The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » कलावंतीण बुरुज ....

कलावंतीण बुरुज ....

Written By Nikhil Salaskar on Thursday, 20 September 2012 | 00:30

१८ डिसेंबर २०११ रोजी आयोजित केलेल्या दुर्गभ्रमंतीसाठी १९ मावळ्यांनी सहभागी दर्शविली...मी मात्र आदल्या दिवशीच रात्री पनवेल बस स्थानकात मुक्कामास होतो ..... सकाळी ६:३० वाजता दिलेल्या वेळेत हळू हळू सर्व जण भेटू लागले.पुण्याहून आलेले ९ मावळे आणि आमच्यात वयाने सर्वात मोठे ( ४५ वर्षे ) परंतु माझा मते सर्वात तरुण अरविंद जाधव आणि त्यांचे मित्र बाईक वर सहभागी झाले.त्यांच्या सहभागाने आमच्यात एक नवीन 
जोश संचारला .....काही वेळातच प्रवासाला सुरुवात होणार होती ......गाडी स्थानकावर लागली होती परंतु अजूनही ३ मावळ्यांचा पत्ता नव्हता .....विवेकानंद दळवी आणि त्याचा सवंगडी अजूनही यायचे होते.जे व्हायचे तेच झाले शेवटी कंडक्टर ने बेल वाजवली आणि गाडी सुटण्यास तयार झाली आम्ही सर्व घाईतच गाडीत बसलो कारण ह्यानंतर ९:४० वाजता म्हणजेच २ तासाने गाडी होती आणि एवढा उशीर करणे शक्य नव्हते.जशी गाडी सुरु झाली तशी येणाऱ्या मावळ्यांची चिंता वाढू लागली.....गाडी डेपो च्या बाहेर निघत असतानाच गणेश चा फोने आला ..." अरे मी पनवेल स्थानकात आलो आहे ...कुठे आहात तुम्ही सगळे " मी म्हटले आता जी गाडी बाहेर पडतेय त्या गाडीला हात दाखवून थांबव आणि चढ त्याच गाडीत ..........एक मावळा आला अजूनही २ जण मागे होते ...गाडीने वेग घेतला .....गाडी हळूहळू ठाकूरवाडी कडे सरकू लागली तसे सूर्यनारायणाचे दर्शन झाले.....काही वेळातच विवेक चा फोने आला " आम्ही आता पनवेल डेपो मध्ये आलो आहोत " आणि आमची गाडी तेव्हा ठाकूरवाडीत प्रवेश करत होती ....काय करावे सुचत नव्हते शेवटी त्यांना सांगितले मिळेल त्या गाडीने या आम्ही वाट बघतो.......काही वेळातच कलावंतिणी दुर्गाचे दर्शन झाले...मन एक क्षण थबकले ......काय तो थाट आणि काय ती गगनाला भिडणारी उंची ....... कधी एकदा सर करतोय असे वाटत होते .....आमच्या आधीच ठाकूरवाडीत पोहोचलेल्या अभिजित ( आमचा गाईड ) ला पहिल्यांदा भेटलो .....त्याने सांगितल्या प्रमाणे सूर्य माथ्यावर यायच्या आधी वर पोहोचणे गरजेचे होते .....आणि अजूनही २ जण येणे बाकी होते .....पटापट फोन लावण्यास सुरुवात केली तशी नेहमीप्रमाणे नेटवर्क मध्ये आले......आता काय ????? शेवटी त्यांना एक मेसेज पाठवला आणि मनावर दगड ठेऊन गड चढण्यास सुरुवात केली.....चालता चालता एकमेकांशी बोलून ओळख करणे चालूच होते.....काही वेळातच आम्ही गर्द जंगलात पोहोचलो.अभिजित काही नवीन शोर्ट कट शोधून काढत होता .....आणि आम्ही सर्व त्याच्या मागे .........पण सांभाळून जाणे गरजेचे होते.मी सगळ्यात शेवटी भगवा घेऊन चढत होते .....खांद्यावर १९ किलो चे समान होते ते वेगळी गोष्ट :)....चालता चालता फोटो काढणे चालूच होते .....काही वेळात आम्ही अर्धी चढाई पूर्ण केली आणि एका माथ्यावर येऊन पोहोचलो .............झकास...काय दृश्य होते ते !!! एवढ्या वरती आम्ही आलो आहोत ह्यावर विश्वासच बसत नव्हता ......... तिकडे दूरवर आमच्या मागावर येणारे २ मावळे दिसले ( मुंगीच्या आकाराचे ) आणि तुतारी वाजली ( माझ्या फोने ची रिंगटोन ) " आम्ही अर्ध्यावर पोहोचलो आहोत .....येताय त्याच वाटेने सरळ चालत या ...कोण सोबत भेटले तर त्यांना प्रबळ माची विचार ": हा निरोप देऊन पुढील शेवटच्या आणि सर्वात कठीण प्रवासाला आम्ही लागलो .......सरळ खडी चढाई ....रस्ता संपूर्ण मळलेला होता पण थोडा घसरणीचा .......काही वेळातच दगडात कोरलेल्या मारुती आणि गणेशाचे दर्शन झाले .......आणि आलेला थकवा एका क्षणात दूर झाला....हळू हळू माची जवळ येत होती आणि गावातील माणसांची रेलचेल दिसू लागली.एवढ्या उंचावरून रोजीरोटी साठी पायथ्याशी जाणार्या लोकांचे खूप नवल वाटल ......काही वेळातच २ तासांचा प्रवास करून आम्ही प्रबळमाची मध्ये पोहोचलो .........आणि एकच जल्लोष .....अभिजित ने नेहमीच्या एका वस्तीतील घरात मुक्कामसाठी जागा घेतली.....सर्वांनी काही वेळ आराम करून आणि चहा घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात करणार तोच विवेक आणि त्याचा मित्र आमच्यात सामील झाले.......आता सगळे आले होते :) आणि भगवा घेऊन गड सर करायचा होता .....घराच्या मागच्या बाजूने एक रस्ता गडावर जातो.....त्या पायवाटेने आम्ही आमचा प्रवास सुरु केला .....जाता आधारासाठी एखादी काठी मिळते का ह्याचा शोध सर्वांनी सुरु केला आणि प्रत्येकाने त्यात यश मिळविले.काही वेळातच आम्ही प्रबळगड आणि कलावंतिणी बुरुज ह्यांमधील खिंडीत येऊन पोहोचलो.....प्रबळ गडाच्या पायथ्याशी दगडात कोरलेली गुफा आहे आणि तीकादन काही वेळातच आपण बुरुजाच्या पायथ्याशी पोहोचतो.
आलो एकदाचे :) ........आता लक्ष होत ते बुरूजाच्या माथ्यावर भगवा फडकविण्याचे...थोडा आराम करून झालो तय्यार आणि हो ह्या सर्वात आमच्या सोबत असणाऱ्या दोन्ही काकाना मानवच लागेल .....अजूनही त्यांच्यातील तरुणाईची उमेद तशीच दिसत होती.
हर हर महादेव ......... पायर्यांच्या वाटेने हळू हळू चढण्यास सुरुवात केली ....पुढील मावळ्याला सांभाळणे गरजेचे होते ....कारण त्याच्या हालचालीवारच मागील मावळ्यांची हालचाल अवलंबून होती....काही वेळात पायर्या संपल्या आणि पुन्हा सुरु झाली थोडीशी सोपी पण खडी चढाई ....आणि .................
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती महाराज कि ................... जय .....एकमुखाने जल्लोष सुरु झाला .आम्ही चक्क २३०० फुट उंचीवरील प्रबळगडा समोरील कलावंतिणी बुरुजाच्या माथ्यावर होतो .........ज्या क्षणाची वाट बघत होतो तो शेवटी आलाच .....आता रेलचेल सुरु झाली ती फोटो काढायची आणि सोबत आणलेले भगवे निशाण बुरुजावर फडकविण्याची ....................



प्रवास वर्णन : निखिल साळसकर
Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations