श्री छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती आणि काय बोलायचे त्याच्यापुढे मी तर एक शून्यच. लहानपणापासून शिवरायांबद्दल आदर आहे जसा मोठा होत गेलो तसा आदरहि वाढला आणि मग त्यांच्याविषयीचा इतिहास वाचायला सुरुवात झाली. नववी मध्ये असल्यापासून मला इतिहास हा विषय आवडू लागला. ह्यावेळेस चौथांदा मी शिवचरित्र वाचले. त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती अशी कि महाराजांच्या आयुष्यात ' ८ ' या अंकाचा खूप जवळचा संबध आहे, योगायोग असाही समझा...
सर्व बैजवार माहिती हि अशी :-
- महाराजांचा जन्म झाला तो दिवस व वर्ष होते १९ फेब्रुवारी १६२७ ह्यांची आकडेमोड केल्यास उत्तर '८' असे येते.
१+९+१+६+२+७ = २६= '८'
- १७ व्या शतकपासून शिवकाळला सुरुवात झाली.
१+७ = ८
- महाराजांच्या आठ पत्नी होत्या.
सईबाई
सोयराबाई
पुतळाबाई
लक्ष्मीबाई
काशीबाई
सगुणाबाई
सकवारबाई
गुणवंताबाई
- महाराजांना आठ मुले होती
संभाजी महाराज
राजाराम महाराज
राणू
सखुबाई
अंबिका
दीपाबाई
कमळजा
राजकुवर
- महाराजांची राजमुद्रा सुद्धा अष्टकोनी होती.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
- महाराजांनी स्वराज्याच्या सेवेकरिता अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती.
मोरोपंत पिंगळे
रामचंद्र नीलकंठ
अण्णाजी दत्तो
रामचंद्र त्रिंबक
हंबीरराव मोहिते
दत्ताजी त्रिंबक
रघुनाथराव
रावजी निराजी
- स्वराज्यावर चालून आलेले परकीय ज्यांच्याशी शिवरायांनी प्रखरपणे लढा दिला.
मोगलशहा
आदिलशाह
निझामशाह
कुतुबशाह
इंग्रज
पोर्तुगीज
सिद्दी
स्वकीय (जावळीचे मोरे, शिर्के, सावंत इ.)
- महाराजांच्या काळात स्वराज्यात एकूण ३५० किल्ले होते.
- राजमाता जिजाऊ साहेबांचे देहावसान झाले ते १७ तारखेला.
- महाराजांची समाधी सुद्धा अष्टकोनीच आहे.
Post a Comment