* हवलदार :- (किल्लेदार) (गडाचा हवाला ज्याच्या ताब्यात दिला आहे असा) साधारण जात :- मराठा काम :- राजे गडावर येई पर्यंत याचा मुक्काम कुटूंबकबील्या (फ़ॅमिली) सहीत (कारण त्यामुळे त्याची निष्टा गडावर व कामकाजावर राही. कारण तो फ़ॅमिली व गड या दोन्ही कडे लक्ष देवू शके) राजवाड्य़ात असे. गडावरील सर्वात मुख्य व्यक्ती. गडा भोवती गाव / मेट बसवणे / उठ्वणे महसूल गोळा करणॆ याच्य़ा हाता खाली ३ सरनौबत असत गडावर अंमल
* सरनौबत तट्बंदी पहारेकर्य़ांचा मुख्य हवालदारच्या हाताखालील उपाधीकारी सेनापती सेनापतींच्या हाताखाली सरनाईक असत
* सबनीस (गडावरचा अकाऔंटंट कम ऍडमिनिस्टेटर) साधारण जात :- ब्राम्हण काम:- गडाचा कारभार पहाणे गडावरील अन्न / पाणी ई. स्थिती बघणॆ गडावर हजेरी घेणे पत्रव्यवहार बघणे अकाऔंटंटस बघणे (युद्धजन्य परीस्थीतीत गड लढवायचा कि सोडुन द्यायचा हे ठरविण्याचा निर्णय हवल्दार व सबनीस मिळून घेत असत. एखादा गड जर आपण जास्त दिवस लढ्वू शकत नाही {अन्न / पाणी / सैन्य दारू गोळा ई. च्या कमतरते मुळे तर} हे लक्षात आल्यावर मराठे खंडणी घेवून किल्ला शत्रुच्या हवाली करत. आणी पावसाळ्य़ाचा दिवसात जॆंव्हा शत्रू किल्ला सर्व गोष्टींनी सुसज्ज करत असे तेंव्हा हल्ला करून किल्ला परत मिळ्वत आसत)
* कारखानीस साधारण जात :- प्रभु काम:- गडाची डागडुची करणे स्टॉक बघणे याच्य़ा हाताखाली कारकून असत
[ हवलदाराचा कार्यकाल एकाच ठिकाणी :- ३ वर्षे, सरनौबतांचा कार्यकाल एकाच ठिकाणी :- ४ वर्षे, सबनीसांचा कार्यकाल एकाच ठिकाणी :- ५ वर्षे. या नंतर त्यांची दुसर्य़ा ठिकाणीबदली केली जात असे एखाद्या किल्लेदारावर फ़ितुरीचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याचा शिरछेद केला जात असे.आरॊप सिदध न. जाल्यास त्यास योग्य ती सम्ज देवून बदली केली जात असे. या सर्व अधी कार्य़ांना त्यांच्य़ा रहात्या ठिकाणा पासून दुरच्या ठिकाणी नेमलेले असे त्यामुळे फ़ितूरीची शक्यता कंमी होते. ] फ़डणवीस : फ़ड म्हणजे दप्तर (ऑफ़िस, कचेरी) :- कचेरीचा मुख्य तो फ़डणवीस सभासद :- यालाच वाकनिस असे सुध्दा म्हणतात :- वाकन म्हणजे घट्ना :- गडावरील घट्ना लिहीण्य़ाचे काम वाकनीस उर्फ़ सभासद करीत असे.
या सर्वां शिवाय गडावर :- गंवंडी, सुतार,पाथरवट,कामाटणी,ताटकरी,कोठावळ (स्टॉक किपर),गुरव,पुजारी,चांभार(चांभाराचे काम पखाली तयार करण्याचे असे. या पखालींचा उपयोग बांधकामा साठी पाणी वाहणे, तटावर पाणी घालणे ई. साठी होई) हे लोक कायम असत.
