३ रे दुर्ग साहित्य संमेलन जानेवारीत किल्ले विजयदुर्ग येथे !
" गोनीदां " दुर्गप्रेमी मंडळातर्फे २६ ते २८ जानेवारी २०१३ या दरम्यान विजयदुर्ग येथे तिसरे दुर्ग साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे .या निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून , जलदुर्गांचे महत्व , काळ आज आणि उद्या , शिवरायांचे जलदुर्ग विज्ञान ,जलदुर्गावरील निसर्ग व त्याचे पर्यावरणीय महत्व , विजयदुर्गचे सामरिक महत्व आणि मराठ
" गोनीदां " दुर्गप्रेमी मंडळातर्फे २६ ते २८ जानेवारी २०१३ या दरम्यान विजयदुर्ग येथे तिसरे दुर्ग साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे .या निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून , जलदुर्गांचे महत्व , काळ आज आणि उद्या , शिवरायांचे जलदुर्ग विज्ञान ,जलदुर्गावरील निसर्ग व त्याचे पर्यावरणीय महत्व , विजयदुर्गचे सामरिक महत्व आणि मराठ
्यांचे आरमार असे विषय देण्यात आले आहेत .यापैकी कोणत्याही विषयावर दोन हजार शब्दांपर्यंत संशोधनात्मक निबंध लिहून तो ,
डॉ . विजय देव ,
सी - ४०१ , पाटे संस्कृती ,
तुळशीबागवाले कॉलनी ,
पुणे - ४११००९
या पत्त्यावर १० जानेवारीपर्यंत पाठवावा , असे आवाहन करण्यात आले आहे !
+ comments + 1 comments
धन्य तो रामसेजचा किल्लेदार
२२ मार्च १६८२ रोजी औरंगजेब बादशहा औरंगाबदेला पोचला आणि वेळ न दवडता लढाईचे मनसूबे आखु लागला. त्याने लढाईची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. बादशाहला वाटले होते की अगदी थोड्याच अवधित मोघली फ़ौज मराठ्यांचा हा मुलुख काबिज करील आणि म्हणुनच त्याने आधी मराठ्यांचे किल्ले घेण्याचे ठरविले.
त्याने शहाबुद्दीन फिरोजजंग याला रामसेज किल्ला जिंकण्यासाठी रवाना केले. स्वराज्याच्या इतर किल्ल्यांसारखा हा किल्ला काही उंच किंवा जिंकण्यास अवघड नव्हता. स्वराज्याच्या उत्तर सीमेवरील हा किल्ला, अवघे ५००-६०० मराठे पुढची थोड़ीथोडकी नव्हे तर तब्बल ६ वर्षे लढ़विणार होते. मराठ्यांच्या आणि त्यांच्या किल्लेदाराच्या हातून घडलेल्या या अद्वितीय पराक्रमाची किंचित सुद्धा जाणीव त्यांना स्वतःला नव्हती. राजपूत, शिख, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि अश्या अनेक शत्रूंच्या राजधान्या काही दिवसात खालसा करणाऱ्या या मोघली फौजेला अर्ध्या दशकाहुन अधिक काळ नुसत्या रामसेजने झुंजवले. पण आपले दुर्दैव असे की, आज या रामसेजच्या किल्लेदाराच्या नाव बाबतच गोंधळ आहे.
तरी डॉ. कमल गोखले लिहितात की या किल्लेदाराचे नाव होते रंभाजी पवार.
रामसेजच्या आसमंतातिल मराठ्यांचा पराक्रम
रामसेजला शहाबुद्दीन खान आपल्या ३५-४० हजार फौजेचा वेढा घालून बसला होता. तरी पण गडावरचे शे-पाचशे मराठे काही त्याला दाद देत नव्हते. गडावरच्या मराठ्यांच्या शौर्यगाथा जश्या औरंग्जेबास समजत होत्या तश्याच त्या शंभू राजांच्या सुद्धा कानावर येत होत्या. शंभू राजांनी हा वेढा शिथील करण्यासाठी रुपाजी भोसले आणि मानाजी मोरेंच्या हाताखाली ५-६ हजाराची कुमक पाठविली.
आधीच मोघलांच्या विजयाची आशा मावळत आली होती, त्यात रामसेजच्या आसमंतात धुळीचे लोट उडवित, रुपाजी भोसले, मानाजी मोरे आणि त्यांचे वीर वेढा फोडण्यासाठी चालून आले. खान त्यांना अडविण्यासाठी गणेश गावाच्या वेशी पर्यंत चालून आला. चवताळलेले मराठे मोघलांवर तुटून पडले. मराठ्यांचा हल्ला इतका जबर होता की, शत्रूचे पाय जागी ठरेना. स्वतः शहाबुद्दीन पळून गेला, त्याचा दारुण पराभव झाला. ५०० हुन अधिक मोघली सैन्य कापले गेले. मराठ्यांच्या या हल्ल्याचा परिणाम असा झाला की, शहबुद्दीन वेढा उठवून जुन्नारेकड़े निघून गेला, त्याने बाद्शःच्या आदेशाची वाट सुद्धा पहिली नाही.
याचा संदर्भ, विजय देशमुख यांच्या "असा लढला रामसेज" या लेखात मिळतो.
रामसेजच्या मदतींस धावून आला त्र्यंबकचा किल्लेदार
रामसेज मोघली सैन्यांस काही झाल्या दाद देत नव्हते. रामसेजवरच्या मराठ्यांनी कडवा प्रतिकार केला होता. पण रामसेजला मदत मिळत होती ती बाजुच्याच त्र्यंबकगडावरून. त्र्यंबकगडावरून मराठी अधिकारी केशव त्रिमळ रामसेजला रसद पोचवत होते आणि म्हणुनच बादशहाने त्र्यंबकवर मुघल सरदार मुज्जफरखानला पाठविले.
त्र्यंबकचे किल्लेदार होते तेलंगराव. रामसेज इतकाच कडवा प्रतिकार त्र्यंबकने सुद्धा केला. गडावरून मराठे रात्री अपरात्री मोघलांच्या छावणीवर हल्ला करीत आणि जमेल तेवढे शत्रूचे नुकसान करुन पुन्हा गडावर पसार होत. मोघली सरदार आजू बाजूची गावे लुटित आणि बाद्शाहंस आपल्या परक्रमाच्या बढाया मारित. बादशहा सुद्धा या सरदारांच्या थापांना बळी पडून त्यांना खिल्लती वाटत असे. अखेर त्याच्या सुद्धा ध्यानात आले होते की आपले सरदार खोट्या चकमकी सांगुन इनाम वसूल करीत.
त्र्यंबकगड काबिज करण्यासाठी मोघल सरदार,मराठ्यांच्या किल्लेदाराला फीतविण्याचा प्रयत्न करीत होता. पण त्यात त्याला यश आले नाही कारण मराठा किल्लेदार शंभू राजांच्या निष्ठावान शिपाई होता.
त्र्यंबकगडाखाली मराठ्यांनी अनेक नामांकित मोघली सरदारांना पाणी पाजले. मुज्जफरखान, बहरामखान, राघो खोपडे, मरहमतखान आणि असे अनेक सरदार त्र्यंबकला पाठ दाखवून निघून गेले. शेवटी बादशहाने मातब्बरखान याला त्र्यंबक किल्ल्यावर पाठविले. त्र्यंबक सुद्धा ६ वर्षे मोघलांना हुलकावणी देत राहिला आणि शेवटी किल्ल्यावरचे धान्य संपल्यामुळे नाइलाजाने गड मोघलांच्या हाती द्यावा लागला.
बादशहाच्या दरबारातल्या बातमीपत्राच्या आधारे किल्लेदार तेलंगराव आणि त्यांच्या वीर सथिदारांचा पराक्रम दिसून येतो. पण दुर्दैवाने रामसेज इतकी सुद्धा या त्र्यंबकच्या लढ्याला प्रसिद्धि मिळाली नाही.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
स्वराज्य किल्ले लोहगड पवन मावळ
Post a Comment