खूपशी हिंदुद्रोही मंडळी वाद घालताना एक प्रश्न हमखास विचारतात, की "तुमच्या त्या फडतूस हिंदू धर्मात म्हणे ३३ कोटी ...देव आहेत, त्यांची नावे तरी माहिती आहेत का तुम्हाला?" आणि आमचे भोळे-भाबडे हिंदू बंधू ...या प्रश्नासमोर गडबडून जातात. मलाही व्याख्यानाच्या वगैरे निम्मित्ताने जेव्हा इतर मंडळी भेटतात, तेव्हा हा प्रश्न विचारणे ठरलेले असते. कधी खोडसाळपणे, तर कधी जिज्ञासेने! तेव्हा आपल्याला देखील या प्रश्नाचे उत्तर माहिती असावे म्हणून सांगतो.
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे की आपले ज्ञान कमी पडतेय. आता नमनालाच घडाभर तेल न ओतता मूळ विषयाला हात घालतो. ३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, "प्रकार". कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात "बैजिक पदांच्या कोटी" ही संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल की हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.
धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य.
(संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)
(संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)
धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु.
(संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)
(संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)
हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र.
(संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)
(संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)
आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!
असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात. आता तुम्ही कुणाही प्राश्निकास हे उत्तर देऊ शकता, मी व्यवस्थित संदर्भही दिले आहेत.
अभ्यासपूर्ण लेखन : श्री विक्रम श्रीराम एडके
+ comments + 2 comments
Thanks a lot for this valuable info
Really very informative! Thank you so much.
Post a Comment