प्राचीन काळापासून जगाला दिलेल्या असंख्य गोष्टींपैकी १४ विद्या आणि ६४ कला हा एक अनमोल ठेवा आहे.
दैनंदिन जीवनात ह्यातील काही गोष्टी मूळ स्वरुपात तर काही नव्याने सादर केल्या जातात. आजच्या आधुनिक युगात अश्याच लोप पावत चाललेल्या अपरिचित विद्या आणि कलेचे एकत्रितपणे साकारलेले व्यासपीठ म्हणजेच 'अतरंगी कट्टा'.अस्तित्वात असणारी विद्या अथवा कला योग्य व्यक्तीकडून शिकण्याबरोबरच त्या संदर्भात अधिक अभ्यास करणे आणि कालारुनुप होणारे बदल आत्मसात करणे हेही तितकेच महत्वाचे आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन Atrangi Katta निर्मिती करण्यात आली आहे. कट्टा हि एक अशी जागा आहे जिथे वेगवेगळ्या स्वभावाचे, हुद्द्याचे, वयाचे लोक एकत्र येत असतात. अतरंगी कट्टा हे एक असे व्यासपीठ आहे ज्यावर १४ विद्या, ६४ कला आणि त्या आत्मसात केलेल्या अश्या असंख्या कलाकारांकडून त्यांच्याकडे असलेली गोष्ट शिकण्याची, त्यावर अभ्यास करण्याची आणि इतर कलाकारांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. smile emoticon
चौदा विद्या 
 ४ वेद - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद
४ उपवेद - न्याय, मीमांसा, पुराण व धर्मशास्त्र
६ वेदांग - व्याकरण, ज्योतिष, निरुक्त (वेदांमधील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र), कल्प (धार्मिक विधी व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र), छंद (काव्य शास्त्र), शिक्षण (अध्ययन-अध्यापन)
चौसष्ट कला 
 १. भाषाज्ञान - देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.
२. गीतज्ञान - गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान - खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९. वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५. पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७. कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.
१९. प्रहेलिका - कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०. प्रतिमाला - अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१. काव्यसमस्यापूर्ती - अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे.
२३. चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे.
२४. कायाकल्प - वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५. माल्यग्रंथ विकल्प - वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
२६. गंधयुक्ती - सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७. यंत्रमातृका - विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८. अत्तर विकल्प - फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९. संपाठय़ - दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०. धारण मातृका - स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१. छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३. मणिभूमिका - भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४. द्यूतक्रीडा - जुगार खेळणे.
३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
३६. माल्यग्रथन - वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७. मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८. मेषकुक्कुटलावक - युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९. विशेषकच्छेद ज्ञान - कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४०. क्रिया विकल्प - वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१. मानसी काव्यक्रिया - शीघ्र कवित्व करणे.
४२. आभूषण भोजन - सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३. केशशेखर पीड ज्ञान - मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४. नृत्यज्ञान - नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
४६. तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७. केशमार्जन कौशल्य - मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८. उत्सादन क्रिया - अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९. कर्णपत्र भंग - पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०. नेपथ्य योग - ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१. उदकघात - जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२. उदकवाद्य - जलतरंग वाजविणे.
५३. शयनरचना - मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४. चित्रकला - नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५. पुष्पास्तरण - फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६. नाटय़अख्यायिका दर्शन - नाटकांत अभिनय करणे.
५७. दशनवसनांगरात - दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८. तुर्ककर्म - चरखा व टकळीने सूत काढणे.
५९. इंद्रजाल - गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६०. तक्षणकर्म - लाकडावर कोरीव काम करणे.
६१. अक्षर मुष्टिका कथन - करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२. सूत्र तथा सूचीकर्म - वस्त्राला रफू करणे.
६३. म्लेंछीतकला विकल्प - परकीय भाषा ठाऊक असणे.
६४. रत्नरौप्य परीक्षा - अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.

