दिल्लीत औरंगजेबाच्या हत्तीची सोंड कापणारे आणि शिवाजीमहाराजांच्या विश्वासू सरदारांपैकी एक असलेले येसाजी कंक यांचे मूळ गाव भोर तालुक्यातील भूतोंडे हेच असून, त्याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आ
हेत, असा दावा त्यांचे बारावे वंशज व पंचायत समितीचे माजी उपसभापती भगवानराव कंक यांनी केला आहे.मागील आठवड्यात काही वृत्तपत्रांमध्ये ('सकाळ' वगळता) येसाजी कंक हे राजघरचे रहिवासी असल्याचा व तेथे त्यांचे समाधिस्थळ मिळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन कंक यांनी वरील दावा केला आहे. वर्तमानपत्रांना खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी राजघरच्या ग्रामस्थांचा निषेधही केला. या वेळी इतिहास संशोधक भास्कर ठाणगे, पंचायत समितीचे माजी सभापती (कै.) रामभाऊ कंक यांचे चिरंजीव शशी कंक आदी उपस्थित होते. भूतोंडे येथे लवकरच शिवसृष्टी उभारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.भगवानराव कंक म्हणाले, येसाजी कंक हे भूतोंडे गावचेच असून, त्याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. यामध्ये शिवाजी महाराजांनी येसाजी कंक यांना भूतोंडेच्या पत्यावर लिहिलेले पत्र, येसाजी कंक यांनी लढाईत वापरलेल्या तलवारी, जिरेटोप, अर्धे चिलखत, नाणी व इतर आयुधांचा समावेश आहे. इतिहास संशोधक भास्कर ठाणगे यांच्या संग्रहात येसाजी कंक यांच्या वाड्यातील बरगळ, पंचधातूचे डाय, देवपूजेचे मातीचे भांडे, मातीच्या बांगड्या या वस्तूंबरोबर औरंगजेबाची मोहोरही आहे.श्री. ठाणगे म्हणाले, येसाजी कंक शिवाजी महाराजांच्या शेतसाऱ्याचे काम पाहत होते. राजघर येथील कृष्णाजी पडवळ व सिदोजी पडवळ हे शिवरायांचे विश्वासू सेवक होते. राजघर येथे सापडलेली जागा ही पडवळांच्या संबंधित असू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भास्कर ठाणगे यांच्या संग्रहातून 1664 साली शिवरायांनी येसाजी कंक यांना लिहिलेल्या पत्राचे टिपण
(इंग्लंडमधील मराठ्यांच्या इतिहासविषयक साधनांच्या आधारे)
इ. स. 1664 आश्विन शु. तृतीया सोमवासरे
यसाजी कंक ता ! भुतावडे यांसी
यसाजी शत्रू चालून आला! एैसे वर्तमान आले
बहुत मावळे मेळवून! चालून जाणे
बहुत काय लिहिणे!
(इंग्लंडमधील मराठ्यांच्या इतिहासविषयक साधनांच्या आधारे)
इ. स. 1664 आश्विन शु. तृतीया सोमवासरे
यसाजी कंक ता ! भुतावडे यांसी
यसाजी शत्रू चालून आला! एैसे वर्तमान आले
बहुत मावळे मेळवून! चालून जाणे
बहुत काय लिहिणे!
Post a Comment