The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » शिवकालीन साधनांची ओळख....

शिवकालीन साधनांची ओळख....

Written By Nikhil Salaskar on Saturday, 4 August 2012 | 07:03

शिवकालीन साधनांची ओळख....


शिवाजी महाराजांच्या चरित्राचा मनापासून अभ्यास करणारी बरीच मंडळी या समुहात आहेत. मला असे वाटते जर अस्सल शिवकालीन साधनांची ओळख करून दिली तर अभ्यासकांना उपयोगी ठरेल. कादंबर्‍या वगैरे स्फूट साहित्य हे मनोरंजनासाठी ठीक, पण इतिहासासाठी मुळीच भक्कम साहित्य ठरू शकत नाही. त्यामुळे कथा - कादंबर्‍यांकडे अभ्यासू नजरेने बघितल्यास विचित्र इतिहासाची निर्मीती होते. अभ्यासूंसाठी शिवकालीन अस्सल साधनांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो आहे.

१) फार्सी पत्र संग्रह
१-अ) आदाब - इ - आलमगीरी (आलमगिरी शैली)
१-ब) इन्शा -इ हफ्त अंजुमन (सात प्रकारची पत्रे)
१- क) दुर्ज - उल गवाहिर (रत्नांचा करंडा)
१-ड) खुतूत - इ- शिवाजी (शिवरायांची पत्रे)

२) मराठी
२-अ) मराठ्यांच्या इतिहासाची साधने
(वि. का. राजवाडे संपादित खंड ८,१५, १६, १७,१८, २०)
२-ब) सभासद बखर (कृष्णाजी अनंत सभासद)
२-क) ९६ कलमी बखर
२-ड) चित्रगुप्त बखर
२- इ) तंजावरचा शिलालेख
२-फ) चिटणीस बखर
२-ह) शिवदिग्वीजय बखर
* शकावल्या
*-अ) जेधे शकावली
*-ब) शिवापूरकर देशपांडे शकावली
*-क) शिवापूर शकावली
*-ड) चित्रे शकावली

३) पोर्तुगीज
३-अ) द पोर्च्युगीझ अँड द मराठाज (डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर)
३-ब) मराठ्यांच्या इतिहासाची साधने : पोर्तुगीज दप्तर (डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर)
३-क) कोस्मि द ग्वार्दलिखित शिवचरित्र (१६९५)

४) इंग्रजी
४-अ) दि इंग्लिश फॅक्टरीज इन इंडिया, १७ खंड
४-ब) इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी, २ खंड

५) फार्सी साहित्य
५-अ) बादशाहनामा/ पातशाहनामा (शाहजहान कारकिर्द - १६२८ ते १६४७)
५-ब) आलमगिरनामा (औरंगजेबाची कालकिर्द)
५-क) मुहंमदनामा (मुहम्मद आदिलशाहाची कालकिर्द)
५-ड) तारीख - इ - आदिलशाही (आली आदिलशाहाचा इतिहास)

६) संस्कृत
६-अ) अनुपुराण उर्फ शिवभारत (कविंद्र परमानंद)
६-ब) पर्णालपर्वतग्रहणाख्यान (जयराम)
६-क) शिवराजराज्याभिषेककल्पतरू (गोविंद नारायण बर्वे)

७) समकालीन पोवाडे
७- अ) यमाजीकृत बाजी पासलकरांचा पोवाडा
७- ब) अज्ञानदासकृत अफजलखानवधाचा पोवाडा
७- क) फतनजीकृत अफजलखानाचा पोवाडा
७- ड) अज्ञान यमाजी कृत दत्ताजी जाधवरावांचा पोवाडा

८) हिंदी
८ -अ) शिवभूषण (कवि भूषण)
८ -ब) शिवा बावनी (कवि भूषण)
Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations