* * चला माहिती करून घेऊया गडकोटांबद्दल * *
भाग १
महाराष्ट्रात गडकोट वैभव गिरी-दुर्गांच्या पहाऱ्यातून विपुल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे सांगत साल्हेर अहिवंतापासून जिंजी तंजावरपर्यंत दुर्गाची एक प्रचंड शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले.दुर्गमता हा गडाचा गाभा होता. शत्रूकडे असलेल्या हत्याराच्या ताकदीवर दुर्गाची रचना अवलंबून असे.प्राचीन काळी वस्तीभोवती काटेरी झाडे टाकून वस्तीचे रक्षण करण्यात येई. नंतर लाकडाचे परकोट उभारण्यात येऊ लागले. मग दगडाची रचाई झाली.शेवटी दगड तासून पक्की तटबंदी उभारण्यापर्यंत मजल गेली.अशी तटबंदी असलेल्या ग्रामांना 'पूर' म्हणत असत.तरीही शत्रू बलाढ्य असेल, तर या तटबंदीयुक्त पुराचा पराभव अटळ असे. अशा वेळी गिरी-दुर्गाची रचना करण्यात आली. मात्र, असे गिरी दुर्ग बाधण्याचा खर्च अपरमित असे, परंतु संरक्षण या एकमेव कारणासाठी तो खर्च करणे अपरिहार्य असे. भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन,त्याची दुर्गमता अभ्यासून अशा ठिकाणी दुर्गाची निर्मिती केल्यामुळे किंवा दुर्ग उभारल्यामुळे शत्रूपासून संरक्षण मिळत असे.मात्र, हेच गडकोट अधिकाधिक बलाढ्य करण्यात मनुष्याचे बुद्धीचातुर्य पणाला लागले. त्यातील बारकाव्यांचा अभ्यास केला गेला व त्यातूनच बेलाग दुर्ग उभारले गेले. परिस्थितीशी सांगड घालून अधिकाधिक दुर्गम ठिकाणी गडकोटांची उभारणी केली गेली. वास्तुरचना, स्थापत्यशास्त्र यांचा कस पणाला लाऊन अशा गडकोटांची निर्मिती झाली.आपल्याकडील अनेक जुन्या ग्रंथांमधून दुर्गांच्या प्रकाराची माहिती मिळते. मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायात दुर्गांबद्दल केलेली चर्चा आली आहे. त्याचा आशय असा आहे-
'राजाने दुर्गांच्या जवळ वसवलेल्या नगरातच आपले वास्तव्य ठेवावे.'
असे सहा प्रकारचे दुर्ग आहेत
१. धनुदुर्ग - ज्याच्या आजूबाजूस वीस कोसपर्यंत पाल नाही, त्यास 'धनदुर्ग' म्हणतात
२. महीदुर्ग - ज्याला बारा हातांपेक्षा अधिक उंच तटबंदी आहे, युद्धाचा जर प्रसंग आलाच तर ज्यावरून व्यवस्थित पहारेकर्यांना फिरता येईल, ज्याला झारोक्यानी युक्त अशा खिडक्या ठेवल्या आहेत, अशा दुर्गास 'महादुर्ग' असे म्हणावे.
३. अब्ददुर्ग किंवा जलदुर्ग - अपरिमित जलाने चोहोबाजूंनी वेढलेल्या दुर्गास 'अब्ददुर्ग' किंवा 'जलदुर्ग' अशी संज्ञा आहे.
४. वाक्ष्रदुर्ग - तटाच्या बाहेर चारी बाजूला चार कोसापर्यंत मोठमोठे वृक्ष,काटेरी झाडे,कळकाची बेटे आणि वेलींच्या जाळ्या यांनी वेष्टीलेल्या दुर्गास वृक्षसंबंधी म्हणजेच 'वाक्ष्रदुर्ग' म्हणतात.
५. नृदुर्ग - गज,अश्व,रथ आणि पत्री या चतुरंग सैन्याने रक्षण केलेल्या दुर्गास 'नृदुर्ग' असे म्हणतात.
६. गिरिदुर्ग - आसपास वर चढण्यास संकुचित मार्ग असणारा,नदी, झरे इत्यादिकांच्या जलानी व्यापलेला व धान्य निर्माण होण्यासारख्या क्षेत्रांनी युक्त असलेल्या डोंगरी गड हा 'गिरिदुर्ग' या सज्ञेस प्राप्त होतो.
तंजावर च्या सरस्वती महल ग्रंथालयात अपूर्ण अवस्थेत असणार्या आकाशभैरवकल्प पोथी मध्ये पटल क्रमांक २१ ते २७ मध्ये अष्टविध गिरी दुर्गांची माहिती दिली आहे. डॉ.गोडे यांनी या ग्रंथा बाबत तपशीलवार माहिती प्रसिध्द केलि आहे. सुई सारख्या निमुलत्या आकाराचा, माणसाच्या आकाराचा,सुपाच्या आकाराचा,मध्ये तुटलेला,वाकडा तिकड़ा,नांगरा सारखा असे किल्ले राजाला राहण्यास योग्य नाहित. याच ग्रंथात भद्र,अतिभाद्र,चन्द्र,अर्ध-
१) भद्र गिरिदुर्ग: म्हणजे जो वर्तुळाकृति स्निग्ध आणि पर्वताच्या उंच पण सपाट पठारी शिखरावर आहे.तेथे पानिहि भरपूर आहे.आशा ठिकाणी राजा हत्तीवर बसून ध्वज पताका घेउन वर जाऊ शकतो.