शिवजन्म आणि त्यादिवशीची खगोलीय स्थिती

Written By Nikhil Salaskar on Saturday 26 March 2016 | 00:29




आज फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे शिवाजीराजे यांचा तिथीनुसार जन्मदिवस!
आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची जयंती दोनदा साजरी केली जाते. दि.१९ फेब्रुवारी या दिवशी इंग्रजी तारखेनुसार आणि फाल्गुन वद्य तृतीया या तिथीला जो दिवस येतो त्यादिवशी.
शिवाजी महाराजांची जयंती केव्हा साजरी करायची, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि आपले संविधान तसे प्रत्येकाला स्वातंत्र्य देत आहेच.
याच विषयावर दि १९ फेब्रुवारी रोजी मी एक पोष्ट टाकली होती आणि त्यात जर तुम्ही तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या पक्षाचे असाल तर ती दरवर्षी दि १९ फेब्रुवारीला साजरी न करता दि १ मार्च रोजी करावी असे तार्किक आणि विज्ञानाचा आधारे माझे मत मी मांडले होते.
वैयक्तिक मत विचाराल तर शिवजयंती ही तिथीनुसार म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीयेला येणाऱ्या दिवशी साजरी करावी अशा मताचा मी पुरस्कर्ता आहे. त्याचे खगोलीय कारण असे कि ज्यादिवशी तुमचा जन्म झाला त्या तिथीला आणि जन्मवेळी आकाशात नक्षत्र आणि तारकांची जी स्थिती होती तीच स्थिती दरवर्षी तुमच्या जन्मतिथीला येणाऱ्या दिवशी आणि जन्मवेळी नेमकी तशीच्या तशीच असते.
अर्थात तुमच्या जन्मतिथीचं आणि वेळेचे आकाश त्यानंतर त्याच तिथीला आणि वेळेला अनेक वर्षानंतरही तसेच्या तसेच असेल. आपल्या हिंदू कालगणनेची हीच खासियत आहे.
फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजन्माच्यावेळी खगोलीय स्थिती काय होती हे समजून घेण्यापूर्वी शिवजन्मासंबंधी उपलब्ध असलेले अस्सल संदर्भ काय म्हणतात ते पाहू..
शिवछत्रपतींच्या जन्माच्या समकालीन नोंदी.......
शके १५५१ शुक्ल संवछरे
फाल्गुन वद्य त्रिती
या शुक्रवार नक्षत्र
हास्त घटी १८ पळे ३२
गड ५ पळें ७ ये दिवसी
राजश्री सीवाजी राजे सि
वनेरीस उपजले
संदर्भ : जेधे शकावली
भूबाणप्राणचन्द्रादै: सम्मिते शालिवाहने |
शके संवत्सरे शुक्ले प्रवृत्तेचोत्तरायणे ||२६||
शिशिरर्तौ वर्तमाने प्रशस्ते मासि फाल्गुने |
कृष्णपक्षे तृतीयायां निशि लग्ने सुशोभने ||२७||
अनुकूलतरैस्तुगसंश्रयै: पञ्चभिर्ग्रहै: |
व्यंजिताशेषजगतीस्थिरसाम्राज्यवैभवम् ||२८||
अपारलावण्यमयं स्वर्णवर्णमनामयं |
कमनीयतमग्रीवमुन्नतस्कन्धमण्डलम् ||२९||
अलिकान्तमिलत्कान्तकुन्तलाग्रविराजितम् |
सरोजसुन्दरदृशं नवकिंशु कनासिकम् ||३०||
सहजस्मेरवदनं घनगंभीरनिस्वनम् |
महोरस्कं महाबाहुं सुषुवे साभ्दुतं सुतम् ||३१||
अर्थ २६-३१ : शालिवाहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी उत्तरायणांत शिशिरऋतूमध्ये फाल्गून वद्य तृतीयेला रात्री शुभ लग्नावर, अखिलपृथ्वीचे साम्राज्यावैभव व्यक्त करणारे पाच ग्रह अनुकूल व उच्चीचे असतांना तिनें अलौकीक पुत्ररत्नास जन्म दिला. त्याचें लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, मान अत्यंत सुंदर व खांदे उंच होते; त्याच्या कपाळावर सुंदर क़ंतलाग्रें पडल्यमुळे तें मोहक दिसत होंतें; त्याचे नेत्र कमळाप्रणें सुंदर, नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी, मुख स्वभावत: हसरे, स्वर मेखासारखा गंभीर, छाती विशाल आणि बाहू मोठे होते.
संदर्भ :- कवीन्द्र परमानंदकृत
श्रीशिवभारत(अध्यय ६वा)
संपादक:- सदाशिव महादेव दिवेकर
शिवरायांचा जन्म हस्त नक्षत्रावर झाला अस समकालीन संदर्भातून आपल्याला कळत आणि त्यावेळी उदीत रास सिंह होती असही लक्षात येत. त्यांची जन्मवेळ साधारण सायंकाळी ६.३० ते ७ च्या आसपास असावी आणि ठिकाण अर्थात किल्ले शिवनेरी होत हे आपण जाणताच.
आता आपल्या कालगणनेतील 'तिथी' म्हणजे नेमके काय असते ते पाहूया.
# तिथी ही शुद्ध भारतीय संकल्पना आहे. चंद्राच्या कलेशी तिथीचा घनिष्ट संबंध आहे. प्रतिदिनी सूर्य सुमारे १ अंश तर चंद्र सुमारे १३.३३ अंश अंतर कापतो. चंद्र आणि सूर्य या दोघांच्या गतीची दिशा पूर्वेकडे असते. याचाच अर्थ सूर्याच्या संदर्भात चंद्र (१३.३३ – १) १२ अंश अंतर कापतो. त्यामुळे १२ अंशाची १ तिथी होते. प्रतिपदेला चंद्र आणि सूर्य यांच्यातील अंतर १२ अंश या क्रमाने शुक्ल पक्षात तृतीयेला हेच अंतर १२ x ३ म्हणजेच ३६ अंश असते तर कृष्ण पक्षात तृतीयेला हेच अंतर १८०-(३ x १२) = १८० – ३६ = १४४ अंश असते. शिवरायांचा जन्म वद्य तृतीयेला म्हणजे कृष्ण पक्षातील असल्याने त्यादिवशी चंद्र सूर्यातील अंतर १४४ अंश असले पाहिजे.
# आपली पृथ्वी १ तासात १५ अंशातून परिवलन करते. ( ३६० अंश भागिले २४ तास ) त्यामुळे पृथ्वीच्या १२ अंशातील परीवलनास ५० मिनिटांचा कालावधी लागतो आणि म्हणूनच चंद्र दररोज ५० मिनिटे उशिरा उगवतो.
# शिवाजी महाराजांच्या जन्मवेळी चंद्र स्थिती कशी होती?
फाल्गुन वद्य तृतियेला सूर्य मावळला त्यावेळी चंद्र १२ अंश x ३ = ३६ अंश पूर्व क्षितिजाच्या खाली होता. हे ३६ अंशाचे अंतर पृथ्वीला कापायाला सुमारे २.५ तास लागतील (तासाला १५ अंश या गतीने). याचाच अर्थ शिवजन्म दिवशी सूर्यास्त जर ६.३० ला झाला असेल तर त्या रात्री फाल्गुन वद्य तृतीयेची चंद्र कोर ६.३० + २.३० म्हणजेच सुमारे रात्री ९ च्या आसपास पूर्व क्षितिजावर उगवली असेल. चंद्र हस्त नक्षत्रात असेल. हस्त नक्षत्राचा हा उल्लेख आणि संदर्भ शिवरायांच्या जन्मवेळेच्या वरील नोंदीत दिसून येतो.
आकाशातील ही नक्षत्र-स्थिती आपल्याला ‘Sky Map Pro 8’ या सोफ्टवेअरच्या सहाय्याने, शिवजन्माची ग्रेगेरीयान इंग्रजी तारीख म्हणजेच दि. १ मार्च १६३० त्या प्रणालीला देऊन संगणकाच्या पडद्यावर पहाता येते आणि ताडून घेता येते.
चित्र क्र १ मधून आपल्याला नेमके हेच लक्षात येईल. यात दिसणारी आकाशाची स्थिती त्यादिवशी रात्रौ ९ ची आहे. यात आपल्याला स्पष्ट दिसून येतय की पूर्वक्षितिजावर कन्याराशीत आणि हस्त नक्षत्रात चंद्राचे स्थान (बाणाने दर्शवले आहे) आहे.
Sky Map Pro 8 या सोफ्टवेअरचा उपयोग करून ही स्थिती झूम करून पाहिल्यास आपल्याला तृतीयेची चंद्रकोर त्यात स्पष्ट नजरेस येईल. अथवा पडद्यावरील चंद्रावर क्लिक केल्यास आपल्याला ही प्रणाली चंद्र ९०% प्रकाशमान असल्याचे दर्शवते. शिवजन्माचा कृष्ण पक्ष असल्याने आणि पौर्णिमेनंतरची ही तृतीया असल्याने चंद्रबिंब ९०% प्रकाशित असणे अगदी स्वाभाविक आहे.
यावरून शिवजन्माची तिथी, त्या दिवशीचे आकाश, नक्षत्रस्थिती आणि चंद्रस्थान व तिची कोर यांची संगणक आणि सोफ्टवेअरच्या साहाय्याने आपण अचूक सांगड घालू शकतो. हे सर्व वर उल्लेखिलेल्या समाकालीन संदर्भांशी अचूक जुळणारे आहे.
त्यानंतरच्या पुढच्या चित्रात शिवजन्माच्या वेळेची (फाल्गुन वद्य तृतीया – ग्रेगेरीअन दिनांक १ मार्च १६३०) आकाशातील नक्षत्र आणि तारे यांची स्थिती दर्शवली आहे. त्यात पूर्व क्षितिजावर साधारण संध्याकाळी ७ वाजता सिंह रास उगवताना स्पष्ट दिसत आहे.
तर शेवटच्या चित्रात त्याच तिथीला आणि वेळेला परंतू आज म्हणजेच दि २६ मार्च २०१६ या दिवशी, शिवजन्मानंतर ३८६ वर्षानंतरही नेमकी शिवजन्माच्या वेळी असलेली आकाशातील नक्षत्रांची स्थिती जशीच्या तशी पाहायला मिळते. अगदी तिळमात्रही फरक या दोन भिन्न काळातील आणि भिन्न दिवसांच्या आकाशातील स्थितीत दिसून येत नाही.
शिवजन्माच्या दिवशी आकशातील खगोलीय स्थितीचा विचार करताना आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आणि ती म्हणजे...
चंद्र आणि इतर ग्रह यांना “Wanderers in the Sky” अस म्हणल जात आणि ते आपली आकाशातील स्थिती सारखी बदलत असतात. त्यामुळे फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजन्माच्यावेळी चंद्र आणि ग्रह यांची जी स्थिती आकाशात होती ती आज ३८० वर्षानंतर तशीच असेल अस होणार नाही.
आपल्या कालगणनेची ही महती आहे. आपले गुढीपाडवा, दिवाळी , नवरात्र , दसरा हे सर्व सण आणि उत्सव आपण तिथीनुसारच साजरे करतो. मग त्यात “शिवजयंती” हा जो आपणा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा राष्ट्रीय सण आहे तोही तिथीप्रमाणेच साजरा व्हायला हवा अस नाही का वाटत?
संदर्भ: # प्रा मोहन आपटे लिखित, “खगोलीय शिवकाल”
# शिवजन्म समकालीन अस्सल संदर्भ- श्री हितेश कटारे www.facebook.com/kavirajbhushan
 
- पराग लिमये
फाल्गुन वद्य तृतीया , इंग्रजी दि २६ मार्च २०१६.

एक पहाट राजगडावर

Written By Nikhil Salaskar on Sunday 15 November 2015 | 15:29

_/\_ सुरुवात महाउत्सवाची _/\_
पवन मोरे आणि त्यांच्या सहकार्यांनी ह्या वर्षी किल्ले राजगडावर एक पहाट राजगडावर हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला.
उत्सव महाराष्ट्राचा, उत्सव शिवभक्तांचा 
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अभेद्य गड-किल्ल्यांचा









 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations