इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे (जुलै १२, १८६३ - डिसेंबर ३१, १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.राजवाड्यांचा जन्म जुलै १२, १८६३ रोजी महाराष्ट्रात पुण्यात झाला.बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले हाते.१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. जुलै ७, १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.डिसेंबर ३१, १९२६ रोजी राजवाड्यांचे निधन झाले.
प्रकाशित साहित्य :
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १ ते २२ (संपादन आणि प्रस्तावना)
ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण
राधामाधवविलासचंपू (संपादन आणि प्रस्तावना)
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १ -मराठी भाषा व व्याकरण
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड २ -मराठी ग्रंथ व ग्रंथकार
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ३ -संस्कृत भाषा विषयक
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ४ -अभिलेख संशोधन
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ५ -मराठी धातुकोष
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ६ -व्युत्पत्ती कोष
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ७,८ -समाजकारण व राजकारण
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ९ - आत्मवृत्त व लेख
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १० -प्रस्तावना खंड
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ११ -इतिहास
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १२ -संपादक राजवाडे
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १३ -समग्र संत साहित्य
संस्थात्मक कार्य :
भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे (संस्थापक)
Post a Comment