आज प्रत्येकाने आपापल्या घरी दिवाळी साजरी करायचे नवनवीन संकल्प करून त्याप्रमाणे तयारीला सुरुवात हि केली आहे.पण आपल्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे घर म्हणजे गडकिल्ले यांच्या विषयी काय ? आजही ऐन सण-उत्सवांच्या काळात हे गडकोट अंधारात असतात.हाच अंधार दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून दिवाळी पहाट गड-किल्ल्यांवर साजरी करण्याची संकल्पना मनात आली आणि त्यानुसार 'महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती' परिवारातर्फे दिवाळी २०१२ पासून
"एक पहाट रायगडावर" ह्या उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
अनेक वर्षांपासून दूर झालेली ती पहाट रायगडाने पुन्हा एकदा अनुभवली !
ह्याही वर्षी दिनांक १० आणि ११ नोव्हेंबर रोजी किल्ले रायगडावर हा उत्सव साजरा केला जाणार आहे.आपण सर्व जगभरातून कुठूनही ह्या सोहळ्यात उपस्थित राहू शकता.ज्यांना ह्या कार्यक्रमास हजर राहणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या परीने सहकार्य करावे.मदतीची कोणतीही अट नाही पण प्रत्येकाच्या हातून गडावर किमान एक पणती अथवा मशाल लागावी हि प्रामाणिक इच्छा ह्यामागे आहे.एक पणती आणि मशाल गडावर प्रज्वलित करण्याचा खर्च १५० रु येवढा होतो.प्रत्येक दिवाळीला आपल्या घरात होणार्या खरेदीच्या खर्चापेक्षा हि किंमत नक्कीच कमी आहे.हा उत्सव तुम्हा-आम्हा सर्वांचा आहे , त्यामुळे शरीराने उपस्थित राहता आल नाही तरी मनाने आपला सहभाग नक्की दर्शवावा.
आपल्या आयुष्यातील एक क्षण ह्या गड-किल्ल्यांना देऊन बघा !!!
शिवतीर्थाच्या माथ्यावर , टकमकाच्या टोकावर , होळीच्या माळावर , जगदीशवराच्या पायर्यांवर ... इतिहासाच्या सान्निध्यात "एक पहाट रायगडावर"
-------------------------------------------
निखिल साळसकर , महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती
-------------------------------------------
अधिक माहितीसाठी - www.durgsampatti.com
९५९४८७५१३५,९८२०६५८८७५,९९२०९४४९४३,९७६५१९९०८०,८८०५७४५९६२
Post a Comment