कायम स्वरूपी किल्ल्यावर नेमणुक असलेल्य़ांना सनदी असे म्हणत युध्द्जन्य परिस्थीतीत ईतर ठिकाणांवरुन सैन्य पाठ्वले जाई युद्ध झाल्यावर हे सैन्य आपआपल्या ठिकाणांवर परतत असे. यांना गैरसनदी अथवा नामजाद म्हणत आसत. मराठी राज्यात कोणालाही जामिनी शिवाय नोकरी मिळत नसे.,गडावर चालणारय़ा प्रत्तेक गोष्टीचा हिशोभ ठेवला जात असे, वर्शातुन एकदा एक मोठा अधिकारी गडावर जाऊन हिशोभ तपासत असे, दर ५ वर्षांनी बेहडा (मॊठी पंचायत) होत असे यात गेल्या ५ वर्षांचा हिशोभ तपासला जाई (या प्रकारचे अंदाजे १५/२० लाख हिशोबाचे कागद ईतिहास संशोधन मंडळात आहेत, ते मोडी लिपीत आहेत, ज्यांना मोडी शिकायची आहे त्यांच्य़ा साठई मंडळ मॊडि चे वर्ग चालवते, येत्या १८ तारखे पासुन नविन वर्ग चालू होत आहेत ज्य़ांना यायचे असेल त्यांनी भारत ईतीहास संशोधन मंडळात संध्या. ६ ते ८ या वेळेत श्री. मंदार लवाटे यांना भेटावे - फ़ोन नं ९८२३०७९०८७, वर्गाची फ़ी रु.२६० असुन तो १६ दिवस चालेल , याच बरोबर मॊडिची पुस्तके व मोडी अभ्यासा साठी काही कागद पत्रांच्या झेरॉक्स मिळ्तील त्या साठी रु.११५) किल्य़ाचा खर्चा साठी किल्य़ांना गावे जहागीर म्हणुन दिली जात, या गावांमधुन किल्य़ासाठी धान्य पिकवले जाई व ते किल्य़ास पाठविले जात असे. मानवाच्य़ा उतक्रांती झाली त्या वेळी माणूस उघड्य़ावर रहात असे त्या मुळे त्याला ईतर श्वापदांचे भय नेहमीच असे म्हणून त्याने गुहेचा आसरा घेण्य़ास सुरुवात केली ओ गुहेत असताना त्याला थोडे संरक्षण मिळाले नंतर त्याने गुहेच्या तॊंडावर मोठ मॊठे दगड लावून स्वत: साठी आसरा निर्माण केला.. नंतर तो पाण्य़ाचा स्त्रोता जवळ वस्ती करून राहू लागला त्याने घर बांधण्यास सुरुवात केली या वस्ती भोवती संरक्षणा साठी तो लाकडई, काट्य़ांचे कुंपण घालू लागला. पण हे जेंव्हा अग्नीच्या भक्षी पडे तेंव्हा त्य़ाचे खुप नुकसान होत असे म्हणुन त्याने मातीची तटबंदी बाधण्य़ास सुरुवात केली.( हि तटबंदी घालण्य़ाची सुरुवात होती) .. जर त्याच्या जवळील पाणी साठा संपला तर तो आता तो दुसर्य़ा पाणी साठ्य़ा कडे जात असे.. तेथील वस्ती वर हल्ला करत असे.. (येथुनच लढाईस प्रारंभ झाला).. या मुळे वस्तीच्य़ा संरक्षणा साठी त्याने वस्ती भोवती खंदक खोदण्य़ास सुरुवात केली...नंतर तो घडीव दगडाची तट्बंदी उभारु लाआगला (हिच किल्ले उभारण्य़ाची सुरुवात म्हणता यॆईल). आपल्य़ा कडे मोहिन्जोदोडो व हड्प्पा संस्क्रूती चे अवशेश या प्रकारचे आहेत.. महाराष्ट्राचा ईतीहास हा साधारण पणे सातवाहनांच्या काळा पासुन सुरु होतो यावेळी येथे अनेक बंदरांमधून परदेशाची व्यापार चालत होता.महाड म्हणजे महाह्ट खुप मॊठी बाजारपेठ. बाणकॊट पाशी सावित्री समुद्राला मिळते. ते बाणकॊट बहूत प्राचीन तिथून ना.ना परिचा सम्रुध्द माल नावां मधून महाड पर्यंत यायचा. कमितकमी ५ हजार वर्ष तरी हा वहातघाणा सूरू आहे, ग्रिस मधून अलेक्झान्ड्रीयातून व्यापारी तारवातून मद्य, तांब, कथील शिस पोवळी पुष्कराज, बिलोरी कांच सुरमा, अस काय काय आणीत,फश्चिम किनारयावर कित्तेक बंदरं भ्रुगुकछ. शुर्पारक,श्रीस्थानक,कलीयन,चेउल,बाणकॊट, दल्भपूरी. यां बंदरातून हा माल उतरायचा मग लमांणांचे तांडे आपल्य़ा बैलांच्या पाठीवर माल चढवायचे. घाट वट चढूं लागायचे, व देशावर यायचे या वाटां वर लक्ष देण्य़ासाठी व या व्यापार्य़ांना संरक्षण देण्य़ा साठी, यांच्या वर लक्ष देण्य़ासाठी या वाटां वर किल्ल्य़ांची निर्मीती झाली..
Post a Comment