The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti

Written By Nikhil Salaskar on Thursday, 17 May 2012 | 00:27

खांदेरी बेटालाच बांधलेली तटबंदी ....


खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नाह्वे;पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे.इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजीमहाराजांनी मायनाक भंडार्याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला.या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे.त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी नावा मासेमारीसाठी समुद्रात घालत नाहीत.बेटावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातली आहे.
मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना मुंबईच्या इंग्रजांनी ती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले.कॅप्टन विलियम मिन्चीन,रिचर्ड केग्वीन,जॉन ब्रान्डबरी,फ्रान्सिस थोर्प असे नामांकित सागरी सेनानी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रींगेटेस त्यांनी पाठवल्या होत्या.गेप नावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर कशातरी काही तोफा बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला.

मायनाक भंडार्याच्या मदतीला नंतर दौलातखानाचे आरमार आले.आलिबाग-थळच्या किनार्यालगत असलेल्या या आरमाराने इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या!मराठ्यांच्या होड्या थळच्या किनार्यावरून सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किनारा आणि बेट यामध्ये एक 'ब्लोकेड' उभारण्याचे इंग्रजांनी ठरवले होते;पण त्यांच्या मोठ्या जहाजांना या चेनेलमध्ये ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही.वाऱ्यामुळे त्यांच्या होड्या किनार्याकडे फेकल्या जात आणि त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना ती जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली.छोट्या गुराबा त्यांनी आणल्या असता 'डव्ह'नावाच्या त्यांच्या गुराबेवर पाठीमागे तोफ नसल्याने ती त्रुटी हेरून शिवप्रभूंच्या आरमाराने पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती गुराब पकडली आणि त्यावरच्या इंग्रजांना सागरगडावर कैदेत डांबले.

सागराची भरती-ओहोटी,खोल-उथळ पाणी,मतलय,वैगेरेचे ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा जास्त असल्याचे दिसले.मराठ्यांच्या संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या होड्यांनी या युद्धात कमाल केली.या चिंचोळ्या होड्या रात्री वल्व्ह्त मराठे सामान बेटावर पोहचते करीत.इंग्रजी जहाजे पूर्णपणे वार्यावर अवलंबून असत.खास मराठी बांधणीच्या या होड्यांनी इंग्रजांना आश्चर्यकारकरित्या चकवले.
कॅप्टन विलियमने मुंबईला पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे,'या सरपठनार्या मराठी होड्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात.अशा होड्या इंग्रजी आरमारात हव्यात!' काय गमत आहे बघा!खास मराठी बांधणीच्या होड्या त्या दर्यावादी इंग्रजांना हव्याहोत्या!
Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations