आज प्रत्येकाने आपापल्या घरी दिवाळी साजरी करायचे नवनवीन संकल्प करून त्याप्रमाणे तयारीला सुरुवात हि केली आहे. फटाके, फराळ, कपडे आणि सजावट प्रत्येक जण वेळ मिळेल तशी तयारी करतोय... पण आपल्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे घर म्हणजे गडकिल्ले यांच्या विषयी काय ? आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय ते ह्याच ऐतिहासिक वारसदारांमुळे. आजही ऐन सण-उत्सवांच्या काळात हे गडकोट अंधारात असतात. हाच अंधार दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून दिवाळी पहाट गड-किल्ल्यांवर साजरी करण्याची संकल्पना मनात आली आणि त्यानुसार 'महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती' परिवारातर्फे दिवाळी २०१२ पासून "एक पहाट रायगडावर" ह्या उत्सवाची सुरुवात करण्यात आली.अनेक वर्षांपासून दूर झालेली ती पहाट रायगडाने पुन्हा एकदा अनुभवली ! ती एक सुरुवात होतो इतिहासाचा वारसा जपण्याची...संस्कृतीला इतिहासाची जोड देण्याची
:) .ह्याही वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनापासून देव-दिवाळीपर्यंत महाराष्ट्राच्या दुर्गसंपत्तीवर हा उत्सव साजरा केला जाणार आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या परिचित-अपरिचित २५ गडकिल्ल्यांच्या साथीने आपण दिवाळीची हि अनोखी पहाट अनुभवणार आहोत. सोबतीला स्वराज्याच्या मावळ्यांचे वंशज, दुर्गसंवर्धक, इतिहास अभ्यासक आणि महाराष्ट्रभरातील सर्व शिवभक्त असणार आहेत. ज्यांनी आमचे जीवन प्रकाशित केले त्या गड-किल्ल्यांवरचा अंधार दूर करण्यासाठीच्या ह्या आगळ्या-वेगळ्या उत्सवात तुम्ही सहभागी होऊ शकता. प्रत्येकाच्या हातून गडावर किमान एक पणती अथवा मशाल लागावी हा उद्देश मनात ठेऊन दरवर्षी कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. हा उत्सव तुम्हा-आम्हा सर्वांचा आहे , त्यामुळे शरीराने उपस्थित राहता आल नाही तरी मनाने आपला सहभाग नक्की दर्शवावा.
आपल्या आयुष्यातील एक क्षण ह्या गड-किल्ल्यांना देऊन बघा !!!
शिवतीर्थाच्या माथ्यावर...टकमकाच्या टोकावर
होळीच्या माळावर...जगदीशवराच्या पायर्यांवर
इतिहासाच्या सान्निध्यात...एक पहाट रायगडावर
दिनांक २९ आणि ३० ऑक्टोबर २०१६ - किल्ले रायगडावर
www.durgsampatti.com
९५९४८७५१३५ ।। ९९२०९४४९४३ ।। ९७६५१९९०८० ।। ८८०५७४५९६२ || ९७७३६७६२४५
#Durgsampatti #EkPahatRaigadavar #Diwali2016 #dipotsav #fortraigad#maharashtrachidurgsampatti

Post a Comment