गडबांधणीस कडेकोट हवा ...
दुर्ग कितीही मजबूत असले तरी त्यांचा स्वामी दुर्गम असावा लागतो.दुर्गांचा खरा उत्तम उपयोग छत्रपती शिवाजीमहाराजांनी केला.शिवरायांनी जी नीती सांगितली आहे. ती शिवभारताच्या सोळाव्या अध्यायात आली आहे.
न दुर्ग दुर्गामित्येव मन्यते जनः।
तस्य दुर्गमता सैव यत्प्रभुस्तसय दुर्गम:॥
(अर्थ: दुर्गाला केवळ दुर्ग म्हणून दुर्गम मानीत नाहीत,तर त्याचा स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता होय.)
प्रभुणा दुर्गम दुर्ग प्रभूदुर्गण दुर्गम:।
अदुर्गमत्वादुगभयोव्रीद्वीष
(अर्थ: प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गामुळे प्रभू,दोघांच्याही अभावी शत्रूच दुर्गम होतो )
संतती यानि दुर्गाणि
तानी सर्वाणि सर्वथा।
यथा सदुर्गमणि स्युस्तथा
सद्योविर्धायताम॥
(अर्थ: तुमचे जे दुर्ग आहेत ते ज्यायोगे सर्वस्वी अत्यंत दुर्गम होतील असे ताबोडतोब करा )
शिवाजी राजांनी दुर्ग दुर्गम केले.१६७२ मध्ये रोह्याहून राजापूरला गेलेल्या अबेबार्थलोमी कैरे नावाच्या एका फ्रेंच माणसाने शिवाजीमहाराजांबद्दल लिहिले आहे.
'त्यांनी त्या मुलखाच्या भूगोलाचा अभ्यास केला आहे. इथले झाड आणि झुडुपही त्यांना माहित आहे.यांनी या भागाचे नकाशे काढले आहेत. दुर्ग बांधणीची कला त्यांनी अवगत करून घेतली आहे.'
शिवाजी महाराजांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला तेंव्हा तो परत बांधावयास काढला. पौंडेचारीच्या फ्रेंचांनी आपला वकील जिंजीला पाठवला होता.या वकिलाने लिहिले आहे.'शिवाजी राजांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला आहे.आणि बरेचसे जुने बांधकाम पाडून नवीन सुरु केले आहे.बुरुज अशा विवक्षित ठिकाणी बांधले आहेत कि,हे बांधकाम कोणी भारतीयाने केल्यापेक्षा युरोपियाने केल्यासारखे वाटते.'
महाराष्ट्रातही अतिप्राचीन दुर्ग आहेत.प्रामुख्याने नाला सोपारा ते पैठण या मार्गावरील हडसर उर्फ पर्वतगड,चांवड किंवा जुंड वा प्रसन्नगड,जीवधनगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला तो जुन्नर जवळील शिवनेरी हे दुर्ग फार प्राचीन आहेत,जीवधन,चांवड वैगेरे किल्ल्याच्या दगडात कोरलेल्या पायरया,हडसर येथील कड्यावरील खिळे,मेख ठोकून केलेली वाट व दगडातच कोरलेले भव्य प्रवेशद्वार आणि शिवनेरीभोवती कोरलेली लेणी गडाच्या प्राचीनतेची साक्ष देतात.गडांचा अभ्यास करताना गडांवर असलेली पाण्याची दगडात कोरलेली टाकी गडावर असलेल्या पनिसाठ्याविषयी माहिती देतात.जिथे पाणीसाठा मुबलक असेल,त्या गडाला विशेस महत्व असे.कारण,सैन्यासाठी ते फार उपयुक्त ठरते.
Post a Comment