२) अतिभद्र गिरिदुर्ग म्हणजे ज्या डोंगराचे टोक खुप ऊंच चौकोनी,विस्तीर्ण व् जल समृद्ध आहे अशा डोंगर शिखरावर बांधलेला किल्ला.
३) चन्द्र गिरिदुर्ग म्हणजे पायथ्या पासून वर चढ़न्याचा मार्ग अवघड आहे,ज्याचे शिखर मोठे पण चंद्राकृति असते व जेथे भरपूर पाणी असते,असा डोंगरी किल्ला
४) अर्ध चन्द्रगिरिदुर्ग म्हणजे ज्याचा पायथा व शिखर अर्धचंद्राकृति आहेत.जो मध्यम उंचीचा पण उत्तम पाण्याचा भरपूर साठा आहे,असा डोंगरी किल्ला.
५) नाभ गिरिदुर्ग म्हणजे कमळाच्या फुलासारखा विकसित झालेला ज्याचा आकार आहे.
६) सुनाभ गिरिदुर्ग हा पायथ्याशी पुरेसा रुंद व् वर क्रमाक्रमाने निमुलता होत गेलेला डोंगरी किल्ला
७) रुचिर गिरिदुर्ग पायथ्यपासून वरपर्यंत लहान मोठ्या पायऱ्या बांधलेल्या आहेत.
८) वर्धमान गिरिदुर्ग वैशिष्ट म्हणजे तो अर्दालाकार डोंगरावर वसविला आहे.
आज मितिस अशा सर्व प्रकारचे किल्ले अचुकपणे दाखविता येत नाहित.
(संदर्भ :अथातो दुर्गजिज्ञासा- प्र.के.घाणेकर)
गिरिदुर्गांचे वास्तुशास्त्र
गिरिदुर्गान्वर मराठ्यांची मदार होती. या गिरिदुर्गांच्या संदर्भात शिवकालात एक स्वतन्त्र शास्त्रच निर्माण झाले होते. रामचंद्र पन्त अमात्यानी आपल्या आदन्यापत्रात “गडाची रचना” या शिर्षकाखाली शिवकालीन दुर्ग शास्त्राची विस्ताराने चर्चा केली आहे. गिरिदुर्गाची उभारणी करताना योग्य स्थळ कसे निवडावे, जवळ पास दुसरया उंच टेकड्या असल्यास त्यांच्या भोवती तट बांधून त्यांचे किल्ल्यात कसे रूपान्तर करावे, मुख्य दुर्गाची चढ़न कशा प्रकारची असावी याविषयी अमात्यानी आदन्यापत्रात सूचना दिल्या आहेत.
किल्ल्याला एकापेक्षा अधिक दरवाजे असावेत असा अमात्यांचा आग्रह आहे. ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर ‘अयब’ आहे. याकरिता गड पाहून, एक दोन वा तीन दरवाजे, तशाच चोर दिंड्या करुन ठेवाव्यात. किल्ल्याचा दरवाजा बांधताना तो कसा असावा याविषयी अमात्य लिहितात, “दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून पुढे बुरुज देऊन, येती जाती मार्ग बुरुजाचे आहारी पाड़ोंन दरवाजे बांधावे.” तोफखान्यांचा वापर सुरु झाल्यानंतर किल्ल्यासमोरील मैदानातून किंवा समोरील टेकडीवरुन दिसणार नाही असे दरवाजे बांधन्याची गरज निर्माण झाली .रायगडचा महादरवाजा या दृष्टीने महत्वपूर्ण मानला पाहिजे. दरवाज्याचा बुरुज अधिक पुढे करुन येणार्या मार्गांचे नियंत्रण करण्याची तरतूद शिवकालातिल अनेक दुर्गाना केलेली सापडून येते .
गड़ावरील झाडी हर्प्रकारे राखावी अशी अमात्यांची सूचना आहे.या झाड़ीचा प्रसंगी पड्कोट प्रमाने उपयोग होतो. “गडावर राज मंदिराखेरिज मोठी इमारत असता कामा नए. धान्यग्रुहे (अम्बरखाना) उंदीर ,कीड़ा, मुंगी वालवी यांचा उपद्रव बाधणार नाही आशा पद्धतीने बांधावित, दारुची कोठारे मुख्य इमारतिपेक्षा किंवा वसतिपेक्षा दूर अंतरावर योग्य त्या स्थळी बांधावित , गडाच्या खाली दगडाचे कुसु किंवा कुम्पन असलेली इमारत असता कामा नए” आशा अनेक उपयुक्त सूचना अमत्यानी केल्या आहेत. सर्वात महत्वाची सूचना म्हणजे पाण्याच्या सोयिविशयी. “गडांवर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधने क्रमप्राप्त झाले, तरी आधी खड़क फोडून तली, टाकी , पर्ज्यन्यकालापर्यंत सम्पूर्ण गडास पाणी पुरे, अशी मजबूत बांधावी . गडाची पाणी बहुत जतन करावे ”.
Post a Comment