The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » * लोहगड दुर्गभ्रमंती *

* लोहगड दुर्गभ्रमंती *

Written By Nikhil Salaskar on Wednesday, 6 July 2011 | 05:27


१७ जुलै २०११

आयोजक : "महाराष्ट्राची दुर्गसंपत्ति"
ठिकाण : मळवली
श्रेणी : सोपी
उंची : ३४२० फु.
गडाची माहिती : लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिस सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्‍यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला.इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

१७ जुलै २०११ रोजी सकाळी निघून त्याच दिवशी रात्री परतायचे आहे .
शुल्क : २५०  रु. ( सकाळ-संध्याकाळ चहा नाश्ता , दुपारचे जेवण )
नोंदणी शुल्क : १०० रु.

प्रवासाची माहिती :
मुंबई
रविवार १७ जुलै २०११
सकाळी ५:४० वा. इंद्रायणी एक्सप्रेस (मुंबई छत्रपती शिवाजी ट.)
ही गाड़ी ८:०० वा. लोणावळा स्टेशन ला पोहोचते.
लोणावळा लोकल ने प्रवास करून पुढील स्थानकावर ( मळवली  ) एकत्र भेटावे.
( * मुंबई वरून येणार्या लोकांनी त्यांना जमेल त्या स्थानकावर गाड़ी पकडावी त्यासाठी गाडीचे टाइमटेबल देण्यात येत आहे.)  

इंद्रायणी एक्सप्रेस  
५:४० मुंबई छ शि ट
५:५१ दादर
६:१४ ठाणे
६:३५ कल्याण
७:१५ कर्जत
८:०० लोणावळा
* जर गाड़ी चुकली तर तुम्हाला दुर्गभ्रमंतिस मुकावे लागेल.
* स्थानका पर्यंत टिकिट काढण्यास विसरु नका. 

पुढील प्रवास :
८:३० गडाच्या पायथ्याशी जाण्यास प्रस्थान
९:३० चहा - नाश्ता
१०:०० लोहगड चढण्यास सुरुवात
११:३० लोहगड दुर्गभ्रमंती
२:०० दुपारचे जेवण
४:०० गड उतरण्यास सुरुवात
६:०० मळवली स्थानक
मळवली ते लोणावळा लोकल ने प्रवास
मुंबई कड़े प्रस्थान
इंद्रायणी एक्सप्रेस : लोणावळा -१९:२३ : मुंबई - २१:५५
इंटरसिटी एक्सप्रेस  : लोणावळा -१८:४६ : मुंबई - २०:२०

नोंदणी साठी संपर्क

ईमेल :
maharashtrachidurgsampatti@gmail.com
or
nikhil.salaskar2011@gmail.com

दूरध्वनी क्र. : ९६६४८९९५८७

फेसबुक :http://www.facebook.com/pages/महाराष्ट्राची-दुर्गसंपत्ती/205738902783293?sk=app_7146470109
 
Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations