The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » सागरी किल्ले ...

सागरी किल्ले ...

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 4 December 2012 | 04:47



महाराष्ट्रात जेवढे किल्लॆ ज्या पध्द्तीने बांधले गेले आहेत तसे जगात अन्यत्र कोठेही नाहीत... कारण महाराष्ट्रात अनेक राजसत्तांनी वेगवेगळ्य़ा कालखंडात किल्ले बांधले आहेत.. जसे बहामनी सांम्राज्य़ाचे ४ तुकडे पडले ,अदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही..
... ... यांचे सरदार मध्य आशिया तुन आले होते., आफ़्रिकन लोक यांना ईथीयोपियन , ऍबिशियन (हशबी) म्हणत त्यांनई जंजीरा बांधला, पोर्तूगिजांनी गोव्यात किल्ले बांधले..वसई चा किल्ला बांधला... डचांनी ही किल्ले बांधले... महाराष्ट्रात साधारण ८०० किल्ले आहेत. शिवाजी महाराजांनी यातील १५/२० बांधले आहेत..

किल्य़ाचे साधारण ३ प्रकार आहेत..

१.गिरीदुर्ग :- राजगड,रायगड ई. जे डोंगरावर वसलेले आहेत
२.स्थ्ळ दुर्ग :- हे जमीनी वर वसलेले आहेत, यांना भुईकोट किल्ले असेही म्हणतात
३.जलदुर्ग :- ह्य़ात दोन प्रकार आहेत
अ) समुद्र किनारी जमिनीवर असलेले - उदा- रत्नागिरी किल्ला
ब) समुद्रात बेटावर असलेले - उदा - जंजीरा,सिंधुदुर्ग
४.वन दुर्ग :- वासोटा, जंगली, जयगड
५.काष्ट दुर्ग :- लाकडी किल्ले (आपल्य़ा कडे आढ्ळत नाहीत)

शिवाजी महाराजांनी दुर्ग बांधण्य़ात अनेक प्रयोग केले आहेत जलदुर्गां बाबतीतले काही प्रयोग...समुद्रात रोज २ वेळा भरती व २ वेळा ऒहॊटी येते... या भरती-ऒहॊटी मध्ये ८/१० फ़ुटांचे अंतर असते लाटांचा जोर ही खूप असतो. लाटेत जेवढे पाणी जास्त तिवढा त्य़ाचा तडाखा जास्त... पाणी जेवढे कमी तेवढा तडाखा कमी...

१. कुलाबा किल्ला :- कुल म्हणजे सर्व , आब म्हणजे पाणी , कुलाबा म्हणजे सर्व बाजूंनी पाण्य़ाने वेढ्लेला
या किल्ल्य़ाचे वैशिष्ट म्हणजे हा किल्ला बांधताना दगडाचे चरे एकमेकांवर रचले आहेत..(जसे भिंत बांधताना विटा एक मेकांवर ठेवतात व त्या मध्ये सिमेंट चा थर देतात ) पण या दोन दगडांच्या मध्ये चुना अथवा कुठ्लेही बाईंडीग मटेरील वापरलेले नाही... जेंव्हा एखादी लाट या तटावर आपटते तेंव्हा पाणी या दोन दगडांच्य़ा फ़टीतुन आत शिरते त्या मुळे लाटेचा जोर कमी होतो व तडाखा कमी बसतो (आत गेलेले पाणी बाहेर येण्य़ा साठई खास शोय केलेली आहे)..
२.मुरूड( पद्मदुर्ग,कांसा) :- या किल्ल्य़ाचे वैशिष्ट असे कि या बांधकामात राजांनी चुना वापरलेला आहे... जर किल्ला बघितला तर असे दिसुन येति की त्या तटाचा दगड पाण्य़ा मुळे झिजला आहे पण या दोन दगडामधील तो ७/८ ईंचाचा चुन्य़ाचा स्तर अजुनही झिजलेला नाही..पद्मदुर्ग व कुलाबा किल्ला या मध्ये दोन बेटे आहेत खांदेरी व उंदेरी..
३.खांदेरीचा किल्ला :- हा किल्ला राजांनी ईंग्रज व सिद्धीवर वचक बसविण्य़ा साठी बांधला.. सिद्धीचे अरमार आपल्या पेक्षा प्रबळ होते.. त्याला ईंग्रजंची मदत मिळत होती.. ईंग्रजांना माहित होते जर हा किल्ला शिवाजीने बांधला तर ते त्यांना धोक्याचे आहे... मुंबईचा गव्हर्नर लिहीतो की खांदेरी म्हणजे मुंबईवर उगारलेला खंजीर आहे... त्या मुळे ईंग्रज किल्ला बांधताना अरमार पाठ्वुन मराठ्य़ांची रसद मारत अनेक विघ्न आणत या मुळे राजांना हवा तसा किल्ला बांधता आला नाही.. राजांनी या बेटा भोवती अनेक मॊठ मॊठाले दगड (शिळा) आणुन टाकल्य़ा.. या शिळा ऒहॊटीच्या वेळी सुद्धा पाण्य़ा खाली असतात..त्या मुळे त्या दिसत नाहीत ज्याला या खड्कांची पुर्ण माहिती आहे तोच किल्ल्य़ा पर्य़ंत फोहचू शकतो..सरळ कॊणी जहाज घेवून आले तर ते या दगडांवर आपटून फुटते... या खड्कांच्या वर कालव (शंख/शींपले) वाढ्ले आहेत. ह्या कालवांच्या कडा खूप धार धार असतात त्यामुळे कॊणीही त्यावर अनवणी चालू शकत नाही... पुर्वी २ प्रकारची पाद्त्राणे वापरत १ कमावलेल्या कातड्याची २. न कमावलेल्या कातड्य़ांची ... समुद्राच्या पाण्य़ामुळॆ ही पादत्राणे ख्राब होत असत व ति निरोपअयोगी ठरत.. त्या मुळे शत्रू किल्य़ा पर्य़ंत पोहचू शकत नसे... या दगडांमुळे लाटेचा जोरही कमी होतओ त्या मुळे तटाला धोका रहात नाही..(असाच उपयोग पुढे ब्रिटीशांनी मुंबई मधील क्विन्सनेक्लेस बांधताना केला)

४. विजय दुर्ग (घेरीया):- सिधुदुर्गच्या वायव्येला... :- पोर्तूगिज , ईंग्रज, डच यांच्या वर वचक बसविण्य़ा साठी येथील घेरीया किल्ला पाडुन राजांनी विजय्दुर्ग बांधला...याला एकात एक अशा ३ तट बंद्या आहेत..(य़ाच किल्ल्य़ावर १८६८ च्या ऑगष्ट मध्ये हेलीयमचा शोध लागला) या किल्ल्य़ावर एकदा अमवस्येच्य़ा रात्री ईंग्रजांनी ३ जहाजे किल्ला ताब्य़ात घेण्य़ासाठी पाठवीली ती जोर दार पणे किल्ल्य़ाचा दिशेने येत होती अचानक त्यातिल १ ले जहाज बुडाले... तसेच दुसरेही जे त्याच्य़ा मागोमाग आलेहोते तेही काही कळायच्या आत बुडाले.. ३र्‍य़ा जहाजातईल लोकांनी बाहेर उड्य़ा मारल्य़ा तेही जहाज पुडे येवुन फ़ुटले... या अपघातातुन वाचलेल्या एकाने ही गोष्ट त्याच्या हेडक्वार्टरला लिहुन कळ्वली,हे पत्र मॊडि लिपीत आहे.. १९९२ साली नवि मुंबई च्या नेव्हल म्युझीयम्च्य़ा प्रमुखांना............. मिळाले (त्यांचे नाव अत्ता माझ्य़ाकडे नाही मिळाले की कळ्वीन) त्य़ानी ते पुण्य़ात येवुन घाणेकर सरांना दाखवले...तेव्हा त्यांच्य़ा कडे निनाद बेडेकर सर ही काही कामा निमित्त आले होते... त्या दोघांनी या पत्राचा अर्थ ........ ना सांगीतला............ यांनी स्कुबा डायव्हींग्चे प्रशिक्षण घेतले व विजय दुर्ग किल्ल्य़ा भोवतीचे छायाचित्रण केले... यात त्यांना एक पाऊण किलोमीटर लांब आणि ३ मिटर रूंद अशी समुद्रात बांधलेली भींत अढ्ळून आली.... हि भिंत ऒहोटीच्या वेळी देखील पाण्य़ा खालीच आसते..ती वरून दिसत नाही ..याच भीतीला धडकून ब्रिटीश जहाजे फ़ूटली व बुडाली... कारण ब्रिटिशांची जहाजे खालून सपाट नव्हती... मराठ्य़ांचा होड्य़ा मात्र खालील्बाजुने सपाट होत्या त्यांना या भिंतीचा कधीही अढ्तळा आला नाही...आसे अनेक प्रयोग राजांनी ३५० / ४०० वर्षा पुर्वी केलेले आहेत.. असाच एक अगळा प्रयोग रायगडावर पहायला मिळ्तो.. महादरवाज्यातुन आत गेले कि समोर एक कातळ कडा आहे. या कड्य़ात टाकी खोद्लेली आहेत..रायगडावर चाल करुन येणे हिच मुळात शत्रुला अश्क्य प्राय आशी गोष्ट होतई तरीही जर शत्रू पुढुन चालून आला तर ही टाकी सुरंगाने फ़ोडायची त्यामुळॆ अचानक येणार्‍य़ा पाण्य़ाचा लॊढ्य़ाने शत्रू सैन्य वाहुन जाईल.. त्या मुळे होणार्‍य़ा चिखलात रुतुन बसेल व आपले सैन्य तटावरुन ह्ल्ला करु शकेल.. अशई व्यवस्था होती...(य़ाची प्रेरणा राजांना शहाजी राजांकडुन मीळाली असावी त्यांनि भातवाडिची लढाई याच प्रकारे जिंकली होती.. मोगल सैन्य शुष्क नदी पात्रात तळ ठॊकुन होते... रात्रीच्या वेळि ते गाफ़ील होते.. त्याच वेळी शहाजींनी भातवाडीचे धरण फ़ोड्ले यात मोगल सैन्याची वाताहात झाली..)



Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations