महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० ला करण्यात आली. कोकण, मराठवाडा,
पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ हे
महाराष्ट्राचे प्रमुख विभाग. स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्र
राज्याची स्थापना झाली.आचार्य अत्रे, सेनापती बापट, शाहिर अमर शेख,
प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे, एस. एम. जोशी या व्यक्तिंनी संयुक्त
महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व केले. मोरारजी देसाई व स. का. पाटील या
नेत्यांनी या चळवळीला दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलन अधिकच
चिघळले व २१ नोव्हेंबर १९५५ रोजी पोलिसांच्या गोळीबारात १५ जणांना प्राण
गमवावे लागले. जनतेच्या असंतोषाला न जुमानता सरकारने मुंबई केंद्रशासित
केल्याची घोषणा केली. या निर्णयाने चळवळीला आणखीनच बळ मिळाले. मोर्चे,
सत्याग्रह सुरु झाले. या चळवळीच्या काळात भारताचे त्यावेळचे अर्थमंत्री सी.
डी. देशमुख यांनी महाराष्ट्रावर होणा-या अन्यायाच्या निषेधार्थ राजीनामा
देऊन चळवळ अधिक मजबूत केली. या चळवळीत एकूण १०५ जणांना हौतात्म्य प्राप्त
झाले. मुंबईच्या फ्लोराफाउंटन भागात त्यांच्या स्मरणार्थ 'हुतात्मा स्मारक’
उभारले गेले. पुढे सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई मिळुन एक
द्विभाषिक राज्य स्थापन केले गेले. पण त्याला सर्व जनतेने विरोध केला. अखेर
निवडणुकींना सामोरे जायचे असल्याने लोकांचा रोष ऒढवून घेऊन चालणार नाही.
त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वाने एक पाऊल मागे घेऊन संयुक्त महाराष्ट्रासाठी
ते राजी झाले. पुढे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
मुंबई राजधानी व नागपुर ही उपराजधानी म्हणून निश्चित झाली. या स्वातंत्र
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. १०५ हुतात्म्यांनी
दिलेल्या बलिदानामुळेच आज आपण मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणुन पहात
आहोत.असा हा आपला महाराष्ट्र दिन.
हुतात्म्यांची नावे
२१ नोव्हेंबर १९५५ चे हुतात्मे १) सीताराम बनाजी पवार २)जोसेफ डेव्हिड पेजारकर ३)चिमनलाल डी.सेठ ४) भास्कर नारायण ५)रामचंद्र सेवाराम ६)शंकर खोटे ७)मीनाक्ष मोरेश्वर ८)धर्माजी नागवेकर ९)चंद्रकांत लक्ष्मण १०)के.जे.झेवियर ११)पी.एस.जॊन १२शरद जी. वाणी १३)वेदीसिंग १४)रामचंद्र भाटिया १५)गंगाराम गुणाजी
मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयासमोर फ्लोरा फाउंटनवर मुंबई सरकारने मिरवणुकीवर केलेल्या गोळीबारात वरील १५ जणांनी हौतात्मे पत्करले.
जानेवारी १९५६ चे हुतात्मे
१६) बंडू गोखले १७)निवृत्ती विठोबा मोरे १८)आत्माराम रावजी पालवणकरण १९)बालप्पा सुनप्पा कामाठी २०)धोंडू लक्ष्मण पारडूले २१)भाऊ सखाराम कदम २२) यशवंत बाबाजी भगत २३) गोविंद बाबूराव जोगल २४) भाऊ सखाराम कदम २५) पांडुरंग धोंडु धाडवे २६)गोपाळ चिमाजी कोरडे २७) पांडुरंग बाबाजी जाधव २८) बाबू हरु काते २९) अनुप महावीर ३०) विनायक पांचाळ ३१) सीताराम गणपत म्हात्रे ३२)सुभाष भिवा बोरकर ३३)गणपत रामा तानकर ३४)सीताराम गयादीन ३५) गोरखनाथ रावजी जगताप ३६) महंमद अली ३७) तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३८) देवाजी सखाराम पाटील ३९) शामलाल जेठानंद ४०) सदाशिव महादेव भोसले ४१) भिकाजी पांडुरंग रंगाटे ४२) बासुदेव सूर्याजी मांजरेकर ४३) भिकाजी बाबू बाबरकर ४४)सखाराम श्रीपत ढमाले ४५) नरेंद्र प्रधान ४६) शंकर गोपाळ कुष्टे ४७)दत्ताराम कृष्णा सावंत ४८)बबन बापू बरगुडे ४९) विष्णु सखाराम बने ५०)सीताराम धोंडु राडे ५१) तुकाराम धोंडु शिंदे ५२)विठ्ठल गंगाराम मोरे ५३)रामा लखन विंदा ५४)एडवीन आमरोझ साळ्वी ५५)बाब महादू सावंत ५६)वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५७)विट्ठल दौलत साळुंके ५८)रामनाथ पांडुरंग अमृते ५९)परशुराम अंबाजी देसाई ६०)घनशाम बाबू कोलार ६१)धोंडू रामकृष्ण सुतार ६२)मुनीमजी बलदेव पांडे ६३)मारुती विठोबा मस्के ६४)भाऊ कोंडीबा भास्कर ६५)धोंडो राघो पुजारी ६६)-दयसिंग दारजेसिंग ६७) पांडू महादू अवरीरकर ६८) शंकर विठोबा राणे ६९)विजयकुमार सदाशिव बेडेकर ७०)कृष्णाजी गणू शिंदे ७१)रामचंद्र विठ्ठल चौगुले ७२)धोडु भागु जाधव ७३)रघुनाथ सखाराम बेनगुडे ७४)काशीनाथ गोविंद चिंदरकर ७५) करपैया किरमल देवेंद्र ७६)चुलाराम मुंबराज ७७)बालमोहन ७८) अनंता ७९)गंगाराम विष्णु गुरव ८०)रत्नु गोंदिवरे ८१) सय्यद कासम ८२)भिकाजी दाजी ८३)अनंत गोळतकर ८४)किसन वीरकर ८५)सुखलाल रामलाल बंसकर ८६)पांडुरंग विष्णु वाळके ८७)फुलवरु मगरु ८८)गुलाब कृष्णा खवळे ८९)बाबूराव देवदास पाटील ९०) लक्ष्मण नरहरी थोरात ९१)ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९२) गणपत रामा भुते ९३)मुनशी वझीर अली ९४)दौलतराम मथुरादास ९५) विठ्ठ्ल नारायण चव्हाण ९६) सीताराम घाडीगावकर ९७) अनोळखी ९८)अनोळखी बेळगाव ९९) मारुती बेन्नाळकर १००)मधुकर बापू वांदेकर १०१)लक्ष्मण गोविंद गावडे १०२) महादेव बारीगडी १०३)सौ. कमळाबाई मोरे ( निपाणी) १०४) व १०५) नावे मिळत नाही
Post a Comment