The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » एक अविस्मरणीय अनुभव

एक अविस्मरणीय अनुभव

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 27 December 2011 | 01:08

एक अविस्मरणीय अनुभव
२५ डिसेंबर ला श्री समर्थ कृपा ( मुलुंड पूर्व ) यांनी आयोजित केलेल्या लोहगड दुर्गभ्रमंती साठी ६५ लहान आणि मोठ्या मावळ्यांनी सहभाग घेतला होता.
माझे जवळचे मित्र आबासाहेब कापसे यांनी ह्याआधीच मला येण्याचे निमंत्रण दिले होते आणि मी ते त्या वेळेसच स्वीकारले ....गड-किल्ले स्पर्धेत त्यांनी केलेल्या अमूल्य अश्या कार्याची जाणीव मला होतीच.....इतिहास आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचे जे कार्य त्यांनी चालू ठेवले आहे त्याची कोणत्याही कार्याशी तुलना होऊ शकत नाही.
ठरल्या प्रमाणे २५ तारखेला साखळी ६:३० वाजता एकत्र जमून ७ वाजता लोहगडाकडे प्रस्थान करायचे होते.आबा चा फोने सकाळीच आला आणि मी सुद्धा निघण्याच्या तयारीतच होतो.त्याने सांगितलं कि गाडी निघाली कि फोने करतो मग ऐरोली मध्ये चढ.....पण खर म्हणजे जीकादन गड-यात्रेला सुरुवात होते तीकादन मला सहभागी व्हायला आवडत ....मनात इतिहास जागवत मी आमच्या घराजवळच्या बस स्थानकावर आलो........नेहमीप्रमाणेच बस ची वाट बघत :( ....रविवार चा दिवस असल्याने जास्त वर्दळ दिसत नव्हती .....तिकडे विवेक ( विवेकानंद दळवी - माझासोबत आतापर्यंत ३ ट्रेक केलेला आणि जवळचा झालेला असा दुर्गप्रेमी)आणि त्याचे दोन मित्र मुलुंड ला पोहोचले होते .....आणि माझा अजूनही पत्ता नव्हता ....शेवटी १०० क्रमांकाची बस दुरून येताना दिसली आणि मनाला हायसे वाटले....४५ मिनिटांची प्रतीक्षा शेवटी संपली....धावत पळतच मी गव्हाणपाडा जवळ जिकडे आमची गाडी उभी होती तिकडे पोहोचलो ....सर्वजण निघण्यास तयार होते.....गाडीकडे पोहोचल्यावर समजले कि अजूनही २ जण यायचे होते ....सकाळचे ७:४५ झाले होते.....शेवटी सर्वमताने प्रवास सुरु करण्याचे ठरले ....मागे राहिलेले २ जण बाईक वरून येणार होते....आणि एकच जल्लोष गणपती बाप्पा मोरया ............छत्रपती शिवाजी महाराज कि ........जय !!........
प्रवासात १ जण तुर्भे येथे आणि ३ जण कळंबोली येथे आम्हाला सहभागी होणार होते ........ठरल्याप्रमाणे गाडी ने पहिला थांबा तुर्भे रेल्वे स्थानकासमोर घेतला .....आबा चा एक मित्र मानखुर्द वरून येणार होता आणो नेहमीप्रमाने त्याला हि उशीर झालाच ....तोपर्यंत गाडीत आम्ही पंढरी ची ( मंडळातील एक अफलातून मित्र ) बडबड ऐकत होतो :) .......त्याच्या वागण्यात एक वेगळाच दिलखुलास अंदाज होता......त्याच्या एका एका वाक्यावर हसू आले नाही तर नवलच !!!.....खूप १०-१५ मी. झाले आणि आबा चा मित्र आला ......गाडीने पुन्हा प्रवास सुरु केला आणि पुढील आणि लोहगडा पूर्वीचा शेवटचा थांबा घेऊन गाडीने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने कूच केली.......प्रवासात धमाल मस्ती सुरूच होती .......लहान मावळ्यांचा तो जोश खरचं पाहण्यासारखा होता....जशी गाडी बोगद्यामध्ये जायची तसा एका लहान मुलाप्रमाणे मीही त्यांच्यासोबत ओरडत होतो .....काही वेळासाठी आम्ही महामार्ग दणाणून सोडला होता ......काही वेळात बसने लोणावळ्यासाठी डावीकडे वळसा घेतला आणि कुमार रेसोर्ट कडून पुन्हा उजवीकडचा रस्ता पकडला........