





"महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती" परिवार आयोजित
एक पहाट रायगडावर . . . ( वर्ष २ रे )
साजरी करूयात दिवाळी गड-किल्ल्यांच्या सहवासात
दिनांक २ आणि ३ नोव्हेंबर २०१३ ( शनिवार आणि रविवार )
ठिकाण : किल्ले रायगड
सोबत आपल्या संपूर्ण परिवाराची .......भेट रायगडाची
दोपोत्सवाच्या जोडीला ....साथ भगव्याची
जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा ......
ज्यांना ह्या कार्यक्रमास हजर राहणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या परीने सहकार्य करावे
प्रत्येकाने किमान एक "पणती" स्वतः तर्फे द्यावी .....
एक पणती गडावर लावायचा खर्च प्रत्येकी ५ रु येवढा होतो .......
प्रत्येक दिवाळीला आपल्या घरात होणार्या खरेदीच्या खर्चापेक्षा हि किंमत नक्कीच कमी आहे .......
आपल्या आयुष्यातील एक क्षण ह्या गड-किल्ल्यांना देऊन बघा ....
महाराजांचे मावळे आहोत .....त्याप्रमाणेच राहू
पुन्हा एकदा रायगडला दिपोत्स्वाच्या प्रकाशात पाहू .....
===================================
कार्यक्रमाचे स्वरूप .....
दिनांक २ नोव्हेंबर २०१३ ( धनत्रयोदशी )
दुपारी १२ वाजेपर्यंत आपल्या परिवारातील सर्व शिवप्रेमींनी पाचाडला पोहोचावे जेणेकरून पुढील कार्यक्रमाची आखणी करण्यास सोपे जाईल.
सर्व मावळे एकत्र जमल्यावर काही जण दीपोत्सवाचे सामान घेऊन गडावर निघतील आणि त्यांच्या मागे इतर जन मार्गस्थ होतील
गडावर पोहोचल्यावर प्रथमतः गडवत येणाऱ्या दुर्ग प्रेमींना दुर्ग दर्शन
घडविण्यात येईल त्याच वेळेस इतर मावळ्यांनी पुढील तयारीला लागायचे आहे .
रात्री स्नेह-भोजन करून जगदीश्वराच्या आणि दिपोत्स्वाच्या अंतिम तयारीला सुरुवात होईल
दिनांक ३ नोव्हेंबर २०१३ ( नरक चतुर्थी )
पहाटे २ नंतर जगदीश्वराच्या अभिषेकला सुरुवात झाल्यावर दिपोत्स्वाची सुरुवात होईल
पहाटे ३ ते ५ ..... न भूतो न भविष्यती .....असा दिपोत्सव
सकाळी १० नंतर सर्वांनी परतीच्या प्रवासाला निघायचे आहे
====================================
कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्वांना सूचना .......
कृपया करून गडावर येताना कोणीही फटाके आणू नयेत
.....प्रदूषण करून निसर्गाची हानी करणे हे आपल्या परिवाराच्या तत्वात बसत
नाही .....आपण इतिहासाच्या सान्निध्यात दिवाळी साजरी करणार आहोत
.........प्रदुषणाच्या नाही
तरी कृपया हि आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती
====================================
संपर्क :
९५९४८७५१३५ , ९७६५१९९०८०
आपलाच
महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती परिवार
महाराष्ट्र
Post a Comment