विरारवरून होळीच्या एक दिवस आधी हे लोक होळी नेतात अशाच प्रकारे लोकलला बांधून....
माहिमकर मच्छिमार बांधवांची बऱ्याच वर्षापासूनची हि प्रथा आहे ...माझ्या माहितीप्रमाणे किमान ४०-५० वर्षे तरी झाली असतील...विरारहून रात्री सुटणारी शेवटची लोकल ही होळी नेण्यासाठी वापरतात...होळीच्या एक दिवस आधी रात्री ८ नंतर विरार स्टेशनचे लोकलचे फलाट यांच्या बँडने दुमदुमून गेलेले असतात...आणि जाणाऱ्या लोकलचा एक संपूर्ण डब्बा एका बाजूने इतर प्रवाशांसाठी विरार ते वांद्रे/माहीम दरम्यान बंद असतो...आता प्रमाण कमी होत आहे. परंतु , मुंबईतील या भूमिपुत्र मुंबैकरांनी "सुपारीच्या" होळीची परंपरा अजून जोपासली आहे
Post a Comment