एक पहाट रायगडावर .....एक अभूतपूर्व सोहळा !
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गड-किल्ल्यांनी समृद्ध असा आपला महाराष्ट्र. सुमारे ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती ह्याच गड-किल्ल्यांच्या साथीने.आज गडकिल्ल्यांवर फिरत असताना नेहमी एक खंत मनात येते कि गड-किल्ल्यांमुळे आपल्याला स्वराज्य मिळाले तेच गडकिल्ले ऐन सणउत्सवांच्या काळात अंधारात असतात.आपण घराघरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतो पण आजही हे गडकोट एकांतात इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.इतिहास फक्त वाचून टिकणार नाही तर तो प्रत्यक्षात जपावा लागेल हे विसरून चालणार नाही. ह्याच ऐतिहासिक वारसदारांना त्यांचे वैभव परत मिळवून देण्याच्या उद्देशाने , महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती परिवाराने सन २०१२ पासून ' एक पहाट रायगडावर ' ह्या उत्सवाला सुरुवात केली. ज्यांनी आमचे जीवन प्रकाशित केले त्या गड-किल्ल्यांवरचा अंधार दूर करण्याचा हा एक नाविन्यपूर्ण प्रयत्न होता.दिवाळी जवळ आली कि प्रत्येक जण खरेदीच्या धावपळीत असतो , दिवाळी पहाट सारख्या कार्यक्रमाला हजेरी लावले हे तर नित्याचेच होऊन बसले आहे. पण रायगडावरची हि हटके दिवाळी पहाट प्रत्येकाने अनुभवावी अशी आहे. दरवर्षी लक्ष्मीपूजनाला मशालींच्या प्रकाशात संपूर्ण रायगडावर दीपोत्सव साजरा केला जातो.ह्या आगळ्या वेगळ्या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त मोठ्या जल्लोषात सहभागी होतात. ह्याही वर्षी दिनांक १० आणि ११ नोव्हेंबर २०१५ रोजी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आले.गडावर जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरून व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना ह्या कार्यक्रमास प्रत्यक्ष सहभागी होता येनार नाही त्यांनी स्वखुशीने कार्यास मदत करावी .हे गडकोट आपल्या सर्वांचे आहेत , त्यामुळे प्रत्येकाच्या हातून किमान एक पणती अथवा मशाल गडावर लागावी हाच उद्देश ह्यामागचा आहे.एक पणती गडावर लावायचा खर्च प्रत्येकी १० ते १५ रु आणि एका मशालीचा खर्च ११५ रु एवढा होतो ,प्रत्येक दिवाळीला आपल्या घरात होणार्या खरेदीच्या खर्चापेक्षा हि किंमत नक्कीच कमी आहे. ज्यांना ज्या पद्धतीने मदत करणे शक्य होईल त्यांनी त्या परीने करावी.जे शिवभक्त सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत त्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करावा.गडावर येताना कोणत्याही प्रकारचे फटाके सोबत आणू नये.
कार्यक्रमाची माहिती परिवाराच्या www.durgsampatti.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
अमोल तावरे - ९७६५१९९०८०
स्वप्नील घाडीगावकर - ९९२०९४४९४३
सुबोध आंग्रे - ९७७३६७६२४५
हर्ष पवळे - ८८०५७४५९६२
शैलेश कंधारे - ९९२३४९३५०६
अंबादास डांगे - ९८८१२१२१८४
सुप्रभा बहिरम - ९८८१८५३५४८
निखिल साळसकर - ९५९४८७५१३५
Post a Comment