आणि डोळे काही क्षण एकाच ठिकाणी एकटक पाहत होते ....ओठातून एक शब्द फुटण्यास तयार नव्हता ... महाराजांचा तो अश्वारूढ पुतळा डोळ्यासमोरून जाण्यास तयारच नव्हता ....... कानावर बोल पडत होते ...प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहसनाधीश्वर राजा शिव छत्रपती कि .....आणि आपसूक मुखातून जय बाहेर पडले आणि काही वेळांचा अबोला संपला....एक नवीन जोश एक नाविताकड संचारली सर्वांमध्ये.........
बस हळू हळू लोहगडाकडे सरकत होती तोच स्वराज्याचे शिलेदार किल्ले विसापूर आणि किल्ले लोहगड दौलत ह्या महाराष्ट्राच्या भूमीवर सह्याद्रीच्या खांद्यावर उभे असलेले दिसले ........काही वेळातच विंचू काट्याचे मुख दर्शन झाले.......आणि आता प्रतीक्षा होती ती ह्याचा विंचू काट्यावर ठरल्याप्रमाणे भगवा फडकविण्याची.....११:३० च्या सुमारास गाडी पायथ्याशी पोहोचली आणि मावळ्यांची घाई सुरु झाली ती सकाळच्या चहा आणि गरम गरम मिसळ पाव खाण्यासाठी ......महाराजांचे रांगडे मावळे आहोत आम्ही अस भागायचं नाय राव .........एकेकाने तब्बल ५ पाव आणि त्याला तोडीस मिसळ दाबून हाणली.....चहा -पाण्याचा घोट घेऊन मावळे गड चढण्यास तय्यार झाले......मी आणि आबा अग्रभागी होतो .....इतिहास सांगत हळू हळू चढाई सुरु होती ...गणेश दरवाजा .......नारायण दरवाजा .......हनुमान दरवाजा ..........आणि शेवटी गडाचा महादरवाजा .......आम्ही गडाच्या माथ्यावर प्रवेश केला.....मशीदसमान वास्तू बघून धव्जस्थंबा कडे येऊन थांबलो ....... दूरवर तुंग-तिकोना आपले दर्शन देतच होते....आणो समोर उभा असलेला विसापूर तर शेवटपर्यंत डोळ्यासमोरच होता.....पुढील गड-फेरीसाठी सुरुवात झाली .....त्रिंबकेश्वर महादेवाच्या मंदिराला लागुनच असणाऱ्या पाण्याच्या टाक्यासमोर सर्वजण विसावले.....काही मावळ्यांना सोबत घेऊन आम्ही विंचू काट्याच्या दिशेने कूच केली सोबतीला भगवा होताच ..........विंचूकाट्या वरील धव्जस्तंभा वर ह्या आधीच एक भगवा होता पण त्याची परिस्थिती खूपच दयनीय होती ....आमच्यातल्या एकाने हि मोहीम हाती घेतली .....स्तंभाची सुद्धा अवस्था वाईट असल्याने वजनाने कमी असलेला एक मावळा वर चढला .....त्याला आधार म्हणून ४ जणांनी थर उभारले आणि दोन थरांच्या यशस्वी प्रयत्न नंतर भगवा डौलात फडकू लागला ........ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलाच ............काही वेळ गडावर थांबून दुपारचे जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली ..........ह्या आधीच ठरल्याप्रमाणे आबा आणि त्याच्या मित्रांनी मुलांना पवना जलाशयावरील धरण दाखवण्याचे काबुल केले ........आता बस ने वाट धरली पवना जलाशयाची .........सूर्यनारायण सह्याद्रीच्या कुशीत विसावण्यास तयार होते ......त्यच वेळेस विविध रंगांची निळ्याशार आभाळात उधळण करत होते ......एक वेगळेच निसर्ग सौदर्य डोळ्यात विसावत होते.......जलाशयाच्या एका बाजूला तुंग आणि दुसर्या बाजूला तिकोना आम्हास साद घालत होते .....खरचं हे सर्व दृश्य पाहून ह्या सह्याद्रीत जन्मल्याचा अभिमान वाटत होता ..............................
प्रवास वर्णन
निखिल साळसकर
Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations