The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » शिवरायांची युद्धनीती

शिवरायांची युद्धनीती

Written By Nikhil Salaskar on Friday, 4 January 2013 | 23:20




हिंदूस्थान आक्रमकांच्या पंजाखाली रगडला गेला. त्याची कारणेही तशीच होती. सर्व प्रकारची वैचारिक दुर्बलता हिंदुस्थानच्या गुलामगिरीस कारणीभूत होती. हिंद्स्थान म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी झाली होती. हे एका रात्रीत घडले नव्हते न ??????
शिवरायांनी याचा सूक्ष्म अभ्यास केला. भारतीयांनी केलेल्या चुका त्यांच्या ध्यानात आल्या. सुलतान लोकांची मर्मस्थळे हि त्यांनी तपासली. या दोहोंच्या अभ्यासातून त्यांनी स्वत:ची एक जबरदस्त युद्धनीती निर्माण केली. भारतवर्षातील हिंदू राजे हे फार शूर, पराक्रमी होते, त्यांचे सैन्यही प्रचंड होते. मग पराभव का झाला??? गाफिलपणा !!! गाढ निद्रा !!! भोळसट आशीर्वाद !!! आणखीन बरेच कारणे होती. भारताचा गतकालीन इतिहास पहिला तर दिसून येते कि शस्त्राने युद्ध लढताना भारतीयांना हरवणे कठीण गेले, पण भावनिकरीत्या कागदी करार, तह यामध्ये भारतीय फार लवकर हरले. शिवरायांच्या भाषेत म्हणायचे झाल्यास त्या राजांनी सरदारकीपेक्षा शिपाईगिरीच जास्त गाजविली. हे भारतीय राजे युक्तीने लढलेच नाहीत. शत्रूला सोडून देण्याचा आत्मघातकी उदारपणा हे राजे दाखवत असत शौर्यामध्ये पृथ्वीराज चौहान, हेमू, यादव साम्राज्य व विजयनगर साम्राज्य कुठेही कमी नव्हते. परंतु त्यांच्यापाशी विस्तारवादी महत्त्वकांक्षेचा आभाव होता. आपापसात एकजूट नव्हती. ते भावनेच्या आहारी जाऊन लढत असत, राज्यासाठी नव्हे. म्होरक्या पडला कि सैन्य पळू लागे. राजधानी जिंकली कि सारे साम्राज्य आपोआप पराभूत होत असे. त्यांची सज्जनता हि तथाकथित सहिष्णुतेच्या आदर्शवादाला बळी पडली होती आणि निष्क्रिय सज्जनता म्हणजे दुर्जनांची आक्रमकता असते. ते कधीही पर्वतांच्या आधाराने लढले नाहीत. संत महर्षींचे ज्ञान अव्हेरले गेले होते. कर्मकांडे आणि जातीभेदावर वादविवाद चालू होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इस्लामी आक्रमकांपाशी असणारे 'जिहाद' चे संमोहन अस्त्र त्यांच्यापाशी नव्हते. जिहादचे मानसशास्त्र त्यांना कधीही समजले नाही. चाणक्यानंतर एक सम्राट विक्रमादित्य सोडला तर अध्यात्मिक व धार्मिक अधिष्ठानावर आधारलेले व्यवहारिक नेतृत्त्व पुढे येऊ शकले नाही. तरीही हिंद्स्थान ह्या आक्रमकांना यशस्वीपणे तोंड देत राहिला.एकदमच मृतप्राय झाला नाही. कारण म्हणजे 'संत'. संतांनी जनतेच्या हृदयातील झरे अद्यापि बुजु दिले नव्हते. संतांनी सामान्यांना श्रद्धा व सबुरीचा मार्ग दिला होता. त्यामुळेच हिंदुस्थान अत्याचारांना पुरून उरला. एकदमच ढेपाळला मात्र नाही. संतांनी आपल्या मठांचे जाळे भारतभर विस्तारलेले होते. राजकीय क्षेत्र विभिन्न होते पण त्या मठांमुळेच संपूर्ण भारतभर अध्यात्मिक, सामाजिक समतोल साधण्याचे प्रयत्न संतांकडून केले गेले.
शिवरायांचा उदय झाला आणि भोळसट तत्त्वज्ञान मागे पडले. शिवरायांनी हे जाणले कि बुद्धीच्या बळावर जिंकली जातात. केवळ शस्त्राच्या बळावर नव्हे. राजे नेहमी गनिमी काव्याने लढत. राजांनी स्वराज्याला गनिमी कावा दिला. 'नाठाळाच्या माथी हन काठी' हि संत तुकाराम महाराजांची शिकवण राजांनी उपयोगात आणली. राजांनी संरक्षणाचे विकेंद्रीकरन केले. म्हणजेच आपले स्वराज्य डोंगरी दुर्ग, कोट, जलदुर्गामध्ये विभागून घेतले. प्रत्येक दुर्ग म्हणजे एक स्वतंत्र राजधानिच बनला. असे चारशे किल्ले स्वराज्यात होते. राजे किल्ल्यांवर खूप खर्च करतात असे काही अनाहूत हितचिंताकांना वाटले. त्यांनी राजांजवळ चिंता व्यक्त केली तेव्हा महाराज म्हणाले, " जैसा कुळंबी शेतास मला घालून शेत राखतो तैसे किल्ले राज्यास रक्षक आहेत. तारवांस (नाव) खिळे मारून बळकट करतात तशी बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या मार्गाने औरंगशहा सारख्यांची उमर गुजरून जाईल." पुढे अगदी तंतोतंत तसेच झाले. औरंगजेब मेला परंतु किल्ले आजही आपण पाहतो. दुर्ग म्हणजे स्वराज्याची शिल्पे आहेत. राजे दुर्गावर खर्च करत नव्हते, त्यांनी ती स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या भावी पिढ्यांसाठी केलेली गुंतवणूक होती. राजे दुर्गामातेचे पुत्र होते. दुर्गांची पूजा करीत असत. दुर्गांवरती राहत असत. राजांनी समुद्रावर वर्चस्व राहावे म्हणून स्वराज्याचे आरमार स्थापन केले. सिंधूदुर्ग किल्ला नव्याने बांधला. त्याचे वास्तुशास्त्र अप्रतिम आहे. आसपास जहाज फिरकू शकणार नाही अशी जागा आहे ती. राजांनी आपल्या आरमारामध्ये जलद गतीने पळणारी 'संगमिरी' जहाजे भांध्ली होती. "शिवाजी राजांच्या युद्ध नौकांचा पाठलाग करणे आपल्या नौकांना जमत नाही." असे मुंबईच्या गव्हर्नरने लंडनला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. राजांनी विजयदुर्ग किल्ल्याजवळ समुद्राखाली अर्धा किलोमीटर लांबीची एक दगडी भिंत बांधून घेतली होती. हि अतिशय रहस्यमय गोष्ट काही वर्षांपूर्वी उघड झाली आहे. आजही आपल्याला पाण्याखालील बांधकामासाठी जे परकीय तंत्रज्ञान लागते ते महाराजांनी साडे तीनशे वर्षांपूर्वीच विकसित केले होते.राजांनी आपल्या सेनेत तोफा बाळगल्या नाहीत. कारण राजे हे नेहमी गनिमी काव्याने लढायचे. अशा जलद लढाईमध्ये तोफा कुचकामी ठरत. राजांनी राजधानीसाठी रायगड किल्ल्याची निवड केली होती. इंग्रज वकील निकल्स म्हणतो कि, "अन्नाचा पुरवठा भरपूर असल्यास अल्प सैनिकांच्या सहाय्याने तो सर्व जगविरूद्ध लढू शकेल." रायगड हा हिंदुस्थानचा जिब्राल्टर आहे असे इंग्रज म्हणतात. महाराजांनी अवास्तव भावना प्रधान युद्ध परंपरा बंद केली. त्यांनी चातुर्य, मुत्सदेगिरी, मधुर लेखणी आणि तह यांचा प्रभावीपणे उपयोग केला. अफझलखानाचे युद्ध त्यांनी असेच जिंकले. जौहर आणि शायिस्तेखान यांनाही असेच जिरवले. शाइस्तेखनच्या एक लाख सैन्यामध्ये मुठभर मावळ्यांसह महाराज जातात काय !!! आणि खानची बोटे तोडून परत येतात काय !!! आग्र्याला कैदेमध्ये असताना त्या १० बाय २० फुटाच्या खोलीमध्ये महाराजांच्या पदरी कोणते सैन्य होते??? इथेच संख्याशास्त्राची मती गुंग होते. आज अमिरिकेत महाराजांवर अभ्यास करण्यासाठी तब्बल सातशे पुस्तके उपलब्ध आहेत. आपल्याकडे ????????????
शिवराय हे बुद्धीचे बळ वापरण्यात पटाईत होते. शिवरायांनी वास्तववादाला नेहमीच जास्त महत्त्व दिले होते. राजे आपल्या युद्धात सैनिकांच्या कुटुंबाची अत्यंत काळजी घेत असत. कुटुंबातील युवकांना सैन्यात नोकरी मिळे. मत भगिनींना वस्त्रे, उपहार देण्यात येउन त्यांचा सन्मान करण्यात येई. राजांनी आपल्या अचूक युद्धनीतीच्या बळावर शत्रूंना चारी मुंड्या चित केले. महाराज हयात असे पर्यंत औरंगजेब कधीही स्वराज्यात स्वत: उतरला नाही. महाराज कैलासवासी झाल्यावर तो प्रचंड सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. परंतु मराठ्यांचे दुर्ग, मराठ्यांची मने आणि मराठ्यांचे स्वराज्य तो जिंकू शकला नाही. महाराजंची गुंतवणूक स्वराज्याच्या विजयासाठी कारणीभूत ठरली.

Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations